यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे.
यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे......
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत......
काँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही.
काँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही......
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली.
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली......