संपूर्ण लेख

सिद्रमप्पा आलुरे गुरुजी : नवी भावसृष्टी उभारणारा शिक्षक आमदार

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले.
संपूर्ण लेख

डॉ. बाबा आढाव :  महात्मा गांधींच्या विचारांचे खरे वंशज

सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. बाबांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच ते उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. सोपा समाजवाद आणि त्यातलं तथ्य तळापर्यंत पोचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे यांनी दाखवलेल्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली.
संपूर्ण लेख

राजीव सातव :  महात्मा गांधींच्या जीवनव्रताशी विचारनाळ असणारा नेता

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं.
संपूर्ण लेख

श्यामकांत मोरे: कम्युनिटी किचनच्या जनकाची जन्मशताब्दी

माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं.
संपूर्ण लेख

राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत.
lock
संपूर्ण लेख

महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत

महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.