संपूर्ण लेख

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.
संपूर्ण लेख

खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश.
संपूर्ण लेख

ओबीसी जनगणनेचं आपण स्वागत करायचं की विरोध?

जातवार जनगणनेची केंद्राला शिफारस करण्याचे ठराव महाराष्ट्र आणि बिहार विधानसभेने मंजूर केलेत. ९० वर्षांनी म्हणजे २०२१च्या जनगणनेत ओबीसींची जातवार मोजणी होण्याचा आग्रह त्यात आहे. मात्र मोदी सरकारने जातवार जनगणनेची घोषणा करून आता यूटर्न घेतलाय. अशा जनगणनेमुळे जातीय भेद वाढतील, अशी टीका होतेय. प्रत्यक्षात मात्र यातून देशाच्या खऱ्या विकासाला सुरवात होऊ शकेल.
lock
संपूर्ण लेख

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश.
lock
संपूर्ण लेख

पाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे

पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय. 
lock
संपूर्ण लेख

शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाला खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. यंदा २०१९ ला जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख.