संपूर्ण लेख

मुख्यमंत्री बदलाच्या राजकारणामागे भाजपचं हाय कमांड कल्चर

उत्तराखंड आणि गुजरातमधल्या निष्प्रभ नेतृत्वाचा पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो हे लक्षात आल्यामुळे दोन्हीही ठिकाणी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय झालेला दिसतो. गुजरातमधे नवीन मुख्यमंत्री हे पाटीदार समाजाचे आहेत. भाजपवर नाराज पाटीदार समाजाला चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे.
संपूर्ण लेख

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित

बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही.
संपूर्ण लेख

उत्तर प्रदेशमधे भाजपची कोंडी?

अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.
संपूर्ण लेख

हिमंता बिस्वा सरमा: सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं

सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत.
संपूर्ण लेख

पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?

२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे.
संपूर्ण लेख

हैदराबादचा निकाल भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं.
संपूर्ण लेख

कसा लावायचा बिहार निकालाचा अन्वयार्थ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांविषयीच्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचं कारण मोदी हेच आहेत. घोषित केल्याप्रमाणे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण सरकारवर प्रभाव भाजपचाच असेल. दुसरीकडे बिहारच्या राजकारणावर पकड ठेवू शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिलेत.
संपूर्ण लेख

कोणत्या दिशेने वाहतायत बिहार निवडणुकीचे वारे?

महिनाभरापूर्वी जेडीयू-भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक ‘कांटे कि टक्कर’ झालीय हे निश्चित. महादलित आणि सर्व जातींमधील जात न पाहता मतदान करणारे १० ते ४० टक्के मतदार यावेळी कमी-अधिक प्रमाणात द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यांचा कौल ज्या बाजूने जाईल ती बाजू या निवडणुकीत विजयी ठरेल. निकाल कोणत्याही बाजूने असो, तो बिहार तसेच राष्ट्रीय राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारा असेल यात शंका नाही.
संपूर्ण लेख

सुशांत सिंगला न्याय की राजकारण ?

न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय.  त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे.
संपूर्ण लेख

आसाममधे ‘कांटे की टक्कर’ होणार हे नक्की!

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय.…