तंबाखूविरोधी दिवस: तंबाखू खाणाऱ्यांमुळेच आपल्याला या १० गोष्टी कळाल्या

३१ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी.

१९८८ पासून म्हणजे गेल्या ३२ वर्षांपासून दरवर्षी ३१ मे हा दिवस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून तंबाखूविरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात १३० कोटी लोकांना तंबाखूचं व्यसन असल्याचं डब्लूएचओच्या आकडेवारीतून समोर आलंय. हे असंच चालू राहीलं तर २०२५ पर्यंत जगभरात १६० कोटी लोक तंबाखूच्या आहारी जातील अशी शंका डब्लूएचओनं वर्तवलीय. साहजिकच, तंबाखूमुळे होणाऱ्या आजाराने मरणाऱ्यांची संख्याही वाढेल.

हे सगळं कळत असलं, वळत असलं तरीही लोकांना काही तंबाखू सोडवत नाही. तंबाखूनं कित्येक घरदारंही उद्ध्वस्त केलीयत. मुलांच्या शालेच्या फीया खाल्ल्यात, चांगल्या अन्नावर खर्च करायचा पैसा या तंबाखूमुळे अक्षरशः पाण्यात गेलाय. त्यामुळेच या व्यसनाला सगळं जग नावं ठेवतं. त्यामुळेच तंबाखूचं व्यसन असणारा प्रत्येक माणूस व्यसनमुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. पण त्यासोबतच मनोमन आपण तंबाखू व्यसनाचे आभारही मानायला हवेत.

हो. लोकांना तंबाखूचं व्यसन लागलं म्हणूनच तर आपण तंबाखूवर इतकं संशोधन करू शकलो. त्याच्या औषधी गुणधर्मांसोबत त्याच्या धोकादायक वृत्तीविषयी माहिती करून घेऊ शकलो. त्याच्या बहारदार इतिहासाची गोष्ट आपल्याला कळाली. यासाठी तंबाखू व्यसनाला आपण थँक्स म्हटलंच पाहिजे.

हेही वाचा : तंबाखूविरोधी दिवसः तंबाखू कंपन्या तरुणांनाच आकर्षित करण्यासाठी कॅम्पेन का राबवतात?

आज ३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिवस. या निमित्ताने तंबाखूविषयीच्या १० इंटरेस्टिंग गोष्टी माहीत करून घ्यायलाच हव्यात.

१. कित्येक शतकं तंबाखू ही औषधी वनस्पती मानली जायची. ज्या झाडापासून तंबाखू मिळते त्या निकोटिना या वनस्पतीला सोळाव्या शतकात पवित्र औषधी वनस्पती किंवा  देवाचं औषध असं म्हटलं जायचं.

ही वनस्पती शोधून काढणारा माणूस होता निकोलस कोलंबस. जगभ्रमंती करायला निघालेला हा माणूस आजच्या क्युबामधे पोचला. तेव्हा त्या बेटावरचे लोक तंबाखू पाईपमधे टाकून ओढत असतं. ती माणसं कधीकधी एखादी जागा निर्जंतुक करण्यासाठी आणि रोग दूर करण्यासाठी तंबाखूची पानं जाळायची. कोलंबसने हे रोप युरोपात आणलं.

२. तंबाखू म्हणजे खरंतर वनस्पती असते. या झाडाची पानं वाळवून, त्याची पूड करून त्यावरून प्रक्रिया करून ही तंबाखू वेगवेगळ्या पदार्थात भरली जाते. पाईप, सिगारेट, हुक्का, ई-सिगारेट, गायछाप अशा अनेक पदार्थांतून तंबाखू विकला जातो. यापैकी सिगारेट हे सगळ्यात प्रसिद्ध माध्यम आहे.
तंबाखूचं व्यसन असलेले बहुतांश लोक नियमितपणे सिगारेट पितात. तंबाखूमधे असलेल्या निकोटीन या द्रव्यामुळे आपल्याला त्याचं व्यसन लागतं. सिगारेट पिणाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही याचा फटका बसतो.

३. तंबाखूचं व्यसन असणारी माणसं व्यसन न करणाऱ्या माणसांपेक्षा १० वर्ष लवकर मरतात, असं संशोधनातून सिद्ध झालंय. सिगारेट आणि तंबाखूमुळे दरवर्षी जवळपास ५० ते ८० लाख लोक मरतात. सिगारेट संबंधित आजारामुळे एका माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या सिगारेट पिण्यामुळे अंदाजे २० लोकांना सिगारेट संबंधित आजार झालेले असतात.

अमेरिकेत तर दरवर्षी ५ मृत व्यक्तींमधल्या एकाचा मृत्यू धुम्रपानामुळे होतो. थोडक्यात, अमेरिकेत तंबाखूमुळे दरवर्षी ४ लाख ८० हजार मृत्यू होतात तर त्यातले ४१ हजार मृत्यू हे धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या सतत संपर्कात आल्यामुळे झालेले असतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

४. दररोज जगभरातली १८ वर्षाखालची ३२०० मुलं आपल्या आयुष्यातली पहिली सिगारेट ओढतात. तर प्रौढ व्यक्तींपैकी दररोज २१०० लोकांना सिगारेटचं व्यसन लागतं. सिगारेटमधे हजार रायानिक पदार्थ असतात. त्यापैकी ७० पदार्थांमुळे माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. सिगारेट पिणाऱ्या १० पैकी ९ लोकांना १८ वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच सिगारेट प्यायचं व्यसन लागलेलं असतं.

