गणित बिघडवणारं घड्याळ ‘स्टेटस सिम्बॉल’ बनलं त्याची गोष्ट

एखाद्याची श्रीमंती दाखवण्याचं काम हल्ली घड्याळं करू लागलेली आहेत. जगभरातले अनेक सेलिब्रिटी, धनकुबेरांच्या मनगटांची शोभा वाढवणारी ही घड्याळं इतक्या किमतीची असतात, की ते पाहून आपले डोळे पांढरे व्हावेत! एखाद्याची ‘चांगली वेळ सुरू आहे,’ असंच आपण त्यावरून समजायचं. हार्दिक पंड्याच्या कोट्यवधी रुपयांच्या घड्याळामुळे अशा घड्याळांची न्यारी दुनिया कुतूहल वाढवतेय.

काळ आणि वेळ ही माणसासाठी प्राचीन काळापासूनच महत्त्वाची वाटत आलेली गोष्ट आहे. घड्याळं नव्हती त्या वेळी लोक सूर्याच्या स्थितीवरून वेळेचा अंदाज घेत. वाळूची घड्याळंही यासाठी बनवली गेली.

सध्या आपण वापरतो त्या मनगटी आणि भिंतीवरच्या घड्याळांचे आद्य पूर्वज युरोपात पंधराव्या शतकात अवतीर्ण झाले, असं मानलं जातं. गुंडाळत जाणार्‍या स्प्रिंगवर आधारित अशा घड्याळांनी माणसाला वेळेचं अचूक भान करून द्यायला सुरवात केली आणि घड्याळं ही हळूहळू मानवाच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनली.

आधुनिक माणसाचं जीवन तर घड्याळाच्या काट्याबरोबरच चालणारं आहे. सध्या वेळ पाहण्यासाठी म्हणूनच नाही, तर इतर अनेक गोष्टींसाठी घड्याळं वापरली जातात. ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरलेली अनेक महागडी घड्याळंही आहेत. अशा घड्याळांची दुनियाही न्यारीच आहे.

मनगटी घड्याळांचे प्रकार

मुळातच मनगटी घड्याळांचा जन्म ‘स्टेटस सिम्बॉल’ बनण्यासाठीच झाला होता, असं म्हटलं तरी चालेल. याचं कारण म्हणजे १५७१मधे इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ पहिली हिला रॉबर्ट ड्युडले याने असं पहिलं मनगटी घड्याळ दिल्याचं म्हटलं जातं. खुद्द महाराणीच्या मनगटावर हे घड्याळ असल्यानं त्या वस्तूला किती मोल आलं असेल, याची आपण कल्पना करू शकतो.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार, जगातलं पहिलं मनगटी घड्याळ अब्राहम लुईस-ब्रेगेट याने १८१०मधे नेपल्सची राणी कॅरोलिन म्युरत हिच्यासाठी बनवलं होतं. सुरवातीच्या काळात अशी मनगटी घड्याळं विशेषतः महिलांसाठीच सुंदर ब्रेसलेटप्रमाणे बनवली जात होती आणि पुरुष मंडळी ‘पॉकेट वॉच’ म्हणजेच खिशात ठेवण्याची घड्याळं वापरत.

१९व्या शतकाच्या शेवटी एक सोय म्हणून सैनिकांनी मनगटी घड्याळं वापरायला सुरवात केली आणि या घड्याळांबद्दलचा लिंगभेद मावळत गेला. कालौघात मनगटी घड्याळांमधेही अनेक नवे नवे प्रकार येत गेले. १९५०च्या दशकात विजेवर चालणारी घड्याळं आली, तर १९६९ला क्वॉर्टझ घड्याळांचं युग सुरू झालं. १९००मधे रेडिओ कंट्रोल्ड घड्याळं आली, तर २०१३ला अ‍ॅटोमिक वॉचही आलं.

हेही वाचा: रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

स्वित्झर्लंड लक्झरी घड्याळांचं माहेरघर

एक वेळ अशी आली, की ‘वेळ पाहणं’ इतकाच घड्याळांचा उद्देश राहिला नाही. मनगटावरच्या घड्याळातून माणसाच्या हृदयाच्या ठोक्यांपासून किती पावलं चालणं झालं, इथपर्यंतची ‘आरोग्यदायी’ माहिती मिळू लागली.

स्वित्झर्लंड हा देश महागड्या, लक्झरी घड्याळांचा माहेरघरच बनलेला आहे. जगभरातले अनेक सेलिब्रिटी, धनकुबेर लोकांच्या हाती मोठ्या ब्रँड्सची महागडी घड्याळं असतात. मनगटावर असं महागडं घड्याळ असणं हे एखाद्याच्या श्रीमंतीचं, प्रतिष्ठेचं लक्षणही बनू लागलं.

घड्याळांची हौस असो किंवा नसो, अनेक गर्भश्रीमंत लोक असं घड्याळ हातात बांधून घेऊ लागले. ही घड्याळं वेळ दाखवण्याबरोबरच लोकांना त्यांची श्रीमंती, समाजातलं स्थान दाखवण्याचंही काम करू लागली. अशी काही घड्याळं सर्वसामान्यांना थक्क करणारीच आहेत.

