मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

१५ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आय एम लविंग इट, ही टॅगलाईन कोणाची? यस्स बरोब्बर, मॅकडोनल्ड म्हणजेच आपलं आवडतं मॅकडी किंवा मॅक. दोन भावांनी सुरु केलेल्या खाऊच्या स्टॉलचं पुढे छोटेखानी रेस्टॉरंट झालं. आणि आता ती जगातली सर्वात मोठी फास्टफूड रेस्टॉरंटची चेन बनलीय. मॅकच्या बर्गरमुळे खाणाऱ्याची अवस्था हे खाऊ का ते खाऊ, अशी होते. पण आपण कोणता बर्गर खायचा ते नंतर ठरवू. आधी मॅकला विश करू. कारण आज मॅकचा बड्डे आहे.

बर्गर. बर्गर कोणाला आवडत नाही? कितीही डाएट वैगरे म्हटलं ना तरी बर्गर समोर आल्यावर आपोआप हात बर्गरकडे वळतातच. मऊ मऊ पाव त्यावर चीझी सॉस, गरम गरम पॅटी सोबत काही क्रंची भाज्या. एक बाईट घेतल्यावर कधी एकदा सगळा बर्गर संपवतोय असं होतं.

वाटेत भूक लागली की पटकन बर्गर घेतला की पोट फुल होतं. कधी कधी तर भूक लागली नसली तरी बर्गरचं दुकान दिसलं की आपोआप पावलं बर्गरच्या दिशेने जाऊ लागतात. तसंच सेलिब्रेशन करायचं असंल तरी आपल्याल बर्गर आठवतो. पण आपल्या डोक्यात बर्गर म्हणजे फक्त मॅकडोनल्ड हेच समीकरण आहे. हे असं एक कॅफे स्टाईल रेस्टॉरंट आहे. जिथे आपण कधीही जाऊ शकतो. आता तर हे रेस्टॉरंट फक्त मेट्रो सिटीजपुरता मर्यादीत न राहता सगळीकडे पोचलेत.

एका स्टॉलपासून केली सुरवात

मॅकडोनल्डस् ही जगातली सगळ्यात मोठी फास्ट फुड चेन आहे. याच कंपनीने जगातल्या फास्ट फुड इंडस्ट्रीला नवं वळण दिलं. आपण आपलं आवडतं गो टू रेस्टॉरंट. ज्याला आपण प्रेमाने किंवा कुल वाटावं म्हणून मॅकडी, मॅक असं म्हणतो. याच मॅकची सुरवात १५ मे १९४० ला झालेली. आज आपल्या मॅकने ८० व्या वर्षात एंट्री केलीय.

रिचर्ड आणि मॉरीस जेम्स मॅकडोनल्ड या दोघा भावांनी १९३७ ला कॅलिफोर्नियात हॉट डॉगचा स्टॉल सुरु केला. मग त्याला काही अंशी यश मिळाल्यानंतर या मॅकडोनल्ड बंधुंनी काहीतरी वेगळं करण्यासाठी बेरनार्डीनोला मॅकडोनल्ड नावाने छोटंस हॅमबर्गर आणि मिल्क शेकचं दुकान थाटलं. पुढे त्यांनी मेन्युमधे फ्रेंच फ्राईजचा समावेश केला. जे आजही आपल्याला खूप आवडतात. यात ग्राहकांना सेल्फ सर्विस करावी लागते. म्हणजे स्वत: ऑर्डर देऊन, आलेले पदार्थ स्वत: घेऊन बसून खाणं.

