सेल्फी विथ कुंभः जिंदगीचं ग्यान सांगणारे विराटनाथबाबा

१८ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!

तेजतर्रार बोलके डोळे, तरतरीत नाक, जटा, डोक्याला पिवळं मुंडासं, गळ्यात कवटी, रुद्राक्षाच्या चित्रविचित्र माळा, गुलाबी वस्त्र आणि सावळी धीरगंभीर मुद्रा. कुंभमेळ्यात फिरताना या बाबानं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

प्रयागला कुंभमेळा परिसराच्या मागच्या बाजूला एक इलाका आहे दारागंज. कनिष्ठवर्गीय लोक इथे कच्ची घरं आणि झोपड्यांमध्ये राहतात. तिथे एका चहाच्या ठेल्यावर साधूबाबा मिट्टीच्या कुल्लडमध्ये चहा पीत बसले होते. मी जरा अंदाज घेत विचारलं, 'बाबाजी, आपसे थोडी बात करना चाहते है. बैठं जाये इधर?' त्यावर बाबा म्हणाले, 'हां बेटी, आवो.'

मी स्वत:ची ओळख सांगत त्यांना विचारलं, 'जी आपका नाम?' बाबा म्हणाले, 'हं विराटनाथ कहलाते है. नाथपंथी हैं!' मी विचारलं, 'कहां रहते हैं?' बाबा म्हणतात, 'कोई ठिकाणा नही हमारा! सात सालके थे तबसे घर छोडके भागे है. अब अपना पता ठिकाणा याद नहीं. वैसे तो गुवाहाटीसे हैं हम. आज यहां तो कल वहां. बहते रहना हैं!' मला खासच वाटलं, 'बहते रहना हैं!'

मी विचारते, 'क्यू?' बाबा हसतात. चहाची कुल्लड कचऱ्यात टाकत म्हणतात, 'देखो, जीना यानी बहना. किसी जगह ज्यादा दिन रुक गये तो बंध जायेंगे. मोह-मायासे. हम उसके परे हैं! खुदको किसी आकारमें ढालना नहीं है. निराकार,निर्मोही रहना है.' माझा पुढचा प्रश्न तयारच असतो, 'उससे क्या होगा?' ते न कंटाळता सांगत जातात, 'उससे मुक्ती मिलेगी. पंचेंद्रिय काबूमे हो जायेंगे. जग दुनिया जीतनेके लिये लडता है. दुनियातो मिलती नहीं. और आदमी हार जाते है. मेरी लडाई जीतकी लडाई है. क्यूकी मै तो अपने आपसे लड रहा हू ना!'

ऐकतच रहावं अशी काही लखलखीत धार बाबांच्या स्वराला आहे. त्यांच्या प्रवाही बोलण्याकडे एव्हाना बरेच राहचलते लोक खेचले गेलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर आदर, कुतूहल असे मिश्र भाव असतात. बाबा म्हणतात, 'ये लोग देखो टेहलने आये हैं यहा. इनको पता नहीं कुंभ क्या है. अज्ञानी हैं! कुंभतो मुक्तीका रास्ता खोजना हैं! और लोगतो इस चकाचौंधमेंही खो गये गंगाकिनारे.'

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

आता मी माझ्या पोतडीतले अजून प्रश्न काढते, 'आपके गुरू कौन है?' विराटनाथ सांगतात, 'बाबा रामदास. पर वोतो अब गंगामें समाधिस्थ हो गये. हम अब उनकी दिखाई राह चलते है. दिनरात तपश्चर्या करते है. अनुभूती ना मिले तबतक मरघटपरभी बैठकर ध्यान लगाते है. बडा कठीण होता हैं! इस कुंभमें न जाणे कहांकहांसे साधूसंत आते है. कोई असली होते हैं कोई नकली. सामान्य लोगतो किसीकेभी पांवपर गिर जाये. ऐसे तो नहीं चलेगा. ये बाबा खुद फंसे हुए हैं मक्कारीमें. किसीको क्या आशीर्वाद देंगे? सरकारने फर्जी बाबाओंपर कारवाई करनी चाहिये के नहीं?' मी होकाराची मान डोलावते.

मग एकाएकी बाबा कुणाची तरी हाक ऐकू आल्यासारखे ताडकन उठतात, 'चलो अब जाना होगा!' पाठमोरे होत चालू लागतात. एकदम मुक्त, स्वयंभू!

 

हेही वाचाः 

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

सेल्फी विथ कुंभः कुंभमेळ्यात रात्री मुर्दाबादची नारेबाजी का झाली?

 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)