संपूर्ण लेख

देव कुठाय? याचं उत्तर ज्ञानोबा-तुकोबांनी कधीच देऊन ठेवलंय!

संतश्रेष्ठ सावता माळी म्हणजे आमच्या सावतोबांची एक म्हसोबाची कथा आहे. ती त्यांच्या चरित्राच्या पोथीत सापडले. पडद्यावरच्या सिनेमातही सापडले.…
संपूर्ण लेख

बुद्ध तत्वज्ञान, वारकरी संप्रदाय आणि आंबेडकरी विचार

२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.
संपूर्ण लेख

गुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार

रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.
संपूर्ण लेख

प्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.
संपूर्ण लेख

ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे?

आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.
संपूर्ण लेख

राजाला ठेंगा दाखवणारा व्यंगचित्रकार अजूनही जिवंत आहे

मंजुल या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराला ट्विटरने एक ईमेल पाठवला. ‘मंजुलटुन्स’ या हँडलवरून प्रकाशित होणारा मजकूर देशाचा कायदा मोडतोय, असं केंद्राने ट्विटरला सांगितलंय. आज सत्ता व्यंगचित्रकारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करतेय. त्यांना धमक्या मिळतायत. तरीही व्यंगचित्रकार थांबलेले नाहीत. त्यांनी राजाला ठेंगा दाखवायचं थांबवलेलं नाही. ईर बीर फत्ते या गाण्यातला तो ‘हम’ आहे.
संपूर्ण लेख

या सरकारी भाषेचं काय करायचं?

सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? 
संपूर्ण लेख

प्रश्न विचारण्यातच पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे

कुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे.
संपूर्ण लेख

प्रशांत किशोर : मोदींना निवडणुकांत सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस

राजकीय पक्षाच्या बाहेरही पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी. त्यांच्यामुळेच आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रोफेशनल नेमले जातात. ते या क्षेत्रातला सर्वात मोठा ब्रँड आहे. बंगाल आणि तामिळनाडूमधल्या विजयाने तो ब्रँड आणखी मोठा झालाय.
संपूर्ण लेख

कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र एकजूट कधी होणार?

संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?