हेही वाचा : जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

 

मॅक ग्लोबलाइज झालं

आपण बर्गर म्हणत असलो तरी पाश्चिमात्य देशात त्याला हॅमबर्गर म्हणतात. रे क्रॉक यांच्या मदतीने त्यांनी मॅकला मॉडर्न रुप दिलं. आणि त्यांनी १९४८ ला फास्ट स्पीड सर्विस सिस्टीम आणली. ज्यामुळे खऱ्या अर्थाने मॅकवर लोकांच्या पसंतीने शिक्कामोर्तब केलं. यादरम्यान त्यांनी लोगोवर बरंच काम केलं. १९५५ पासून त्यांनी अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी हे रेस्टॉरंट्स सुरु केले. मग त्यांनी कोकसोबत टायअप केलं. ज्यामुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. १९५८ ला त्यांनी १ कोटी हॅमबर्गर्सची विक्री केली होती. इथूनच त्यांनी वेगवेगळे विक्रम रचण्यास सुरवात केली. १९६१ मधे ड्राइव्ह थ्रू रेस्टॉरंटला सुरवात झाली. हे एक प्रकारचं पार्सस घेण्याचं रेस्टॉरंट.

१९६५ ला त्यांनी मॅकडोनल्डचा पुतळा लॉंच केला. ज्याच्या सोबत आजही आपल्याला फोटो काढायला आवडतो. इथूनच मॅकच्या मार्केटिंगला सुरवात झाली. आपण आज मॅकचा जो लोगो बघतोय, तो १९६८ पासून वापरण्यास सुरवात झाली. हे लोगो प्रत्येक रेस्टॉरंटवर, जाहिरातींमधे दिसू लागले. याच वर्षापासून मॅकडी अमेरिकतेला लोकप्रिय ब्रॅंड म्हणून नावारुपाला आला. १९७१ पासून मॅकडी इतर देशांमधे सुरु झालं. ज्यामुळे त्याला ग्लोबलायझेशनचं सिम्बॉल समजलं जाऊ लागलं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

मॅक भारतात लॉंच झालं

१९९० पर्यंत हे रेस्टॉरंट लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सगळ्यांना आवडू लागले. मग मॅक भारतात येणार नाही, असं कसं होईल. मॅक पहिल्यांदा १३ ऑक्टोबर १९९६ ला नवी दिल्लीत आपलं पाऊल ठेवलं. त्यावेळी भारत हा ९५ वा देश होता जिथे मॅक सुरु होतहोतं. पण भारतात आल्यावर मॅकला लगेच प्रसिद्धी मिळाली नाही. कारण त्यांचे हॅमबर्गर्स हे बीफ, पोर्कचे होते. इतर देशांच्या तुलनेत भारतात शाकाहारी लोक जास्त आहेत. आणि मांसाहारातही आपल्याकडे सर्वाधिक अंड, चिकन आणि बकऱ्याचं मटन खाल्लं जाते. त्यामुळे भारतीयांना रुचतील असे स्वदेशी पॅकेजिंगमधले पदार्थ आणण्यासाठी मॅकला पाच वर्ष लागली.

भारत हा एकमेव देश आहे, जिथल्या मॅकमधे बीफ आणि पोर्क मिळत नाही. टेस्टी फूड अफॉर्डेबल पैशांत उपलब्ध करून देणं हा मॅकडोनल्ड कॉर्पोरेशन कंपनीचा मंत्र आहे. त्यांच्या कामाचा मंत्र म्हणजे स्वच्छता, गुणवत्ता, जलद सेवा. त्यामुळेच आपल्याला परत परत मॅकमधे जावंस वाटतं. त्यांनी भारतीय चवीचे अनेक बर्गर लॉंच केलेत. त्यातला महाराजा हा गेल्या २० वर्षांपासून मॅकमधे वेगवेगळ्या चवीत आपल्याला मिळतोय.

गेल्या दोनेक वर्षांत मॅकनं अमेरिकी, इटालियन, मॅक्सिकन चवी नव्याने आणल्यात. तसंच भारतीय पद्धतीतले नान, कैरी सरबत, मसाला चहा, कबाब आणि भात इत्यादी पदार्थदेखील मिळतात. बर्गरसह पफ, व्रॅप, केक, नानही मिळतात. २००८ ला मॅकने ब्रेकफास्टचे पदार्थ आणले. तसंच सर्व पेय आणि बेकरी पदार्थ मॅककॅफेमधे मिळतात. जो रेस्टॉरंटचाच एक भाग आहे. कंपनीने २००४ ला पहिल्यांदा डिलिवरी सिस्टीम सुरु केली. कंपनीने डिसेबल फ्रेंडली, ड्राइव्ह थ्रू, हाय वे लगत आणि मॉलमधे रेस्टॉरंट उभारले आहेत.

