संपूर्ण लेख

वॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं!

आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे.
संपूर्ण लेख

तुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई

२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.
संपूर्ण लेख

नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल?

१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील.
संपूर्ण लेख

सोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी

ब्रिटनच्या संसदेत सध्या एक निम भारतीय नाव गाजतंय. सोफिया दिलीप सिंग. शिखांचा शेवटचा राजा दिलीप सिंग याची ही मुलगी. राजघराण्याचे विशेषाधिकार, सुखसोयींवर पाणी सोडून राणी विक्टोरियाची ही मानसकन्या ब्रिटनमधल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी लढली. ब्रिटनच्या उभारणीत भारतीयांची काय भूमिका हेच सोफियाची गोष्ट सांगते. म्हणुनच ब्रिटनच्या आमदार प्रीत कौर तिचा पुतळा उभारण्याची मागणी करतायत.
संपूर्ण लेख

येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.
संपूर्ण लेख

मुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे?

केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी  लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो.
संपूर्ण लेख

समुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल?

मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे.
संपूर्ण लेख

‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी

आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं.
संपूर्ण लेख

क्लबहाऊस : सोशल मीडियाचा नवा आवाज

सोशल मीडियाचा चेहरामोहरा बदलणारं ऍप म्हणून ‘क्लबहाऊस’ची सध्या चर्चा सुरूय. एका खोलीत असताना होतो तसा संवाद या ऍपमधून एखाद्याशी करता येतो. ओळखत नसलेल्या माणसांना आपला नंबर न देता बोलता येतं. त्यामुळेच ‘लव जिहाद’ पासून आरक्षणाचं महत्त्व सांगण्यापर्यंत सगळे विषय इथं येतायत. तेही स्थानिक भाषांमधे. सोशल मीडियातली आवाजाची पोकळी ऍपनं सहजपणे भरून काढलीय.