मृत व्यक्तीचं आयकर रिटर्न कसं भरावं?

जिवंत व्यक्तीनं आयकर भरलेला आजपर्यंत आपण ऐकलंय. पण आता मृत व्यक्तीलाही आयकर रिटर्न भरता येऊ शकतो. तो भरण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला स्वत:ची नोंद करावी लागेल. घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. तसंच रिफंडसाठीही दावा करता येईल.

जिवंतच नाही, तर मृत व्यक्तीचाही इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयटीआर भरता येऊ शकतं. कायदेशीर वारसाला मृत व्यक्ती हा जिवंत असेपर्यंतच्या काळातला आयटीआर भरणं बंधनकारक आहे. आयटीआर भरण्यासाठी संपूर्ण वर्षाऐवजी जोपर्यंत ती व्यक्ती हयात असते, तोपर्यंत उत्पन्नाचं आकलन केलं जातं.

रिफंडवरही दावा करता येतो

मृत व्यक्तीचे आयटीआर भरण्यापूर्वी कायदेशीर वारस म्हणून स्वत:ची नोंद करावी लागेल. घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. कायदेशीर वारसाला मृत व्यक्ती हा जिवंत असेपर्यंतच्या काळातला आयटीआर भरणं बंधनकारक आहे.

त्याला करही भरावा लागेल, त्याचबरोबर रिफंडसाठीही दावा करता येईल. कायदेशीर वारसदार हा डिम्ड असेसी असतो. यासाठी तो रिटर्न दाखल न करण्याचा पर्याय निवडत असेल, तर आयकर खातं पुढची कारवाई करू शकतं.

कायदेशीर वारसदार म्हणून नोंदणी

https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर आयकर ई-फायलिंगच्या वेबसाईटवर जावं. क्रेडेंशियलचा उपयोग करून लॉग-इन करावं आणि माय अकाऊंटला क्लिक करावं.

स्वत:ला प्रतिनिधी म्हणून नोंदवावं. मृत व्यक्तीचा आयटीआर भरताना न्यू रिक्वेस्टवर क्लिक करावं.

मृताचा पॅन नंबर, संपूर्ण नाव, बँक खात्याचं विवरण भरावं. आपली रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज येईल.

हेही वाचा: अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?

मृताचं आयटीआर कसं भरावं?

स्वत:ला कायदेशीर वारस म्हणून सिद्ध केल्यानंतर आयटीआर फॉर्म वेबसाईटवरून डाऊनलोड करावा.

लक्षात ठेवा, संपूर्ण डिटेल भरल्यानंतर फॉर्मची एक्सएमएल फाईल जनरेट होईल. कारण केवळ एक्सएफएल फॉर्मेटमध्येच फॉर्म अपलोड होतो. 

पॅनकार्डच्या डिटेल्स असलेल्या पर्यायात कायदेशीर उत्तराधिकारी असलेल्या वारसदाराला आपली माहिती द्यावी लागेल. आयटीआर फॉर्मवर नाव आणि असेसमेंट ईअरचा पर्याय निवडावा. एक्सएमएल फाईल अपलोड करणं आणि डिजिटल रूपातून सही केल्यानंतर फॉर्म दाखल होईल.

मृत व्यक्तीच्या उत्पनाची आकारणी

तज्ज्ञांच्या मते, मृत व्यक्तीच्या उत्पन्नाची पडताळणी करण्याची प्रक्रिया ही सामान्यच आहे. सर्व कपात आणि सवलतीनंतर शिल्लक राहिलेल्या उत्पन्नावर त्याची आकारणी केली जाते. फरक एवढाच की, संपूर्ण वर्षाऐवजी जोपर्यंत जी व्यक्ती हयात असते तोपर्यंत उत्पन्नाचं आकलन केलं जातं.

हेही वाचा:

एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय

टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

म्युच्युअल फंडातली गुंतवणूक काढून घेताना कोणती काळजी घ्यावी?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…