तुलना केल्यानं आनंद हिरावला जातो!

सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यासाठी त्यांना एक तर शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल.

१९९४ ची गोष्ट आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते अर्जुन सिंग यांची नेतृत्वाच्या श्रेष्ठत्वावरून तत्कालीन पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष पी. वी. नरसिंह राव यांच्याशी प्रचंड संघर्ष झाला होता. योगायोगानं तेव्हा माझी काँग्रेसचे सरचिटणीस बुद्धप्रिय मौर्य यांच्याशी अचानक गाठ पडली. मौर्य हे दलित नेते असून ते उत्तर प्रदेशचे होते. तेव्हा यूपीमधे अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते राव यांच्याविरोधात होते.

मौर्य यांना मी खिजवण्याच्या, चिडवण्याच्या उद्देशानं विचारलं, ‘तुम्ही अर्जुन सिंग यांना मदत का करत नाही?’  तरीही ते दुखावले गेले नाहीत. अत्यंत संयत आवाजात ते म्हणाले, ‘मी अलीगडजवळच्या उद्रौली गावातला आहे. तिथे एक म्हण प्रचलित आहे. एखाद्या व्यक्तीला आपला जावई किंवा नेता आपल्याहून वरचढ असावा असं वाटतं. आणि अर्जुन सिंग हे माझ्याहून चांगले नाहीत.’

राहूल गांधीचे घरातले प्रतिस्पर्धी

सध्या सचिन पायलट आणि काँग्रेस हायकमांडमधे अशीच हमरीतुमरी सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे ८७ वे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांची पुन्हा निवड करण्याला पक्षातूनच काहीसा प्रतिकार होतोय. ज्योतिरादित्य शिंदे, पायलट आणि इतर (यातले काही येत्या काळात पक्षही सोडू शकतात) काही जण राजकीय समज, सामाजिक कौशल्य आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या जोरावर स्वतःला राहुल यांच्याहून चांगले समजतात.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर ‘टीम राहुल’चे अनेक आजी, माजी सहकारी राहुल यांना तुच्छ मानत आहेत. खासगी चर्चांमधे ते स्वतःच्या पराभवासाठी घराणेशाहीच्या वारसदारांना उखडून देणाऱ्या नरेंद्र मोदींऐवजी राहुल गांधींना दोष देतात.

काँग्रेसकडून सांगितलं जातं त्यानुसार, सचिन पायलट यांना वयाच्या २६ व्या वर्षी लोकसभेचं तिकीट दिलं. ३० व्या वर्षी केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी दिली आणि ४० व्या वर्षी उपमुख्यमंत्री केलं. पद आणि आश्रयाचे लाभार्थी असलेले हेच घराणेशाहीचे तरुण वारसदार आता काहीसे प्रतिकाराच्या भूमिकेत गेलेत. पक्षातल्या या मायबाप कल्चरची त्यांना प्रचंड चीड येते. यावरून ते उद्विग्न होता. त्यांच्या मते, त्यांनी गांधींच्या कुठल्याही मदतीशिवाय स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलंय. यामधे पायलट, शिंदे, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद, प्रिया दत्त यासारख्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीच्या वारसदारांचा समावेश आहे.

बंगालमधला चौथा फुटबॉल क्लब

धर्माच्या उलट राजकारणात निष्ठा ही गोष्ट व्यवहार्य आणि सशर्त असते. १९७७ मधे इंदिरा गांधींची सत्ता गेली. तेव्हा ‘इंदिरा इज इंडिया’ आणि ‘इंडिया इज इंदिरा’ म्हणजेच इंदिरा म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच इंदिरा या नाऱ्याला जन्म देणाऱ्या देव कांत बरुआ यांनी सत्ता जाताच निष्ठाही बदलली. पक्ष बदलला. शाह चौकशी आयोगापुढे जाण्याआधी विद्याचरण शुक्ल आणि अंबिका सोनी यांना पदच्युत करण्यात आलं.

१९९७ मधे सीताराम केसरींच्या नेतृत्वातल्या काँग्रेस पक्षाची स्थिती बिकट होती. तेव्हा नेहरूवादी मणिशंकर अय्यर यांनी तृणमुल काँग्रेसमधे प्रवेश केला. नंतर ते पुन्हा काँग्रेसमधे आले. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातली तृणमुल काँग्रेस म्हणजे ‘बंगालमधला चौथा फुटबॉल क्लब’ यापलीकडे दुसरं काही नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

इलाहाबाद का छोरा अमिताभ

काँग्रेसच्या समकालीन इतिहासावर आपण एक धावती नजर टाकली तर मित्र, मित्रमंडळी किंवा पांढरपेशा राजकारणी फार काळ टिकत नाहीत, असं दिसतं. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपला लहानपणीचा दोस्त पंतप्रधान राजीव गांधींच्या पतनामधे महत्त्वपूर्ण योगदान दिलं. १९८४ मधे अलाहाबाद लोकसभा पोटनिवडणुकीत लोकांनी इलाहाबाद का छोरा म्हणून अमिताभ यांना निवडून दिलं आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्यासारख्या कधीकाळच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पराभव केला. पण त्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधले मतभेद उफाळून आले.

या निवडणुकीनं विखुरलेल्या विरोधी पक्षांना ५४३ पैकी ४९९ लोकसभा सदस्य असलेल्या काँग्रेसला आपण एकत्रित आलं तर नमवू शकतो, याची जाणीव करून दिली. यशस्वी कॉर्पोरेट उद्योगपती असलेल्या अरुण नेहरू, अरुण सिंग हेही गरज होती त्यावेळीच चक्रव्यूहात सापडलेल्या राजीव गांधींना एकटं सोडून बाजूला झाले. याउलट यशपाल कपूर, आर. के. धवन, एम. एल. फोतेदार आणि विन्सेट जॉर्ज यासारखे तळातून वर आलेले राजकारणी नेहमीच इंदिरा, राजीव आणि सोनिया यांच्यासोबत राहिले. दुर्लक्ष, अपमान सोसूनही ते सोबत राहिले.

सचिन पायलट यांचं काय होणार?

सचिन पायलट यांच्या भवितव्याबद्दल काहीएक तर्क लावणं खूप कठीण आहे. काँग्रेस किंवा गांधींसोबत त्यांचं भांडण जवळपास अशक्य आहे. सचिनच्या बंडाची ही वेळ गोंधळात टाकणारी आहे. ऑगस्ट २०१९ मधे जवळपास वर्षभरापासून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी पाहणाऱ्या सोनिया गांधींना स्वतःची जागा आता राहुलनं घ्यावी, असं वाटतं. पण काही लोकांनी राहुल गांधींना पक्षातूनच तगडं आव्हान उभं केलंय.

त्यांचा प्रभाव ज्योतिरादित्य शिंदेंनी पक्ष सोडून जाण्याच्या एक्झिट डोअर पॉलिसीपेक्षा खूप अधिक आहे. तथापि, याउलट एक युक्तिवाद केला जातो. त्यानुसार, शक्तिशाली शरद पवार आणि उत्साही राजेश पायलट यांना पक्षांतर्गत निवडणुकीत सीताराम केसरीसारखा कमकुवत, तेजोहीन माणूस हरवू शकतो. कारण केसरी हे विद्यमान काँग्रेस अध्यक्ष होते, म्हणूनच ते हरवू शकले.

सोनिया विरुद्ध जितेंद्र प्रसाद ही लढाई तर अधिक कामचलाऊ होती. सोनियांचा जो प्रतिस्पर्धी होता त्याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. जित्ती बाबूंनी जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पक्षाची राज्यातली कार्यालयं बंद असल्याचं आढळलं.

पक्ष सोडताना नेते सिंहासारखे असतात

सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यासाठी त्यांना एक तर शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल.

पक्षफुटीवर काँग्रेसचे विचारवंत नेते विठ्ठलराव गाडगीळ म्हणायचे, ‘पक्ष सोडताना काँग्रेस नेते सिंहासारखं असतात, आणि पक्षात येताना एखाद्या कोकरासारखं, शेळीसारखं होतात.’ असं असलं तरीही सध्या देशभरात १६ जणांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. यामधे शरद पवार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, के. चंद्रशेखर राव, मुफ्ती मोहम्मद सईद यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होतो.

एकहाती सत्तेचं स्वप्न

पण याला दुसरी बाजूसुद्धा आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाला राज्यात तिसऱ्या पक्षाला तोंड द्यायची वेळ आली तेव्हा पक्षाला सत्तेच्या काठावर बसावं लागलं. पक्षाची पीछेहाट झाली. स्वबळावर एकहाती सत्ता मिळवणं हे तर काँग्रेससाठी दूरचं स्वप्न होऊन बसलंय. दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधे आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळते.

पायलट यांच्यासाठी सध्यातरी राजस्थानमधे भाजप आणि काँग्रेसपासून सारखं अंतर राखत स्वतःचं स्थान निर्माण करणं ही सर्वांत मोठी समस्या आहे. आणि सध्या तशी कुठली शक्यताही दिसत नाही. भाजपशी व्यवहारीक किंवा थेट आघाडी केल्यानं तिसरी शक्ती उभी करण्याचा पर्याय आपोआप बंद होऊन जाईल.

राज्यातल्या सत्तेच्या राजकारणापासून दूर राहण्याचा पर्याय निवडला तर पायलट हे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत एक विश्वसनीय पर्याय म्हणून स्वतःला स्थापित करू शकतात. सध्याचं सत्तेचं राजकारण अशोक गेहलोत, वसुंधराराजे शिंदे यांच्यासाठी ते मोकळं ठेवू शकतात. पण यासाठी प्रचंड संयम, प्रयत्न आणि मोठमोठ्या पदांच्या सततच्या मोहांना टाळावं लागेल. आणि त्याचवेळी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना स्वतःसोबत ठेवणं ही प्रचंड कौशल्याची गोष्ट आहे.

देव आनंद यांचं दुकान

जर सर्वसमावेशक मध्यवर्ती अजेंडा घेत एखादा बिगर भाजप प्लॅटफॉर्म उभा करायचा असेल तर त्यासाठी पक्षाबाहेर पडण्याची खुमखुमी असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमधे वाणवा नाही. संसाधनं, वैचारिक स्पष्टता आणि देशव्यापी ओळख यांच्या अभावात व्यवहारी असलेले पायलट हे १९७९-८० मधे देव आनंद ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं जावू इच्छिणार नाहीत.

देव आनंद यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वातली काँग्रेस आणि जनता पक्षाला विरोध करण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाची स्थापना केली. विजयालक्ष्मी पंडीत, नानी पालखीवाला आणि इतर काही दिग्गज लोक या पक्षात आले. पण त्यांनी थेट निवडणुकीचा मार्ग न निवडता राज्यसभेत जाणं पसंद केलं. आणि देव आनंद यांचं हे दुकान तात्काळ बंद झालं, त्याचा पुढं काही मागमूसही राहिला नाही.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…