संपूर्ण लेख

भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांची फिरकी घेणारे फिरकीचे भारतीय जादूगार

आश्विन, जडेजा आणि अक्षर या भारताच्या तिन्ही स्पिनरचं कौतुक करावंच लागेल. त्यांनी संधीचा छान लाभ उठवला. प्रतिस्पर्धी बॅट्समनना…
संपूर्ण लेख

क्रिकेटच्या सर्व ऋतूंमधे बहरू पाहणाऱ्या ऋतुराज गायकवाडची गोष्ट

दर्जेदार खेळी करणार्‍या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं.
संपूर्ण लेख

कांगारुंच्या धूर्त खेळीनं भारताला वन डे सिरीजमधे चितपट केलं

कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली.
संपूर्ण लेख

लोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट

लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश.
lock
संपूर्ण लेख

सलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत

निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही.
lock
संपूर्ण लेख

नव्या वर्षात घराची सजावट करण्याआधी कलर ऑफ द इअर माहीत हवा

पॅन्टोन ही सुप्रसिद्ध अमेरिकन रंग कंपनी दरवर्षी एका खास रंग जाहीर करते. यंदा २०२० साठी पॅन्टोनने क्लासिक ब्ल्यू रंग निवडलाय. कंपनीकडून गेल्या २० वर्षांपासून डिसेंबर महिन्यात अशा प्रकारची घोषणा केली जाते. आणि मग लोक पॅन्टोनने जाहीर केलेला रंग, कपडे, घराच्या भिंती, पडदे, घर सजावट, फॅशनच्या वस्तू अशा कितीतरी गोष्टींसाठी या रंगाला पसंती देतात.
lock
संपूर्ण लेख

कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

नवीन वर्ष म्हटलं की नवं कॅलेंडर आलंच. या कॅलेंडरमधेही अनेक वेगवेगळे ट्रेंड आहेत. पूर्वी कॅलेंडरवर देवदेवतांचे फोटो छापले जायचे. आता तिथपासून आपण थेट एका पानात संपूर्ण वर्ष मावेल अशा कॅलेंडरपर्यंत येऊन पोचलोय. इतिहास आणि भविष्याचा वेध घेणारं कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवत असतं.
lock
संपूर्ण लेख

राष्ट्रपती राजवटीसाठी तत्पर असणारे राष्ट्रपती सिनेमाबद्दल उदासीन का?

राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार हा देशातल्या प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. पण मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद गैरहजर होते. राष्ट्रपती राजवटीसाठी रामनाथ कोविंदांना अतिशय तत्पर होते. पण तितकाच महत्त्वाच्या पुरस्कार सोहळयाला उपस्थित राहवंसं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी नाराजी व्यक्त केली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको.
lock
संपूर्ण लेख

‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!
lock
संपूर्ण लेख

प्रत्येक माणसात सांताक्लॉज असतोच!

नाताळ या सणाचं खासकरुन लहान मुलांमधे आकर्षण असतं. सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या गिफ्टची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. अनेकदा सांताक्लॉज म्हणून अभिनय करणारा नट इवेंट मॅनेजमेंट कंपनीकडून पुरवला जातो. पण खरंतर दया, करुणा, मुलांविषयी प्रेम मनात असेल तर कुणीही सांताक्लॉज होऊ शकतं.