तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन ३ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आयपीएलच्या निमित्ताने रस्त्यारस्त्यावर पिवळा समुद्र अवतरला तो याच धोनीसाठी, क्रिकेटच्या सुपरस्टारसाठी! महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई ही लवस्टोरी म्हणूनच विशेष रंजक आहे.
0
अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी त्याची पत्नी उपासना या जोडप्यानेही अलीकडेच एग फ्रीजिंग केल्याची माहिती समोर आली होती. यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची उत्सुकता वाढलीय. महिलांमधल्या वाढत्या वयात घटत जाणार्या प्रजननक्षमतेच्या आणि वंध्यत्वाच्या समस्येवर एग फ्रीजिंग हे वरदान ठरतंय.
0
अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर. तब्बल ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराच्या वैभवात गगनचुंबी इमारतींनी मोलाची भर टाकली. पण सध्या याच मोठ्याल्या इमारतींमुळे न्यूयॉर्क शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय. इमारतींमुळे शहरावरचा भार वाढतोय. जमिनी खचतायत. त्यामुळे न्यूयॉर्क शहराचा लवकरच 'जोशीमठ' होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.
0
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या नाट्यमय घडामोडी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या या घडामोडींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांनाच आपल्या अवतीभवती खिळवून ठेवलंय. मनोरंजनाच्या चंदेरी दुनियेतही याचे पडसाद उमटलेत. डिज्नी-हॉटस्टारवर गाजलेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा नुकताच रिलीज झालेला तिसरा सीझन हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे.
0
तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झालेले एर्दोगान पूर्वी ब्रेड आणि सरबत विकायचे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल वाद आहे. धर्म हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. सर्व सत्ता स्वतःकडे असावी अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेची वाट लावली, असा त्यांच्यावर आरोप होतोय. तरीही त्यांना मिळालेला निसटता विजय भारतासाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा भारतद्वेष लपलेला नाही.
0
दिल्लीपाठोपाठ पंजाबमधली सत्ता आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर अरविंद केजरीवालांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. दिल्लीतल्या प्रशासकीय अधिकारांवरुन केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मुद्दा पुढे करून त्यांनी विरोधकांना एकीची हाक दिलीय. विरोधकांच्या या मोटबांधणीत काँग्रेससोबत की काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी यामधे केजरीवाल कोणत्या बाजूने जातात हे पाहणं रंजक ठरेल.
0
नोवेंबर २०१६मधे केंद्र सरकारने ५०० आणि १ हजारच्या नोटा रद्द करण्याचा म्हणजे नोटबंदीचा निर्णय घेतला. आता आरबीआयने ‘क्लिन नोट पॉलिसी’नुसार २ हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. नोटबंदीचं एक मोठं ध्येय डिजिटल अर्थव्यवस्थेचं होतं. या उद्देशातून पाहिलं तर आरबीआयच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आज २८ मे. ‘पद्मभूषण’ भाई माधवराव बागल यांची जयंती. भाई माधवराव बागल हे महाराष्ट्रातल्या प्रबोधनात्मक चळवळीतलं मोठं नाव. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावात वाढलेल्या माधवरावांनी सामाजिक सुधारणा चळवळींसोबतच पत्रकारितेतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांचं विश्लेषण करणारा हा विशेष लेख.
संवाद हा लोकशाहीचा पाया आहे. भले एकमेकांचे विचार पटले नाहीत, तरीही विरोधी मताबद्दल आदर बाळगून त्यांच्याशी संवादप्रक्रिया सुरू ठेवणं, हा लोकशाहीचा मुलभूत विचार आहे. पण जगातली सर्वात मोठी लोकशाही असा अभिमान मिरवणाऱ्या भारताच्या नव्या संसेदेच्या इमारतीच्या संकल्पनेपासून आता उद्घटानपर्यंत अनेक वाद झाले आहेत. उद्घाटन जवळ आले तरी हे वाद संपताना दिसत नाहीत.
नरभक्षकांचा देश, काळी जादू करणारा देश, महिलांसाठी असुरक्षित देश अशी भयानक ओळख असलेला देश पापुआ न्यू गिनी गेले काही दिवस चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींचं या देशानं केलेलं स्वागत आणि त्यांना दिलेला पुरस्कार यामुळे या देशाबद्दल भारतात अनेकांना कुतुहल वाटतंय. आजही इथं फार मोठी लोकसंख्या रानटी आयुष्य जगत असून, या देशाबद्दल फारसं चांगलं लिहिलं-बोललेलं सापडत नाही.
धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत.
कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय.
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
भूतलावरच्या जैवविविधतेपैकी २० टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्मजीवांविषयी मानवाला माहिती आहे, असं म्हटलं जातं. याबद्दलच्या संशोधनांमधून अनेक नवीन प्रजाती जगासमोर येत असतात. निसर्गामधे नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणाने सुरु असते. दर पाच-दहा वर्षांनी याबद्दलचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आज जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने, या अभ्यासाचं महत्त्व समजून घ्यायला हवी.
जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्कने ट्विटर आपल्या ताब्यात घेतल्याचं कित्येकांना अजूनही आवडलेलं नाही. सीईओ म्हणून मस्क करत असलेला आडमुठेपणा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसोबतच वापरकर्त्यांनाही त्रासदायक ठरू लागलाय. हा त्रस्त ग्राहकवर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी अनेकजण ट्विटरसारखा दुसरा प्लॅटफॉर्म बनवू पाहतायत. ट्विटरमधून हकालपट्टी झालेल्या माजी संस्थापक जॅक डॉर्सीचा 'ब्लूस्काय' हा नवा प्लॅटफॉर्मही त्यापैकीच एक आहे.
तुर्कस्तानात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. बहुसंख्य मुसलमान असलेल्या तुर्कस्तानातलं वैचारिक ध्रुवीकरण सध्या तरी माजी राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या पथ्यावर पडतंय. एकेकाळी कट्टर धर्मनिरपेक्षतेसाठी ओळखल्या जाणार्या तुर्कस्तानच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी यशस्वीरित्या इस्लामचं स्थान केलंय. याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी किलिकदरोग्लु यांची भूमिका धर्म आणि राजकारणाची फारकत करतेय.
तुम्ही सतत मोबाईलवर स्टेटस चेक करता का? फोन विसरलात तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? प्रवासात तुमच्या फोनचं चार्जिंग संपत आलं तर तुम्हाला टेन्शन येतं का? तुमचा फोन रात्री झोपतानाही तुमच्या हाताशी असतो का? अशा प्रश्नांची उत्तरं हो असतील तर यालाच नोमोफोबिया म्हणतात. आरोग्याची हळहळू वाट लावणारा हा नोमोफोबिया भारतातल्या चारपैकी तीन स्मार्टफोनधारकांना झालाय.
डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत.
'बेबी काम डाऊन' हे गाणं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतंय. खरं तर गाणं रिलीज होऊन एव्हाना एक वर्ष झालंय. हे गाणं गाणारा रेमा नावाचा नायजेरियन रॅपर नुकताच भारत दौऱ्यावर येऊन गेला. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमधे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टला त्याच्या असंख्य भारतीय चाहत्यांसोबतच इथल्या सेलिब्रिटींनीही दमदार हजेरी लावली होती.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा भौगोलिक प्रश्न राहिला नसून, तो आता भावनिक प्रश्न झालाय. सीमाभाग महाराष्ट्रात यावा यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत असल्याचे आकडे सांगतायत. त्यामुळे समितीनं आता महाराष्ट्रात येण्यासाठी लढण्याऐवजी, आधी मराठी भाषा-संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं ठरणार आहे.
महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांनी महाराष्ट्र घडवलाय. पण पुढे या दोन सांप्रदायात एवढं वैर निर्माण झालं की दोघे एकमेकांची तोंड बघेनात. अशा परिस्थितीत या दोन सांप्रदायाचा अभ्यास करून, समन्वयाची मांडणी करणाऱ्या महंत बाभुळगांवकर भोजराज शास्त्री यांना यंदाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' मिळालाय. त्यानिमित्त 'वारकरी दर्पण'साठी ज्ञानेश्वर बंडगर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत इथं देत आहोत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय.
आपल्या देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. जिद्दीला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षांची जोड दिली तर सर्वोच्च यश मिळवताना भाषेचा अडसर येत नाही हेच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी दाखवून दिलंय. या जोडीने नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. या कामगिरीमुळे त्यांच्याकडून आगामी काळात अपेक्षा उंचावल्या आहेत.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेससाठी कर्नाटक निकाल नवसंजिवनी देणारा ठरलाय. या निकालानं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या आशा आणि उत्साह दुणावल्या असून हा विजय काँग्रेसला सापडलेलं ओयॅसीस आहे. पण यापलीकडेही पाहायला हवं. या निकालानं राष्ट्रीय राजकारणात अनेक संदेश देण्याबरोबरच अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत.
कर्नाटक निवडणुकीनं अनेक मुद्दे स्पष्ट केलेत. मोदींचा करिष्मा आणि हिंदुत्वाचा प्रोपगंडा हा शेवटी महागाई, बेरोजगारीपुढे फिका पडतो, यावर कर्नाटकनं शिक्कामोर्तब केलंय. फोडाफोडी, धाकदपटशाही करून सरकार आणता येतं पण लोकांचा विश्वास जिंकता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातही भाजपची लाज गेलीय. या सगळ्यामुळे भविष्यात कर्नाटकची पुनरावृत्ती होऊ शकेल.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी महाराष्ट्राच्या मातीत मशागत सुरु केलीय. रावांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना फुटलेल्या धुमार्यांची ही परिणती आहे. महाराष्ट्रातून हळूहळू उत्तर भारतात जाण्याचा रावांचा इरादा आहे. रावांच्या महत्त्वाकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी त्यांना तेलंगणाबाहेर जनाधार मिळण्याच्या शक्यता अत्यंत धुसर आहेत.
जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे.
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधे २०२७नंतर डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने केंद्र सरकारला दिलाय. या निर्णयानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाची हानी वाचेल, तसंच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीही मदत होईल. पण, दुसरीकडे यामुळे व्यवस्थेत थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे.
'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय.
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही.
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?