जगातले महागडे ब्रँड

जगातल्या सर्वात अव्वल अशा महागड्या घड्याळांच्या ब्रँड्समधे पॅटेक फिलीपी ग्रँडमास्टर खाईम, ब्रेगेट ग्रँड कॉम्प्लिकेशन मेरी अँटोनिएट, जेगर-लेकॉल्त्रे जॉयलेरी, चोपार्ड २०१ कॅरेट वॉच, रोलेक्स यासारख्या अनेक ब्रँड्सचा समावेश होतो.

जगातल्या सर्वात महागड्या घड्याळांमधे अव्वल स्थान ‘ग्रॅफ डायमंड्स हॅल्यूसिनेशन’चं आहे. त्याची किंमत ५५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४ अब्ज, ८ कोटी, ४९ लाख, ९३ हजार रुपये आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर सर्वात महागडं घड्याळ आहे ‘ग्रॅफ डायमंड्स द फॅसिनेशन.’

ग्रॅफ डायमंड्स द फॅसिनेशनची किंमत आहे ४० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २ अब्ज, ९७ कोटी, ८ लाख, ६० हजार रुपये. तिसर्‍या क्रमांकावर आहे ‘पॅटेक फिलीपी ग्रँडमास्टर खाईम.’ हे ३१ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २ अब्ज, ३० कोटी, २१ लाख, ९४ हजार, ८५० रुपयांचं घड्याळ.

हेही वाचा: पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज

स्पेशल लिलावासाठी घड्याळ

आता अशा अब्जावधी रुपयांची घड्याळं आहेत, याचा अर्थ, त्यांना खरेदी करणारेही लोक असणारच! उगीचच शोभेसाठी इतक्या महागड्या घड्याळांची निर्मिती होणार नाही! लिलावांमधेही घड्याळांना मोठीच किंमत मिळत असते.

२०१९ला स्वित्झर्लंडची लक्झरी वॉच कंपनी ‘पॅटेक फिलीपी’च्या एका घड्याळाला लिलावात तब्बल ३१ दशलक्ष स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे २२२ कोटी रुपयांची किंमत मिळाली. एखाद्या रिस्टवॉचला मिळालेली ही जगातील सर्वाधिक किंमत होती.

हा लिलाव चॅरिटीसाठी करण्यात आला होता आणि मिळालेली सर्व रक्कम समाजोपयोगी कामासाठी दान करण्यात आली. ‘पॅटेक फिलीपी’च्या या ‘ग्रँडमास्टर खाईम ६३०० ए-०१०’ घड्याळाची निर्मिती खास लिलावासाठीच झाली होती. यापूर्वी ‘डेटोना रॉलेक्स’च्या नावे ‘जगातलं सर्वात महागडं घड्याळ’ असा किताब होता. २०१७ला या घड्याळाला १७.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १२७ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं.

सेलिब्रिटींकडे कोट्यवधींची घड्याळं

अनेक सेलिब्रिटी महागडी घड्याळं घेऊन चर्चेत येत असतात. फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोकडे महागड्या मोटारींचा जसा ताफा आहे, तसाच महागड्या घड्याळांचाही संग्रह आहे. त्याच्याकडच्या एका रोलेक्स घड्याळाची किंमत ३ कोटी ७२ लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. हे घड्याळ १८ कॅरेट व्हाईट गोल्डने बनवलेलं असून त्यावर ३० कॅरेटचे हिरे जडवलेले आहेत.

विराट कोहलीचं ‘रोलेक्स डेटोना’, कायली जेनरचं १८ कॅरेट व्हाईट गोल्डचं ‘पॅटेक फिलीपी’, ड्रेकचं ‘रिचर्ड मायली आरएम ६९’, जे झेडचं ‘पॅटेक फिलीपी’ घड्याळही चर्चेत आलं. सध्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्याही महागड्या घड्याळांमुळे चर्चेत आला आहे. ‘आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप’नंतर आपले क्रिकेटपटू अगदीच हात हलवत परत आले नाहीत, हे हार्दिक पंड्याच्या हातावरून दिसून आलं.

त्याच्याकडची दोन महागडी घड्याळं मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केली. त्यांची किंमत ५ कोटी रुपये होती, असं म्हटलं गेलं. मात्र खुद्द हार्दिकने घड्याळ दीड कोटी रुपयांचं असल्याचा खुलासा सोशल मीडियातून केला.

दीड कोटी रुपयांमधे काय काय येऊ शकतं. याची कल्पना आपण करू शकतो. अशा वेळी नुसतं दीड कोटींचं घड्याळच एखादी व्यक्ती घालते म्हटल्यावर आपल्या भुवया उंचावणारच! मात्र उच्चभ्रू समाजात आता अशी घड्याळं घालणं प्रतिष्ठेचंच लक्षण मानलं जातं. एखाद्याची ‘चांगली वेळ सुरू आहे,’ असंच आपण त्यावरून समजायचं.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा ९० वा वाढदिवस

एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे

अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…