आपल्याला वर्षही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय

१३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


न्यूझीलंडमधे एक पोपट सापडलाय. पण पोपट सापडल्याची काय बातमी होते का, असं आपल्याला वाटेल. पण हा पोपट जगातला सगळ्यात भव्यदिव्य म्हणून ओळखला जातोय. याचं वयही आपण सहज मोजू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पोपट आपण बघितलेल्या आतापर्यंतच्या पोपटांसारखा उडतपण नाही.

विठु विठु, विठु विठु असा पोपटाचा आवाज हल्ली कानावर पडतच नाही. पोपट हा पक्षी किती माणसाळलेला असतो. पूर्वी मुंबईतल्या लालबाग, परळमधल्या चाळीत हमखास कोणच्या ना कोणाच्या दारासमोर पिंजऱ्यात पोपट असायचाच. आणि तो पोपट बऱ्याचदा तयार असायचा. म्हणजे जे आपण बोलू तेच तो बोलायचा. तर आज आपण एका भव्यदिव्य आणि प्राचीन पोपटाबद्दल जाणून घेणार आहोत.

१ कोटी ९० लाख वर्षांचा पोपट

न्यूझीलंडमधे जगातला एक दुर्मिळ पोपट सापडलाय. म्हणजे त्या पोपटाचा सांगाडा सापडलाय. आणि हा सांगाडा चक्क १ कोटी ९० लाख वर्षांचा असल्याचं या क्षेत्रातले जाणकार सांगताहेत. त्याच्या हाडांच्या चाचणीवरुन हे समजलंय. याचं वजन ७ किलो आहे. आणि याची उंची १ मीटर आहे. म्हणजे हा पोपट जवळ जवळ साधारण उंचीच्या माणसाच्या कंबरेपर्यंत पोचेल एवढा आहे. असा भव्य पोपटाचा सांगाडा संशोधकांच्याच नाही तर आपल्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलाय.

जगभरात पोपटाच्या ९२ प्रजाती आणि ३९३ पोटजाती आहेत. भारतात अलेक्झॅन्ड्रिन, प्लम हेडेड, रेड-ब्रेस्टेड, मलबार, हिमालयन फिन्श पॅराकिट्स, वर्नाल हँगिंग पॅरट या प्रजातींचे पोपट आढळतात. आणि सगळ्यात लोकप्रिय असलेला आणि आपण ज्याला नेहमी चित्रात किंवा कोणाच्या तरी घरी बघतो तो म्हणजे रोजरिंग्ड प्रकारच्या प्रजाती पोपट असतो.

सर्वसाधरणपणे पोपटाचं वय हे २० ते ९५ वर्ष एवढं असतं. भारतातली पोपटं २० ते ४० वर्षं जगतात. तसंच या पोपटांची उंची साधारण ८ ते १०० सेंटीमीटर असते. आणि वजन २ ते ४ किलो असतं. पण न्यूझीलंडमधे सापडलेला पोपट अगदी जगातला सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली पोपट आहे. आंतरराष्ट्रीय पॅलेओन्टोलॉजिस्ट टीमने हा सांगाडा शोधलाय. आणि त्यांनी दिलेला अहवाल रॉयल सोसायटी पब्लिशिंगच्या बायोलॉजी लेटरमधे छापून आलाय.

हेही वाचा: सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!

ग्रीक पुराणातल्या सुपरहिरोवरून ठेवलं नाव

न्यूझीलंडमधे सापडलेल्या या शक्तिशाली पोपटाचं नाव हरक्युलस असं ठेवण्यात आलंय. हरक्युलस हा ग्रीक पुराणातला सुपरहिरो. त्याच्यासारखेच गुण या पोपटात असल्यामुळे त्याचं या ग्रीक सुपरहिरोच्या नावावरुन ठेवलं. न्यू साऊथ वेल्स युनिवर्सिटीने एक प्रसिद्धीपत्रक काढलं. त्यात लिहिलंय, हरक्युलस पोपटाचा रंग थोडासा कबूतरासारखा असण्याची शक्यता वर्तवली. याची चोच, शेपटी ही खूप मोठी आहे. हा आकारानेही बराच लांब आहे. हा पोपट म्हणजे अगदी एखाद्या कथा, कादंबरीत रंगवलेल्या कल्पनेसारखा वाटतोय. अशाप्रकारचा पोपट होता आणि आता त्याचा पुरावा सापडलाय. यावर लगेच विश्वासच बसत नाही. अगदी लोकांनाही सुरवातीला असचं वाटलं.

याच पत्रकात मायकर आर्चर म्हणतात, आता हा पोपट आपल्या अन्न साखळीत कुठे येतो? तो कसा राहतो? त्याची वैशिष्ट्य काय? तो काय खात असेल? या प्रजातीचा पोपट आणखी कोणत्या प्रदेशात असेल? इत्यादी सर्व मुद्द्यांवर संशोधन करण्यात येईल. आर्चर हे पॅलेओन्टोलॉजिस्ट म्हणजे संशोधक आहेत. तसंच ते अहवालाचे सहाय्यक लेखक आहेत. आणि ते न्यू साऊथ वेल्स युनिवर्सिटीत प्राध्यापक म्हणूनही काम करतात.

साधारणपणे आकाशात १२ हजार मीटर उंचीवर पोपट उडतात. पण आपला हा हरक्युलस पोपट मात्र उडतच नाही. म्हणजे तो सापळा आहे. पण याप्रकारातले पोपट उडू शकत नाहीत. ही गोष्ट सापळ्याच्या आकारावरुन समजली. तो प्लाइटलेस म्हणजे न उडणारा पक्षी आहे. असे अनेक न उडणारे पक्षी आहेत. पण पोपट हा उडणाऱ्या पक्ष्यांपैकी आहे. हा पोपट वजन आणि वयोमानामुळे शेवटच्या टप्प्यात उडत नसावा या शक्यतांवरही शोध घेऊ, असं आर्चर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

पोपटाची हाडं शेवग्याच्या शेंगांसारखी

ऑस्ट्रेलियातल्या फ्लिंडर्स युनिवर्सिटीतले ट्रेवॉर वर्थी यांनी फोर्ब मासिकाला सांगितलं, या पोपटाच्या पायांची हाडं ही २००८ मधे सापडलेल्या एका गरुडाच्या हाडांसारखी दिसतात. त्यामुळे हा पक्षी नेमका पोपटच का यावरही शोध घ्यावा लागेल. गंमत म्हणजे त्याची हाडं ही शेवग्यांच्या शेंगांसारखी भासतात. तो बदक किंवा कबूतराच्याही जातीतला असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

दक्षिण न्यूझीलंडमधे घनदाट जंगलं आहेत. तिथे याआधीही बरेच दुर्मिळ आणि २० ते ४० वर्षांचे प्राणी, पक्षी सापडलेत. तसंच १०० वर्षांपूर्वीच्या पक्ष्यांचे सापळेही सापडलेत. त्यामुळे गेल्या ५ वर्षांपासून संशोधकांचा ओढा न्यूझीलंडकडे आहे. आणि म्हणूनच जगातल्या सगळ्यात भारी पोपटाचाही शोध लागला, असं पॉल स्कोफिल्ड यांनी म्हटलं. स्कोफिल्ड हे कॅन्टबरी म्युझियमचे नेचर हिस्ट्रीचे प्रमुख आहेत. हे म्युमझियम न्यूझीलंडमधे आहे.

येत्या काळात या पोपटाच्या सापळ्यावर संशोधन होईल. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि त्याची इतर माहिती समजेलच.

हेही वाचा: 

गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?

नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?