गोल्डन गर्ल हिमा दासकडे धावण्यासाठी शूज नव्हते, आज तिच्या नावाची शूज रेंज आहे

२३ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


क्रिकेट वर्ल्डकपमधे हार पत्करल्यानंतर भारतीय खेळप्रेमी हिरमुसले. पण हिमा दासने सगळ्यांना पुन्हा जल्लोष करण्याचं आणि अभिमान वाटण्यासारखी कामगिरी केली. तिने १८ दिवसांमधे पाच सुवर्ण पदक जिंकून सगळ्यांची लाडकी झाली. पण तिने इथवर पोचण्यासाठी काय काय केलं?

हॅश टॅग धिंग एक्सप्रेस, हॅशटॅग गोल्डन गर्ल ही नावं सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय होतायत. होणारच ना भाऊ आपल्या धावपट्टू हिमा दास चक्क १८ दिवसांमधे ५ सुवर्ण पदक पटावलेत. अवघ्या १९ वर्षांच्या हिमाने ही कामगिरी केलीय. नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, रिषभ पंत आणि इतर सेलिब्रिटीज तसंच सर्वमानान्य लोकही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत.

हिमाने केली सुवर्ण पदकांची लयलूट

शनिवारी प्रागमधे झालेल्या ४०० मीटरच्या स्पर्धेत ५२.०९ सेकंदामधे धावत, भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. आणि तिने या १८ दिवसांत कमावलेलं पाचवं पदक ठरलं. या गोल्डन गर्लचा जन्म ९ जानेवारी २००० मधे आसाममधे धिंग शहरात झाला. नुकताच आसाममधे पूर आला होता, त्यावेळी हिमाने आपला अर्धा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला. तिच्या या गोष्टीने लोकांनी तिला आपल्या मनातच स्थान दिलं.

मागच्या वर्षी फिनलँडमधे वीस वर्षांखालील ४०० मीटर धावण्याच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवलं. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपट्टू ठरली. तिने यावर्षी २ जुलैला पोलंड मधल्या पोझनान अॅथलेटिक्सच्या २०० मीटर शर्यतीत पहिलं, ७ जुलैला कुटनो अॅथलेटिक्सच्या २०० मीटर शर्यतीत दुसरं तर १३ जुलैला झेक प्रजासत्ताक येथील क्लांदो अॅथलेटिक्सच्या २०० मीटर शर्यतीत तिसरं, आणि १७ जुलैला टाबोर स्मृती अॅथलेटिक्सच्या २०० मीटर शर्यतीत चौथं सुवर्ण पदक मिळवलं. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या आपल्या पाठदुखीचा आजारावर मात करून तिने ही कामगिरी करून दाखवलीय.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

हिमाचे वडील आनंदाने किंचाळले

फिनलँडची स्पर्धा जिंकल्यानंतर हिमा दासने आपल्या घरी फोन केला. त्यावेळी तिने जिंकल्याचं सांगितलं. ही देशासाठी मोठी गोष्ट आहे असं ती सांगत होती पण तिची आई म्हणाली ठिक आहे. चांगलं केलंस. पण त्यांना तिचं यश किती मोठं आहे याची कल्पनाच येत नव्हती. शेवटी आई म्हणाली आता झोपायची वेळ झालीय, आम्ही झोपतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे वडील काकडी विकण्यासाठी निघाले. आणि रस्त्यात भरधाव वेगाने मीडियाच्या गाड्यांचा ताफा त्यांच्याच घराकडे जात होता. आणि हे सगळं आपल्या मुलीच्या यशामुळे होतंय. हे लक्षात आल्यावर तिचे वडील आनंदाने किंचाळलेच. ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटंबासाठी गौरवाची गोष्ट आहे, असं हिमाने इंडिया टुडेला सांगितलं.

हेही वाचा: इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

प्रोटीन सप्लिमेंट नाही, डाळ-भात खाते

हिमा एका तांदुळ पिकवणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी. ती एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झाली. तिच्या घरात १७ जण आहेत. तर तिला ५ सख्खी भावडं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वाटतं की, स्पोर्टमधली मंडळी जेवण अगदी हायफाय असतं. तर असं नाही. हिमा जेवणात कोणतंही प्रोटीन सप्लिमेंट घेतं नाही. ती आपला साधा डाळ आणि भात खाते.

खरंतर धावण्यात एवढं मोठं यश मिळवणाऱ्या हिमाला सुरवातीला धावण्यात फारसारस नव्हता. शाळेत असताना ती फुटबॉल खेळत होती. पण भारत फुटबॉलमधे स्थिरावलेला नसल्यामुळे तिच्या प्रशिक्षकांनी तिच्यातले गुण हेरून धावण्यासाठी प्रेरीत केलं. धावण्याचा सराव करताना तिच्याजवळ स्पोर्ट्स शुजही नव्हते.

हेही वाचा: मार्शल आर्टचा अनभिषिक्त सम्राट ब्रुस ली खूप मोठा फिलॉसॉफरही आहे

हिमाने शेतात धावण्याचा सराव केला

शम्स उल-हक, गौरीशंकर रॉय, निपुण दास आणि नवजोत कौर या प्रशिक्षकांमुळे तिने २०१७ ला केनियातल्या युथ वर्ल्ड चॅम्पियनशीपमधे सहभाही झाली. आणि तिने धावपट्टू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं पाऊल टाकलं. यासाठी तिच्या प्रशिक्षकांनी कर्ज काढलं होतं.

पण हिमा खऱ्याखुऱ्या ट्रॅकवर धावण्याआधी ती आपल्या शेतात धावायची. तिथेच ती सराव करायची. तिच्याकडे स्वस्तातले आणि उसवलले स्पाईक्स असायचे. पण तिने कधीच धावणं सोडलं नाही. घरची गरीब परिस्थिती, शूज घ्यायला पैसे नव्हते. आणि घेतले तर दोन्ही पायांना सहा सहा बोटं त्यातून अंगठा नाहीतर करंगळीकडून भोकं पडायची. म्हणून मग ती अनवाणी पावलांनी धावत राहिली. आज त्याचं हिमा दासच्या नावानं आदिदास या लोकप्रिय स्पोर्ट्स शुज कंपनीने शूज रेंज काढलीय.

हेही वाचा: 

टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या, जॉनी बिअरस्टोची गोष्ट

केला होता अट्टहासः शोषणमुक्त भारत प्रत्यक्षात येण्यासाठी तरुणांनी वाचायला हवी अशी कादंबरी