हेही वाचा : सत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या जत्रा पुन्हा सुरू का होताहेत?

मॅकचा भारतातला व्यवसाय

सध्या मॅकचे संपूर्ण भारतात ३०० रेस्टॉरंट्स आहेत. आता तर जिल्हा आणि तालुक्यातही मॅक रेस्टॉरंट दिसू लागलेत. तर जगात एकूण १९९ देशांमधे साधारण ३४ हजार रेस्टॉरंट आहेत. फ्रँचायजी म्हणून रेस्टॉरंट सुरु होतात. यात तिथल्या लोकल बिझनेसमन आपली गुंतवणूक करतो. हा व्यवसाय सर्वस्वी त्याचा होतो. सध्या भारतात १५ टक्के शेअर्स मॅकडोनल्ड कॉप्रोरेशनचे आहेत तर उरलेले ८५ टक्के भारतीय बिझनेसमनचे आहेत. भारताच्या एकूण फास्ट फुड इंडस्ट्रीत मॅकची सरासरी वार्षिक उत्पन्न वाढ ३० ते ३५ टक्के आहे, असं स्टॅटेस्टिका रिसर्च कंपनीचे मार्केट अनॅलिस्ट महेंद्र भाटी म्हणाले. फोर्ब्स मॅगझिनच्या रिपोर्टनुसार मॅकडोनल्डचं २०१८ मधलं जगातलं उत्पन्न २१ हजार कोटी एवढं आहे.

मॅकडोनल्डमुळे भारतातल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या. मॅकच्या प्रत्येक रेस्टॉरंटमधे ६० ते ८० लोकांची टीम असते. सध्या ५ हजार लोक मॅकमधे नोकरी करत आहेत. अनेक कॉलिजिअन्स पॉकेटमनीसाठीसुद्धा पार्टटाईम काम करतात.

हेही वाचा : लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

बर्गर शरीरासाठी धोकादायक

मॅकचा आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीत वाटा आहे. आणि आपणही आय एम लव्हिंग इट म्हणतं नेहमी मॅकमधे जातो. खातो, पितो, एन्जॉय करतो. पण फास्टफुडचं वाढतं मार्केट आणि त्याच्या पदार्थांमुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. फास्टफुडमधे मीठाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करतात, केमिकल प्रिझर्वेटिवज, डिहाड्रेटेड भाज्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्रोज करून ठेवलेले पदार्थ ऐनवेळी तळतात. गरम गरम असल्यामुळे आपल्याला ते पदार्थ फ्रेश वाटतात पण मुळात तसं काही नसतं. उलटं फ्रोजन पदार्थ गरम गरम तेलात तळून खाणं शरीरासाठी धोकादायक असतं, असं आहारतज्ज्ञ डॉ. शीला शेहरावत यांनी 'कोलाज'शी बोलताना सांगितलं.

ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा त्यातला सगळ्यात मोठा आजार. सध्या थायरॉईड, पिसीओडी, पिसीओएस सारख्या आजारांना फास्टफुड कारणीभूत असल्याचं आहारतज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. त्यामुळे जगभरातून मॅकचे पदार्थ खाणं बंद करा असंही म्हटलं जातंय.

हेही वाचा : 

थायरॉइडविषयी हे समजून घ्यायला हवंच

‘सुपर स्प्रेडर’कडे कुठून येते कोरोना पसरवायची सुपरपॉवर?

अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी क्रिकेटने मदत केली तेव्हा,

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?

अमेरिकेत लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्पचा पाठिंबा का?