संपूर्ण लेख

कळल्यावरी कुठे कशास्तव, मरणे सोपे रे ध्येयास्तव

आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं.
संपूर्ण लेख

‘हिजाब’ निकाल: पुरोगामी पेचात; प्रतिगामी जोशात!

कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

वाराणसी भेटीतला हर हर मोदीचा जोर

संविधानावरच्या एका प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने लेखक सुरेश सावंत वाराणसीमधे गेले होते. सुभाष वारे, नागेश जाधव आणि निलेश खानविलकर असे काही सहकारीही त्यांच्यासोबत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वाराणसी शहर फिरले. ते फिरत असताना त्यांना आलेले अनुभव, तिथल्या माणसांशी झालेली चर्चा, निरीक्षणं याच्या त्यांनी नोंदी केल्यात. त्या सगळ्या भटकंतीचा हा कॅनव्हास.
संपूर्ण लेख

दिशाहीन आत्मनिर्भर मानसिकतेचं काय करायचं?

सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल.
संपूर्ण लेख

समतेशी करार : जात संपवण्यासाठी आपण, समाजाने आणि सरकारने काय करायचं?

मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
संपूर्ण लेख

संविधानाच्या जागरासाठी विचारांची यात्रा करावीच लागेल

स्वातंत्र्यानंतर एक देश म्हणून आपण आपण कसं जगणार हे संविधानाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं. पण संविधानाविषयी स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळीनाही नीटशी माहिती नाही. अशा वातावरणात संविधानातल्या मूल्यांचा प्रचार करण्याचं काम सुरेश सावंतांसारखी काही मंडळी करतायत. हे काम करताना सुरेश सावंत यांना आलेले अनुभव एक समाज म्हणून आपल्याला जागं करणारे आहेत.
संपूर्ण लेख

अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’

गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही.  ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो.
संपूर्ण लेख

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?
संपूर्ण लेख

राजकारणासाठी केला जातोय मराठा आंदोलकांचा कडेलोट

दलित त्यातही बौद्धांचा विकास आरक्षणामुळे झाला. याचा ‘म्हणून आमचा विकास थांबला’ असा चुकीचा अर्थ तरूण तरूणींच्या मनात तयार होत गेला. त्याला जाणीवपूर्वक द्वेषात रूपांतर करण्याचं काम राजकारण्यांनी चोख केलं. आंदोलकांना तोफेच्या तोंडी देऊन सरकारं आपलं हित साधेल. पण आरक्षण मिळणाऱ्या समूहांबद्दलचा दुस्वास यानंतर अधिक वाढेल यात शंका नाही.
lock
संपूर्ण लेख

जो मजा साथ दौड़ने में है…

आपल्या सगळ्यांना जिंकायचंय. अव्वल बनायचंय. सबसे आगे जायचंय. या अव्वलपणाचा ताण आपण आपल्या मुलाबाळांवर टाकतोय. मग तीही सबसे आगेचा धोशा लावतात. या नादात आपण उत्तम बनणं सोडून देतोय. याविषयी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी आंदोलन मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात लेख लिहिलाय. या लेखाचा हा संपादित अंश.