मोदी गेले होते तो किर्गीझस्तान नावाचा देश आहे तरी कसा?

१६ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


नुकतेच पंतप्रधान किर्गीझस्तानच्या राजधानी बिशकेकला जाऊन आले. तिथे एससीओ समिट होतं. समिट तर नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यातलं टशन, मिटींगवरुन चर्चेत आलं. पण ही एससीओ परिषद, किर्गीझस्तान, बिशकेक यांच्याबद्दल समजून घ्यायला हवं.

जगात एकूण किती देश असावेत? १९५, १९७ की २००? सध्या १९५ देशांचे एकमेकांशी व्यावहारिक संबंध आहेत. आणि ते जागतिक देशांच्या यादीत येतात. पण त्या पलिकडेही बरेच देश आहेत पण त्यांना देश म्हणून मान्यता मोठ्या देशांनी दिलेली नाही, असं यूएमधल्या जागतिक विकासाची सांख्यिकी मांडणी करणऱ्या वर्ल्डमीटर कंपनीने सांगितलं आहे.

मोदींमुळे नवनव्या देशांची नावं समजतात

पण ह्या १९५ देशांपैकी आपल्याला किती देशांची नाव माहिती आहेत? फुटबॉल खेळणाऱ्या देशांव्यतिरीक्त अगदीच कमी देश आपल्याला माहितीयत. मागच्या पाच वर्षांपासून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातल्या देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी परदेश दौरे करतायत त्यामुळे काही देशांची नावं आपल्याला माहिती होतात.

नुकताच पंतप्रधानांचा किर्गीझ किंवा किर्गीझस्तानचा दौरा केला. किर्गीझस्तानच्या राजधानीत म्हणजेच बिशकेकमधे एससीओ म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेला गेले होते. दोन वर्षांपूर्वी भारताला एससीओच पूर्ण  सदस्यत्व मिळालं.

हेही वाचा: कुणालाही न उलगडलेले मिखाईल गोर्बाचेव

ही एससीओ परिषद काय आहे?

एससीओमधे १९९६ पासून चीन, कझाकस्तान, किर्गीझस्तान, रशिया, तझिकिस्तान इत्यादी देश होते. तर २००१ मधे उझबेगिस्तानचा समावेश केला. तर २०१७ मधे  भारत आणि पाकिस्तानला सामील करून घेतलं. सध्या अफगानिस्तान, इराण, मंगोलिया हे देश ऑब्झरवर स्टेटसवर ठेवलेले आहेत. तर भारतही २००५ पासून ऑब्झरवर स्टेटसवर होता. 

एससीओ म्हणजे एकप्रकारची सहकारी संस्था आहे. यातले देश एकमेकांना राजकीय, आर्थिक आणि देशाच्या सुरक्षेत मदत करण्यासाठी याची उभारणी केलीय. या परिषदेत मोदींनी म्हटलं की, आधुनिक जगात कनेक्टिवीटी महत्त्वाची आहे. इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचा उल्लेख करत त्यांनी मुंबई आणि दिल्लीचं महत्त्व स्पष्ट केलं. हा ७२०० किमी लांबीचा मल्टीमोड म्हणजे जलमार्ग, लोहमार्ग आणि रस्ते अशा स्वरुपाचा आहे.

आपण किर्गीझस्तानशी मैत्री करणार आहोत

तसंच भारताची ई-विसा सर्विस एससीओ देशांना प्राधान्य देईल. त्याचबरोबर भारताची पर्यटन वेबसाईटची हेल्पलाईन २४ तास रुसी भाषेत लवकरच सुरु होणार आहे. तसंच मोदींनी ट्विटरवर लिहिलंय की, त्यांचं किर्गीझच्या राष्ट्राध्यक्ष सुरोनबाई जिनबेकोव्ह यांच्याबरोबर मिटींग झाली. त्यानुसार २०२१ हे वर्ष भारत आणि किर्गीझस्तान यांच्यातलं मैत्री आणि सांस्कृतिक वर्ष म्हणून साजरं करण्यात येईल.

आता आपण किर्गीझशी मैत्री करू, सांस्कृतिक देवाण घेवाणही करू पण त्याआधी देशाची माहिती करून घ्यायला हवी. किर्गीझस्तान हा मध्य आसियाई देश आहे. पूर्वी हा देश सोविएत युनियनचा भाग होता. पण १९९१ मधे किर्गीझ युनियनमधून बाहेर पडले. आणि ३१ ऑगस्ट १९९१ ला स्वतंत्र देश म्हणून जगासमोर आले.

हेही वाचा: जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय

किर्गीझ म्हणजे आदिवासी

किर्गीझस्तान किंवा किर्गीझ हा शब्द नेमका काय आहे असा प्रश्न सहज आपल्या मनात येतो. तर किर्गीझ ही आदिवासी जमात आहे. जी खरंतर पहिल्या शतकापासून येंसेईच्या खोऱ्यात म्हणजेच मध्य सायबेरीयामधे राहणारे होते. पुढे हा समाज दक्षिण सायबेरीयापर्यंत पसरला. 

