इलॉन मस्क यांनी ट्विटरची ‘पॉयझन पिल’ कशी पचवली?

इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.

जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेण्याचा करार केला. हा करार ४४ बिलियन म्हणजे अंदाजे ३.३७ लाख कोटी रुपयांना झाला. ट्विटरनेही या वृत्ताला दुजोरा दिलाय. बर्‍याच दिवसांपासून इलॉन मस्क ट्विटर विकत घेणार असल्याची चर्चा होती. यावरून अनेक वादही झाले.

अनेक लोक या व्यवहाराच्या विरोधात होते, पण अखेर हा करार झालाय. ट्विटरनं या अधिग्रहणाविरूद्ध ‘पॉयझन पिल’ची रणनीती लागू करण्याची योजना आखली होती, पण तरीही मस्कनं कंपनी विकत घेतली. ही रणनीती व्यावसायिक जगतात कशी कार्य करते? पॉयझन पिल म्हणजेच ‘विषाची गोळी’ ही संकल्पना कशी, कुठून आली ते समजून घेऊ.

हेही वाचा: द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

काय आहे पॉयझन पिल?

‘कॅप्टन अमेरिका’ किंवा ‘जेम्स बाँड’चे सिनेमे तुम्ही पाहिले असतीलच. त्यात शत्रूकडून जेव्हा जेव्हा एखादा गुप्तहेर पकडला जायचा तेव्हा त्याच्याकडून कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून तो त्याक्षणी सायनाइडची एखादी विषारी गोळी खाऊन आत्महत्या करायचा. या संकल्पनेवरच आधारित १९८०च्या दशकात विलीनीकरण आणि अधिग्रहणासाठी ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी ही संज्ञा व्यावसायिक जगात वापरली जाऊ लागली.

पॉयझन पिल अर्थात विषारी गोळीची सुरवात न्यूयॉर्क शहरातल्या ‘वॅचटेल लिप्टन रोजेन अँड कॅट्झ’चे प्रमुख आणि सह-संस्थापक मार्टिन लिप्टन यांनी केली होती. ते पेशानं वकील होते. १९८२मधे, मार्टिन लिप्टन यांनी पॉयझन पिलच्या मदतीने ‘एल पासो कॉर्प’ या कंपनीला ‘बर्लिंग्टन नॉर्दर्न रेलरोड’नं जबरदस्तीनं ताब्यात घेण्यापासून वाचवलं होतं. या कंपनीला विषाच्या गोळीच्या मदतीनं चांगला सौदा मिळाला.

या संकल्पनेच्या अंतर्गत व्यवसायात एखाद्या कंपनीच्या शेअरधारकांना त्यांच्या कंपनीची कमान दुसर्‍याच्या हातात जाण्यापासून वाचवायची असेल तर ते त्या कंपनीचे शेअर खरेदी करतात. हे असं दोन प्रकारे घडतं.

‘फ्लिप-इन’- ‘फ्लिप-ओवर’

पहिला प्रकार म्हणजे फ्लिप-इन. यात सध्याचे भागधारक मोठ्या प्रमाणात कंपनीचे शेअर सवलतीनं खरेदी करतात. यात गुंतवणूकदारांना भरपूर नफा ऑफर केला जातो, तर दुसरीकडे कंपनीच्या संचालकांना त्यांची हिस्सेदारी कमी करावी लागते. त्यामुळे कंपनीचं मूल्य वाढतं आणि अधिग्रहण महाग होतं.

जर कोणत्याही एका शेअरहोल्डरनं १५ टक्क्यांपर्यंत हिस्सा पातळी गाठली, तर उरलेले शेअरहोल्डर्स भरीव सूट देऊन शेअर खरेदी करून त्यांचा हिस्सा वाढवू शकतात, पण संचालकाला काही हिस्सा कमी करावा लागतो. ‘पॉयझन पिल’ संकल्पनेचा आणखी एक दृष्टीकोन म्हणजे जबरदस्तीनं अधिग्रहण केल्यानंतर याचा वापर करणं. यानुसार अधिग्रहणानंतर भागधारकांना जोरदार सवलतीत समभाग दिले जातात. याला फ्लिप-ओवर म्हणतात.

अशी या विषाच्या गोळ्यांची रणनीती खूप प्रभावी असली तरी, ती बळजबरीनं खरेदी करणार्‍याला अधिक महाग आणि कमी आकर्षक बनवते, त्यामुळे काहीवेळा कंपनीचं अधिक नुकसान होतं. उदाहरणार्थ, समजा ट्विटरचे एकूण १०० शेअर आहेत. ठरलेल्या डीलपूर्वी मस्क यांचे ९.१ टक्के शेअर होते. जर मस्क यांनी आणखी ५.९ टक्के शेअर विकत घेतले तर त्याचा हिस्सा १५ टक्के होईल. असं समजताच ट्विटरने २५ शेअर जाहीर केले असते.

असं झालं असतं तर एकूण शेअर १२५ झाले असते, तर मस्क यांच्याकडे १५ शेअर तसेच राहिले असते. पण या एका हालचालीनं त्यांचा हिस्सा कमी होऊन १२ टक्क्यांवर आला असता. अशा स्थितीत त्यांना पुन्हा आपला हिस्सा वाढवायचा असेल तर अधिक पैसे गुंतवून अधिक शेअर खरेदी करावे लागतील. अशाप्रकारे, काही कंपन्या त्यांचं अधिग्रहण थांबवण्याचं धोरण खूप महाग करून अबाधित ठेवतात.

हेही वाचा: ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

पॉयझन पिलचा असाही वापर

सिरॅमिक्स निर्माता ‘लेनॉक्स’नंही याच रणनीतीचा वापर करत ‘जॅक डॅनियल विस्की’ची निर्माता कंपनी ‘ब्राउन-फॉर्मन डिस्टिलर्स’शी फायद्याचा व्यवहार करून घेतला होता. लेनॉक्सनं आपल्या भागधारकांना एक विशेष लाभांश देऊ केला. त्यानुसार टेकओवरनंतर लेनॉक्सचे भागधारक ब्राउन-फॉर्मन कंपनीचे समभाग अर्ध्या किमतीत खरेदी करू शकत होते. त्यामुळे ब्राउन-फॉर्मनला टेकओवर ऑफर वाढवण्यास भाग पाडलं गेलं. यानंतर दोघांमधे चांगल्या किमतीत व्यवहार पूर्ण झाला.

‘याहू’नं २०००च्या दशकात मायक्रोसॉफ्टकडून विकत घेतलं जाऊ नये म्हणून ‘पॉयझन पिल’ वापरली. नेटफ्लिक्सनंही २०१२मधे जेव्हा अब्जाधीश कार्ल इकाहनने या कंपनीचा १० टक्के हिस्सा विकत घेतला, तेव्हा स्वतःला अशा विषाच्या गोळ्या घेत वाचवलं होतं. अमेरिकन पिझ्झा रेस्टॉरंट चेन ‘पापा जॉन्स’नंही संस्थापक जॉन स्नॅटर यांच्या कंपनी ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी ही विष गोळी वापरली.

आता हा प्रश्न पडतोच की, ट्विटर ही ‘विषाची गोळी’ वापरून इलॉन मस्कना का थांबवू शकलं नाही? तर, विषाच्या गोळीचा वापर स्वतःला अधिग्रहणांपासून वाचवण्यासाठी किंवा सौदेबाजी करून चांगले सौदे मिळवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या बोर्डासोबत असा काहीतरी करार केला असावा, ज्याला सर्वाधिक पसंती मिळाली असावी.

दुसरीकडे, तो आधीच जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, त्यामुळे त्याच्यासाठी कंपनीचं अधिग्रहण केवळ महाग करून टाळता येणं शक्य झालं नसेल. कदाचित त्यामुळेच ट्विटरच्या बोर्डानं इलॉन मस्कसोबत ४४ अब्ज डॉलरचा करार केलाय. आता ट्विटरला इलॉन मस्क यांनी विकत घेतलं आहे, त्यात भविष्यात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

ट्विटरमधे काय बदल होतील?

संपादन किंवा एडिटिंग बटन: मस्क यांनी या महिन्याच्या ५ तारखेला ट्विटरवर एक सर्वेक्षण केलं. त्यांनी लोकांना विचारलं होतं की त्यांना संपादन बटनाची आवश्यकता आहे का? या मतदानात अंदाजे ४४ लाख लोकांनी मतदान केलं होतं. यात ७३.६ टक्के लोकांनी हो, तर २६.४ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे, मस्क यांनी ‘हो’ आणि ‘नाही’चं स्पेलिंग चुकीचं लिहिलं होतं.

ट्विटरचं अल्गोरिदम ओपन सोर्स: २४ मार्चला मस्क यांनी ट्विटरवर एक सर्वेक्षण केलं, ज्यात ट्विटरचं अल्गोरिदम ओपन सोर्स असावं की नाही हे विचारलं. या प्रश्नाच्या उत्तरात जवळपास ११ लाख मतं पडली. यापैकी अंदाजे ८२.७ टक्के लोकांनी हो, तर १७.३ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. अल्गोरिदम ओपन सोर्स बनवण्यामागचा त्यांचा तर्क असा होता की ट्विटर वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्टबद्दल मोकळीक द्यावी, जेणेकरून काहीही लपून राहणार नाही.

क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांना चाप: मस्क यांच्या बँक खात्यासारखंच बनावट खातं तयार करून घोटाळेबाजांनी त्यांच्या नावावर क्रिप्टोकरन्सी घेतली. याआधी २०२०मधे मस्क यांचं अकाउंट हॅक झाल्याची बातमी आली होती. जानेवारीमधे मस्क यांनी तक्रार केली होती की क्रिप्टोस्कॅमर खुलेआम फसवणुकीत गुंतलेले असताना ट्विटर आपलं तंत्रज्ञान नको त्या प्रोफाइल फोटोंवर खर्च करतंय.

ट्विटर सार्वजनिक बनू शकतं: इलॉन मस्क यांनी ट्विटरवर कोणता कंटेंट द्यायचा आणि कोणता नाही हे ठरवून टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर त्यांनी मतदानही केलं, ज्यात लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे की नाही? ट्विटरनं हे तत्त्व पाळू नये का? असा सवाल त्यांनी केला होता. त्यातल्या २० लाख मतांपैकी २९.६ टक्के लोकांनी हो, तर ७०.४ टक्के लोकांनी नाही म्हणलं.

पण जनमत असं असलं तरी मस्क असा निर्णय घेतात का, हे पाहणं भविष्यात उत्सुकतेचं ठरणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल त्यांनी नुकतंच आणखी एक ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय, ‘मला आशा आहे की माझे सर्वात वाईट टीकाकारही ट्विटरवर राहतील, कारण मुक्त भाषणाचा अर्थ हा असा आहे.’

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…