ज्ञानव्यापी मशिदीवरून सध्या वादळ उठलंय. या मशिदीत शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केल्यामुळे मुस्लिम पक्षकारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. हे प्रकरण वाराणसीच्या दिवाणी कोर्टात चालवायचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. या प्रकरणातल्या वेगवेगळ्या बाजू आणि यात केंद्रस्थानी असलेल्या प्रार्थनास्थळांसंबंधीच्या कायद्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
0
विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. रुपया घसरला, याचा अर्थ इंधन तेलासह खाद्यतेल, खतं आणि इतर आवश्यक सुट्या घटकांची आयात महागणार आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणारच आहे.
0
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
0
झारखंड हे देशातल्या अत्यंत गरीब राज्यांपैकी एक. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या या राज्याची लूट राजकीय नेते आणि काही नोकरशहा यांनी संयुक्तरीत्या कैक वर्षांपासून चालवलीय. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांचं प्रकरण हे प्रशासनातल्या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं एक टोक आहे. आपली व्यवस्था आंतर्बाह्य कशी किडली आहे, त्याचं हे उदाहरण ठरावं.
0
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
0
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय.
0
‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय.
एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील.
हिमाचल प्रदेशातल्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ कॉंग्रेस नेते पंडित सुखराम शर्मा यांचं नुकतंच निधन झालं. हिमाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागात दूरसंचार क्रांती घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर पहिल्या दूरसंचार घोटाळ्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत.
ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल.
देशद्रोहासाठीचं कलम १२४-अ पुन्हा एकदा चर्चेत आलंय. प्रत्येक विरोधी वक्तव्य, टीकात्मक परीक्षण आणि नकार हे सर्व देशद्रोह आहे असं मानणं चुकीचं आहे. विशिष्ट राजकीय पक्षाबद्दल कोणी काही बोलत असेल, तर तो देशाचा अपमान मानता येणार नाही. गेल्या काही वर्षांत तसा प्रकार होताना दिसतोय. मोकळेपणानं विचार व्यक्त करण्याची प्रक्रिया दडपणं हा राजकीय स्वातंत्र्याचा संकोच आहे.
पत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे.
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते.
अमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे.
आजारांपासून सुटका करून देणारी औषधं म्हणजे रुग्णासाठी अमृतच. पण ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आरोग्यशास्त्र सांगतं. असं असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वतःच्या मर्जीनं औषधं घेणार्यांचं प्रमाण मोठंय. अलीकडच्या काळात ऑनलाईन औषधं मिळू लागल्यामुळे या मंडळींचं फावलंय.
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.
राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.
आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं.
आज प्राचार्य राम शेवाळकर यांचा स्मृतिदिन. प्राचार्य राम शेवाळकरांच्या वाणी आणि लेखणीनं साऱ्या जगातल्या मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सार्या लेखनातून त्यांच्या संवेदनशील कवीमनाचाही प्रत्यय येतो. या लेखातून शेवाळकरांच्या कवितेच्या एका सामर्थ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेलाय.
आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं.
ध्वनिप्रदूषक 'लाऊडस्पीकर' हा मशिदींपुरता मर्यादित विषय नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशात ठिकठिकाणी 'बडा नमाज' होऊ लागले. त्याला उत्तर म्हणून महाआरत्या सुरू झाल्या. या आवाजांनी मशिदीवरच्या भोग्यांना घंटा फरक पडला नाही. त्यामुळेच मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी मशिदीच्यापुढे भोंग्यावरून 'हनुमान चालिसा’चे पठण करण्याचा कार्यक्रम सुरू करण्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.
तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा.
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय.
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.
अलीकडच्या काळात झटपट श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवणार्या सौदागरांचं पेव फुटलंय. यासाठी वेगवेगळ्या योजना बाजारात आणून, त्याकडे लोकांना आकर्षित केलं जातं. पण त्यातला फोलपणा कालौघात समोर येतो आणि मग फसगतीशिवाय हाती काही राहत नाही. सध्या ‘अॅमवे’वर झालेल्या कारवाईमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय.