एक नोटिफिकेशन, आसाम-मिझोराम संघर्षाचं कारण

भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.

चीन आणि पाकिस्तान आपल्यासाठी एक नंबरचे शत्रू. त्यांच्याकडून भारताच्या सीमेजवळ थोडी धुसफूस झाली की आपण लगेच ऍक्टिव मोडमधे येतो. भारत-पाकिस्तान यांच्यातली कोणतीही मॅच आपल्यासाठी अस्मितेचा विषय असतो. चीनच्या कुरापती सुरू झाल्यावर त्यांच्या उत्पादनांवर बंदीची मागणी तर हमखास होते.

मुळात आंतरराष्ट्रीय राजकारण म्हटलं की तिथं दबदबा निर्माण करावा लागतो. शत्रू राष्ट्रांना एकटं पाडायचं तर तशी योजना आखावी लागते. त्याचाच भाग म्हणून सीमेवर कुरघोडी केली जाते. तिथं अशांतता पसरवली जाते. हा प्रत्येक देशासाठी त्यांच्या त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग असतो.

भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. राज्या राज्यांमधली भांडणं आपल्यासाठी नवी नाहीत. पण आसाम-मणिपूरमधल्या जमिनीच्या संघर्षातून २६ जुलैला ५ पोलिसांचा बळी गेला. त्यामुळेच या संघर्षाची धग देशभर पोचलीय.

हेही वाचा: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?

वादाचं कारण एका नोटिफिकेशनमधे

मिझोराम हा आसाम राज्याचा एक भाग होता. ब्रिटिश काळात हा भाग लुशाई हिल्स म्हणून ओळखला जायचा. इथल्या पहाडी भागात मिझो या आदिवासी जमातीची वस्ती होती. १८७३ मधे ‘बंगाल इस्टर्न फ्रंटीयर रेग्युलेशन ऍक्ट’ आला. त्यानंतर दोन वर्षांनी लुशाई हिल्स हा भाग वेगळा करण्यात आला.

पुढे १९३३ मधे अजून एक नोटिफिकेशन काढण्यात आलं. त्यात मणिपूर आणि लुशाई हिल्स दरम्यान सीमा निश्चित करण्यात आली. पण इथल्या लोकांनी १८७५ मधे निश्चित केलेली सीमाच आपली मानली. आसामचं सरकार १९३३ मधलं नोटिफिकेशचा आधार घेऊन ही जमीन आपलीच म्हणतंय तर मिझोराममधले लोक त्याला विरोध करतायत.

१९८७ ला आसाम राज्याचं विभाजन करून मिझोराम राज्याची स्थापना झाली. पण या दोन राज्यांमधल्या १६५ किलोमीटरच्या सीमेवरून वाद कायम राहिला. हा संघर्ष वाढू नये म्हणून एक करार झाला. त्यातून हा वादग्रस्त भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणून घोषित करण्यात आला.

२६ जुलैला काय झालं?

आसामच्या कचार, हाईलकांडी या जिल्ह्यांना मिझोरामची सीमा लागते. हे बराक पहाडी परिसरातले जिल्हे आहेत. २६ जुलैला या दोन्ही राज्यांमधले पोलीस कचार जिल्ह्याच्या सीमेलगत एकमेकांच्या विरोधात समोरासमोर आले. गोळीबार झाला. यात ६ पोलिसांचा मृत्यू झालाय.

२६ जुलैला या हिंसक घटनेमुळे आसामचे मुख्यमंत्री हे हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्येचा खटला भरण्यात आलाय. तसंच आसाममधल्या ६ वरिष्ठ पोलीस अधिकारी, २ सरकारी अधिकारी आणि २०० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेही वाचा: राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण

याआधीही जमिनीवरून वाद

फेब्रुवारी २०१८ ला दोन्ही राज्यांमधल्या संघर्षाला सुरवात झाल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमधे म्हटलंय. मिझो झिरलई पॉल या विद्यार्थी संघटनेने या वादग्रस्त भागात शेतकऱ्यांसाठी झोपड्या उभ्या केल्या होत्या. ही आपलीच सीमा असल्याचं म्हणत या बांबूच्या झोपड्या आसाम पोलिसांनी तोडल्या. आणि ठिणगी पेटली.

ऑक्टोबर २०२० मधे आसामच्या करीमगंज आणि मिझोरामच्या मामित या दोन सीमेलगतच्या जिल्ह्यांमधे वाद झाला. हिंसाचार झाला. या वादात मिझोरामच्या लोकांनी एक झोपडी आणि दोन सुपारीच्या बागा जाळून टाकल्या.

आसामच्या कचार जिल्ह्यातल्या लैलापूरमधेही रस्त्यावरून संघर्ष झाला होता. मिझोराम सरकार या भागावर हक्क असल्याचं सांगतं. त्यामुळे तिथल्या पोलिसांवर लोकांनी दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मिझोरामच्या लोकांनी लैलापूरमधल्या लोकांवर हल्ला केला.

मिझोरामची आर्थिक नाकेबंदी

मिझोराम आणि आसाम ही दोन्ही राज्य दोन देश असल्यासारखे उभे राहिलेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा एकमेकांना आव्हान देतायत. सरमा यांनी तर आपण एकही इंच मागे येणार नाही असं म्हणत वादात अधिक भर टाकलीय. हा राजकीय मुद्दा नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

अशातच आसाम सरकारने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत असल्याची घोषणा केलीय. त्यासंदर्भात माहिती केंद्र सरकारपर्यंत पोचवल्याचं मिझोरामच्या मुख्य सचिवांनी मीडियाला सांगितलंय. सध्या मिझोरामला त्रिपुरामार्गे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय.

हेही वाचा: 

हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!

कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?

लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच

‘तुम्हीच आहात बलात्कारी’ असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…