पण हळूहळू मंगोलियन, चायनीज, युरोपीयन, मुस्लिम राजांनी राज्य केलं. पण ही जमात नेहमीच मुख्य प्रवाहापासून लांब राहिली. या जमातीतली लोकं दिसायला गोरे पण के मात्र लाल रंगाचे असतात.

पुढे हा प्रदेश सोविएतच्या अंतर्गत आला. या प्रदेशाच नाव किर्गीझ आणि नंतर किर्गीझस्तान पडलं. खरंतर हे मोठं शहर होतं. १९९१ नंतर याला देशाचं रुप आलं १९९३ ला त्यांनी आपलं संविधान बनवलं आणि देशात लोकशाही प्रस्थापित झाली.

हेही वाचा: मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

किर्गीझमधेही फास्ट फूड

या देशाचं क्षेत्रफळ १ लाख ९९ हजार चौरस मीटर आहे तर याची लोकसंख्या ६ लाख आहे. इथे किर्गीझ, मुस्लिम, ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणात राहत आहे. तर यांची भाषा प्रामुख्याने किर्गीझ, तुर्की आणि रशियन आहे. 

यांचा पारंपरिक पोषाख म्हणजे काफ्तानसारखा लांब ड्रेस आणि नक्षीकाम केलेली टोपी. महिला आणि पुरुष सारखे कपडे घालतात पण त्याची डिझाइन वेगळी असते. मोदींनी यांच्या पारंपरिक पोषाखातले फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत.

यांचा मुख्य सण म्हणजे मार्चमधे येणार नवं वर्ष ज्याला ते नवरूझ असं म्हणतात. तिथले पारंपरिक पदार्थ म्हणजे बीफ आणि घोड्याचं मांस. आजही इथल्या जवळपास सर्व पदार्थांमधे यांच मांस वापरलं जातं. 

काही प्रसिद्ध पदार्थांमधे डंम्प्लिंग्ज, नूडल्स, भात, काळी चहा, थंड सूप, लेअरींग करून फावलेल्या भाज्या ज्याला ते ओरोमो असं म्हणतात. आता तिथे मॅकडॉनल्डसारखे फास्ट फूड आलेलं आहे.

हेही वाचा: पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

किर्गीझस्तानमधे स्वस्तात फिरूया

हा विकसनशील देश आहे. इथे अद्यावत सोयी सुविधा यायच्या आहेत. इथला पारंपरिक व्यवसाय शेती. पण इथे सोने आणि इतर धातूच्या, कोळशाच्या खाणी तसंच खनिज तेलाच्या विहिरी असल्यामुळे लोक यात जास्त काम करतात तसंच या कच्च्या मालाच्या प्रोसेसिंग त्यापासून बनवणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. या देशाचं चलन सोम आहे. आपल्या देशातले १०० रुपये त्यांच्या देशाचे ९९.९६ सोम होतात.

त्यामुळे या देशात फिरणंही स्वस्तात होतं. पण इथे आहेत का काही फिरण्यासारखी ठिकाणी? हो, २० च्यावर नॅशनल पार्क आहेत, ट्रेकिंगसाठी उत्तम जागा आहे तसंच इथे रशियन संस्कृती, किर्गीझ संस्कृतीचं दर्शन होतं. इथे आपण निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.
 
आणि किर्गीझचा विसाही १० दिवसांतमधे साधारण ३० दिवस राहण्यासाठी मिळतो. प्रत्येक देशासाठी विसा मिळण्याचे नियम वेगळे आहेत.

राजधानी बिशकेकचं वैशिष्ट्य काय?

या देशाची राजधानी बिशकेक. जिथे आपले पंतप्रधान गेले होते. या शहराचं नाव १८६२ मधे रशियन राजाने फिशकेक केलं. तर सोविएतन सोशलिस्ट रिपब्लिकने रेड आर्मी लीडर मिखाइल फ्रून्झला आदरांजली म्हणून शहराचं फ्रून्झ असं नामकरण केलं. शेवटी १९९१ ला किर्गीझला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपलं जुनं नाव बिशकेक वापरात आणलं आणि त्याला मान्यता दिली.

बिशकेक हे राजधानीचं शहर असल्यामुळे इथे शैक्षणिक संस्था, युनिवर्सिटी, कंपन्या, सरकारी ऑफिस, मीडिया आहे. इथल्या लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोक डिजिटल मीडिया वापरतात. इथले बहुतांश लोक शहरातच एकवटलेले आहेत. 

बिशकेकचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आजही रस्त्यांच्या दुतर्फा मोठी, विखुरलेली झाडं आहेत. तसंच वर्ल्डवॉरमधे वापरलेली बहुतांश शस्त्रास्त्र बिशकेकमधे बनवून पाठवण्यात आली होती.

पण तरिही या देशासमोर पाणी, जमिन, वायू प्रदूषणाची मोठी समस्या आहे. हा देश जगभरात धातूच्या वस्तू, पट्रोलियम प्रोडक्ट निर्यात करतो. म्हणून किर्गीझ शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावलं उचलत आहे.

हेही वाचा: हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान