राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

Rajsthan Election 2023

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या सरकारवर इतिहासाची टांगती तलवार उभी आहेच. गेहलोत यांची कारकीर्दही तशी वादग्रस्त राहिली आहे. पण काँग्रेसच्या गेहलोत-पायलट गटात दिसत असलेले ऐक्य आणि भाजपमधील बंडाळी ही मात्र काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते.

‘मोदी तुमसे बेर नही, लेकिन वसुंधरा तेरी खैर नही,’ असा नारा गतवेळच्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत घुमला होता. एकीकडे पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही वैर नसल्याचे सांगत, वसुंधराराजे शिंदे यांना धडा शिकविण्याचा निर्धार राजस्थानच्या जनतेने केला होता आणि त्यानुसार काँग्रेसच्या पारड्यात लोकांनी भरभरून मतेही टाकली होती.

गेल्या पाच वर्षांची मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. हिंदू सणांवेळी धार्मिक मिरवणुकांवर विशिष्ट वर्गाकडून झालेले प्राणघातक हल्ले, सरकारकडून या वर्गाच्या लांगूलचालनाचा झालेला आरोप, कन्हैया हत्याकांड, वाढता भ्रष्टाचार आदी कारणांमुळे गेहलोत सरकार गाजले. सलग दुसर्‍यांदा विजय प्राप्त करण्यासाठी गेहलोत यांनी कंबर कसली आहे. मात्र त्यांच्यासमोर भाजपने मोठे आव्हान आहे.

गेहलोत पुन्हा जिंकून इतिहास बदलणार?

राजस्थानच्या जनतेने कुठल्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. हा इतिहास बदलण्याची अपूर्व संधी काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांच्यासमोर आहे. भाजपच्या विविध गटांदरम्यान उसळलेली बंडाळी एक प्रकारे काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. भाजपला पुन्हा सरकार बनवायचे असेल, तर गट-तट विसरून एकसंध होणे आवश्यक ठरणार आहे.

राजस्थानच्या निवडणुकीत भाजपने खासदारांची फौज उतरविलेली आहे. यावरूनच पक्षाने ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे, याची कल्पना येते. काँग्रेसमधे गटबाजी आहे असे नाही; पण या पक्षात गहलोत आणि सचिन पायलट असे दोनच प्रमुख गट आहेत. दुसरीकडे, भाजपमधे असंख्य गट-तट कार्यरत आहेत.

यातील प्रमुख गटांमधे बसुंधराराजे गट, गजेंद्रसिंह शेखावत गटांचा समावेश होतो. तिकीट वाटपात बसुंधराराजे गटाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची वदंता आहे. या पार्श्वभूमीवर या गटाचे अनेक नेते अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. मागील ‘काही काळात हा गट कमजोर झालेला असला तरी त्याची भाजपची नुकसान करण्याची या गटाची क्षमता आहे, हे विसरता येत नाही.

भाजपमधील बंडाळी उघड आणि आक्रमक

जयपूर क्षेत्रात विधानसभेच्या १९ जागा आहेत. येथील पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपने केली आहे. विशेष म्हणजे जाहीर करण्यात आलेल्या तीन नावांना मोठा विरोध होत आहे. राज्याच्या इतर भागात जवळपास अशीच स्थिती आहे. याला कारण म्हणजे आक्रमक झालेला वसुंधराराजे गट हे होय.

भाजपने झोटवाडा मतदारसंघात खा. राजवर्धनसिंह राठोड यांना तिकीट दिले आहे. यामुळे माजी मंत्री राजपालसिंह शेखावत गट नाराज आहे. भाजपकडून तिकीट कापण्यात आलेले आशुसिंह सूरपुरा यांचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत.

तिकीट नाकारलेले काँग्रेसच्या मार्गावर

तिकीट कापण्यात आलेले काही नेते काँग्रेसच्या मार्गावर आहेत. तसे झाले तर भाजपसाठी तो मोठा धक्का ठरेल. राज्यातील कोटा विभाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मागील काही काळात याठिकाणी काँग्रेसची ताकद वाढली आहे.

कोटा विभाग पिंजून काढण्यासाठी आगामी काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदरसिंह रंधावा, मुख्यमंत्री गेहलोत तसेच प्रदेशाध्यक्ष गोबिंद डोटासरा हे दौरे करणार आहेत.

गत विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर १२ क्षेत्रांत चारमधील ३ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. कोटामधील ६ पैकी ३, तर बुंदी जिल्ह्यातील ३ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे.

विविध योजना काँग्रेसला तारतील का?

राजस्थानमधे विधानसभेच्या २०० जागा आहेत आणि बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला १०१ चा आकडा गाठणे आवश्यक आहे. सुधारित वेळापत्रकानुसार राज्यात येत्या २५ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मागील पाच वर्षात समाजातील विविध घटकांसाठी राबविलेल्या जनहिताच्या योजना निवडणुकीत आपणास तारतील, असा मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्‍वास आहे.

१०० युनिटपर्यंत मोफत वीज, विधवा आणि महाविद्यालयात जाणार्‍या मुलींना मोबाईल वाटप, विधवा आणि वृद्धांना पेन्शन, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गेहलोत यांनी केला आहे.

गेहलोत-पायलट सख्य तिकीट वाटपानंतर कळेल

कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार गटाने आपले मतभेद बासनात गुंडाळून पक्षाचा प्रचार केला “होता. याचे चांगले फलित पक्षाला मिळाले सुद्धा होते. अशाच प्रकारे राजस्थानमधे निवडणुकीच्या तोंडावर गेहलोत आणि सचिन पायलट गटाने आपापल्या तलवारी म्यान करून सारे काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

प्रत्यक्षात तिकीट वाटपानंतर खरी स्थिती काय राहील, याचा उलघडा होणार आहे. थोडक्यात, गटबाजीच्या मुद्द्यावर राजस्थानच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

0 Shares:
You May Also Like
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…
संपूर्ण लेख

भाजपचं मराठा राजकारण विरोधकांना कधी उमगेल?

गेम ऑफ थ्रोन्स या गाजलेल्या वेबसिरीजमधील पीटर बेलीश नावाच्या एका अत्यंत धूर्त पात्राच्या तोंडी एक संवाद आहे. तो…