अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य.
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.
सध्या ओडिशामधे हॉकी वर्ल्डकप सुरू आहे. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीचा जगभर बोलबाला होता. पण १९८०नंतर त्याला उतरती कळा लागली. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या प्रवेशासाठीही भारतीय हॉकी टीमला झगडावं लागायचं. त्याच हॉकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतायत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचं हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं क्रीडा धोरण त्याला कारण ठरतंय.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने १९९१ पासून कॅन्सरच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार अमेरिकेतल्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूमधे ३३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे ३८ लाख कॅन्सर पेशंटचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात आहे. भारतामधे कॅन्सरवरच्या संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.