५. तंबाखूमुळे कॅन्सर होतो, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत झालंय. पण त्याचसोबत सिगारेटसारख्या तंबाखूच्या प्रकारामुळे हृदयाचे आजारही होतात. काहींच्या मेंदूंचा भाग डॅमेज होऊन शरीराला लकवा बसण्याची शक्यता असते. डायबेटीस आणि फुफ्फुसाचे आजारही धुम्रपानामुळे होतात.

अमेरिकेतली १ कोटी ६० लाख लोकसंख्या तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांसोबत जगतेय. शिवाय, तंबाखूमुळे फक्त तोंडाचाच कॅन्सर होतो असं नाही. तर मुत्राशय, रक्त, हाडं, गर्भाशय, किडनी, यकृत, स्वादुपिंड आणि घसा अशा कुठल्याही अवयवाचा कॅन्सर होतो.

६. धुम्रपानाचा प्रश्न सगळ्यात जास्त गरीब लोकांनाच सतावत असतो. जगात तंबाखूचं व्यसन करणाऱ्यापैकी ८० टक्के लोक गरीब किंवा विकसनशील देशातले असतात. अमेरिकेसारख्या विकसित देशातही तंबाखूचं व्यसन करणाऱ्यापैकी २४.३ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली जगतात आणि १४.३ टक्के लोक मध्यमवर्गीय असतात.

७. सिगारेटमधे १०० ते ४०० मिलिग्रॅम निकोटीन असू शकतं. तर एका सिगारेटमधे साधारणतः आठ ते नऊ मिलिग्रॅम इतकं निकोटीन असतं. सिगारेटच्या एका झुरक्यातून एक ते दोन मिलिग्रॅम निकोटीन शरीरात जातं आणि त्यातलं ०.०३ रक्तात शोषून घेतं.

दर मिनिटाला १ कोटी सिगारेट खरेदी केल्या जातात. दररोज १५०० कोटी सिगारेट विकल्या जातात. साधारणतः ५ अब्ज सिगारेट दरवर्षी निर्माण केल्या जातात आणि तितक्याच विकल्याही जातात. यातून सिगारेट आणि तंबाखू कंपन्यांना किती जास्त फायदा होत असेल याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही.

हेही वाचा : ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?

८. भारतात तंबाखू बनवणाऱ्या कंपनीत सगळ्यात वरचं नाव आयटीसी या कंपनीचं नाव घेतलं जातं. या कंपनीच्या शेअर्सला बाजारातही चांगला भाव आहे. महिन्याला साधारण १२४६४ कोटी रुपयांचा नफा ही कंपनी कमावते. 

मात्र, अमेरिकन लंग असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, तंबाखूबाबत झालेल्या संशोधनचा खरा डाटा जगभरातल्या कंपन्या लपवून ठेवतात. निकोटीनचं व्यसन लागतं हे मान्य करायलाच त्या तयार होत नाहीत. तसंच, धुम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही धुम्रपानाचा धोका असतो हेही त्या मान्य करत नाहीत.

शिवाय, आपल्या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी चुकीची जाहिरात करणं, आकर्षक पॅकेजिंग करणं, नवीन आलेलं उत्पादन जुन्यापेक्षा कमी धोकादायक आहे, असा दावा करणं असे अनेक डावपेच या कंपन्यांकडून खेळले जातात.

९. तंबाखू पदार्थांमधे सिगारेट ही सगळ्यात जास्त प्रसिद् असली तरी महिलांच्या तुलनेत पुरूष जास्त सिगारेट ओढतात. डब्लूएचओच्या आकडेवारीनुसार, जगभरातल्या पुरूषांपैकी ४० टक्के पुरूष सिगारेट ओढतात. या तुलनेत फक्त ९ टक्के महिलांना सिगारेट आणि तंबाखूचं व्यसन असतं.

१०. ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वेच्या २००९-१० च्या अहवालानुसार, भारतात १२ कोटी लोक तंबाखूचं सेवन करत होते. याचा अर्थ ८ भारतीयांमागे एकाला तंबाखूचं व्यसन आहे. भारतातले ३५ टक्के लोक १५ वर्षानंतर तंबाखू वापरायला सुरवात करतात. तर ग्लोबल रिपोर्ट ऑन मॉर्टेलिटीच्या २०१२ च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी १० लाख लोक तंबाखूसंबंधित आजाराने मरतात.

भारतात २००३ मधे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा झाला. या कायद्या अंतर्गत तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करण्यावर बंदी घालण्यात आली. तसंच या उत्पादनांच्या निर्मितीवर आणि विक्रीवर काही बंधनं लादली गेलीत. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचं सेवन करण्यावर आणि १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावरही बंदी घालण्यात आलीय. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

हेही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

माझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही

साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शताब्दी : अस्मितेच्या नेतृत्वाचा युगारंभ

लग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक