इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर

०३ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या.

जगानं आर्यन लेडीचा किताबा दिला त्या म्हणजे इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर. त्या पंतप्रधान होण्यापूर्वी अनेक वर्षं मंत्रिमंडळात होत्या. त्यावेळी इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेविड बेन गॉरियां त्यांना म्हणायचे की, माझ्या मंत्रिमंडळात गोल्डा या एकमेव पुरुष आहेत.

तर अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्रात गोल्डा मेयर यांच्या पुरुषी रांगडेपणाबद्दल लिहिलंय. त्यात ते लिहितात, त्यांचा बेधडकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वास हे सारं काही थक्क करणार होतं. 

त्यांच्यावर तीन सिनेमे बनलेत

गोल्डांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अनेक गोष्टी लोकप्रिय होत्या. त्यात त्यांचा स्कर्ट, कोट, काळे बूट, जुन्या काळातली हॅंडबॅग. तसंच त्यांच पुरुषी पद्धतीचं वागणं, बोलणं. स्ट्रेट फॉरवर्ड असणं, सतत सिगरेट पिणं. त्या पुरुषांचं रिस्ट वॉच वापरत. त्याचबरोबर त्या सर्वांशी आपुलकीची वागणूक देत.

भेटायला आलेल्या पाहुण्यांना त्या स्वत: सफरचंद कापून देत. कित्येकदा तर त्या सकाळी किचनमधे चहा पिताना लोकांशी भेटीगाठी करत. त्यांना प्रेमाने ज्यू लोकांची आई किंवा आजी म्हटलं जातं. गोल्डांनी इस्रायलमधे इतिहास घडवला. त्यांनी आतंकवाद्यांना समूळ नष्ट करण्यासाठी अनेक पावलं उचलली.

म्हणूनच त्यांच्या या इंटरेस्टिंग जीवनावर आजपर्यंत अ वुमन कॉल्ड गोल्डा, सॉर्ड ऑफ गिडन आणि आय अम देअर इन कलर हे ३ सिनेमे आलेत. 

युक्रेनवरून इस्रायलपर्यंत पोहोचल्या

या इस्रायली पंतप्रधनांचा जन्म पूर्व युरोपातल्या युक्रेनच्या राजधानी केवमधे झाला. त्या जन्मल्या तेव्हा युक्रेन रशिया राज्याचा भाग होता. त्या १४ वर्षांच्या असताना आईसोबत एका दुकानात पार्ट टाईम नोकरी करत. 

त्या स्वभावाने बंडखोर असल्यामुळे त्यांनी एके दिवशी अमेरिकेतल्या कोलोराडोची तिकीटं काढली आणि आपल्या लग्न झालेल्या बहिणीकडे गेल्या. तिथे त्यांनी यहुदी भाषेत पदवी संपादन केली. इथेच माझ्या विचारांना योग्य दिशा मिळाल्याचे त्या आपल्या माय लाईफ या आत्मचरित्रात लिहितात. तिथेच त्यांना मॉरिस मयेर्सन भेटले. यांच्यासोबत गोल्डांनी वयाच्या १९व्या वर्षी लग्न केलं.

त्या दोघांनी एकत्र राहण्यासाठी आपापली नोकरी सोडली. पॅलेस्टाईनमधल्या ज्यूंच्या वसाहती म्हणजेच किबुट्झमधे सामील दोघे १९२१ मधे आताच्या इस्रायलमधे गेले. तिकडे त्यांनी ज्यू चववळीसाठी रात्रंदिवस काम केलं. त्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसोबत वाटाघाटीत सहभागी झाल्या होत्या. यात यश आलं आणि १९४८ ला स्वतंत्र इस्रायलची स्थापना झाली.

हेही वाचा: गडाफी जिवंत असता तर जग आणखी चांगलं झालं असतं?

इस्रायलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर

स्वतंत्र इस्रायलच्या पहिल्या राजदूत म्हणून त्यांनी सोविएत युनियनमधे काम पाहिलं. पुढे त्या १९४९ मधे कामगार मंत्री बनल्या. तर १९५६ मधे परराष्ट्र मंत्री बनल्या. याच वेळी त्यांनी आपलं नाव मेयर्सन बदलून मेयर असं केलं. कारण ते टिपिकल ज्यू नाव नव्हतं. १९६५ मधे त्यांनी राजकीय निवृत्ती घेतली. तोपर्यंत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनच काम सांभाळलं.

इस्रायलच्या प्रगतीमुळे ते इतर विकसनशील, क्षेत्रफळाने लहान असलणाऱ्या देशांसाठी उदाहरण बनलं. यासाठी त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रित केलं. पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर सिंचन, पोल्ट्रीसारख्या गोष्टींची उभारणी केली. तसंच बहुसंख्य ज्यू इतर देशांमधून आले होते. त्यामुळे एकमेकांमधला फरक संपवून एकत्र कसं राहावं यासाठी विचापूर्वक प्रयत्न केले गेले. त्यात गोल्डा आघाडीवर होत्या. 

हेही वाचा: मोनालिसा चित्राचा पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची

शांततेचा प्रसार करणाऱ्या पंतप्रधान 

इस्रायलचे तिसरे पंतप्रधान लेवी एस्कोल यांचं अचानक १९६९मधे निधन झालं. अशा परिस्थितीत पक्षाने गोल्डांना परत आणण्याचा निर्णय घेतला. इस्रायली संसदेतल्या सर्व सदस्यांनी त्यांना मत दिलं. त्यामुळे गोल्डांना निवृत्तीतून बाहेर पडावंच लागलं. आणि त्या १७ मार्च १९६९ ला इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्या १९७४ पर्यंत त्या पदावर विराजमान होत्या. 

पंतप्रधान असताना त्यांनी संपूर्ण मिडल ईस्टमधे शांततेचा प्रचार केला. त्यांनी सर्व प्रश्न, समस्या चर्चेने सोडवण्यावर भर दिला. युद्ध नको असा संदेश पसरवल्यामुळे अमेरिकेने इस्रायलच्या सीमा सुरक्षित असल्याचं सांगितलं.

पण गोल्डांनी सर्व आंतकवाद्यांना मारण्यासाठी कट रचले, बदला घेतला. असंच त्यांच्याविषयी म्हटलं जातं. त्यानंतर अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांनी बदला घेण्याचं ठरवलं. 

एकामागोमाग दहशतवादी हल्ले केले

जर्मनीत म्युनिकमधे १९७२ ला ऑलिम्पिक खेळ होते. त्यात इस्रायलचे २८ खेळाडू सहभागी होते. मात्र खेळ सुरू होण्याआधी ५ सप्टेंबर १९७२ ला पहाटे ४ वाचून ४० वाजता काही दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्रांसह इस्रायली खेळाडूंना ताब्यात घेऊन ओलिस ठेवलं. त्यात ११ खेळाडूंचा जीव गेला. या हल्ल्याबद्दल गोल्डा म्हणाल्या होत्या, हा फक्त दहशतवादी हल्ला नाही तर त्याच्यापुढचं आहे. जर्मनीत ज्यूंवर अत्याचार झाले होते तिथेच इस्रायली खेळाडूंवर हल्ला झाल्याने जुन्या अत्याचारांची आठवण होते.  

पॅलेस्टाईनमधल्या ब्लॅक सेप्टेंबर, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि जर्मनीतली दहशतवादी संघटना आरएएफ यात सामील होते. लिबरेशन ऑर्गनायझेशन ही संस्था खेळांचं प्रशिक्षण देत असे. त्यांना ऑलिम्पिकमधे सहभागी व्हायचं होतं. मात्र पॅलेस्टाईन हा पूर्णपणे देश न बनल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. पण इस्रायलला मिळाला म्हणूनच त्यांनी ऑलिम्पिकमधे वेगळ्या प्रकारे जायचं ठरवलं. आणि त्यांनी ऑलिम्पिकमधे दहशतीचा वेगळाच खेळ दाखवला.

हेही वाचा: १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

दहशतवाद्यांनी खेळाडूंना जिवंत ठेवण्याच्या बदल्यात जर्मन आणि इस्रायलच्या कैदेत असणाऱ्या २३४ जणांना सोडवण्याची मागणी केली. दहशतवादी खेळाडूंना बंदी बनवून घेऊन जात असताना जर्मन सैन्याने एअरपोर्टवर हल्ला केला. त्यात ९ खेळाडू, ५ दहशतवादी मारले गेले. ३ दहशतवाद्यांना जर्मनीच्या सैनिकांनी ताब्यात घेतलं. या घटनेला दोन महिने झाले नाही तोच दहशतवाद्यांनी लुफ्तांसा एअरलाइन्सचं विमान हायजॅक केलं.

दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला

या एकामागोमाग एक होणाऱ्या दुदैवी घटनानंतर इस्रायलच्या आई, आजी, आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी त्या सर्व दहशतवाद्यांना संपवण्याचं ठरवलं.

त्यांनी ऑक्टोबरपासून इस्रायलच्या कमिटी एक्समधे हुशार इंटलिजन्स एजंटची भरती केली. त्यानंतर त्यांनी पॅलेस्टाईनमधे हल्ले करायला सुरवात केली. त्यांच्या पहिल्याच हल्ल्यात दहशतवाद्यावर ११ गोळ्या झाडण्यात आल्या. पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी इस्रायलचे ११ खेळाडू मारले होते. हे लक्षात आल्यामुळे दहशतवादी संघटनांच्या लक्षात आलं की हे काम मोसादचं आहे. 

मोसाद आणि कमिटी एक्स या इस्रायलच्या इंटलिजन्सी एजन्सी होत्या. त्यांनी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची यादी बनवली. त्यानुसार त्यांना त्यांच्या देशात, त्यांच्या घरात घुसुन मारलं. दहशतवाद्यांच्या बिछान्यात, फोनच्या रिसिव्हरमधे बॉम्ब लावून स्फोट घडवून आणले.

युरोपमधे त्यांनी अनेक दहशतवाद्यांना मारलं त्यातला एक कॉमन पॅटर्न म्हणजे ११ गोळ्या झाडणं. मात्र इस्रायलने प्रत्येकवेळी यामागे आमचा हात नाही असं म्हटलं. पुढे ९० च्या दशकापर्यंत हे ऑपरेशन सुरू राहिलं. हे काम करण्याचे आदेश स्वत: पंतप्रधान गोल्डा यांनी दिल्याचं सांगितलं जातं. 

हेही वाचा: 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

युद्धात इस्रायलने विजय मिळवला पण

१९७३ मधे सिरीया आणि इजिप्तने इस्रायलवर हल्ला करण्याचं ठरवलं. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यामुळे होणारा हवाई हल्ला रोखण्यात गोल्डांना यश मिळालं. पण पुढची परिस्थिती खूप बिकट होती. लंडनकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. अरबसोबत संबंध बिघडवल्याचे आरोप त्यांच्यावर झाले.  

या यॉम किप्पूर युद्धात इस्रायलचे ३ हजार सैनिक मारले गेले. या युद्धात जून १९७४ ला इस्रायलचा विजय झाला. पण एप्रिल १९७४ मधे गोल्डांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.

इस्रायलींना आजही गोल्डा आठवतात

आजही इस्रायलमधे गोल्डांबद्दल त्या एक तडफदार, देशाला आकार देण्याऱ्या, देशाला सशक्त बनवणाऱ्या, त्यांच्या योग्य निर्णयांसाठी लोक त्यांचं कौतुक करतात. पण काही जण त्यांना वंशभेद करणाऱ्यासुद्धा म्हणातात. त्या आशियाई आणि आफ्रिकी ज्यूंना वाईट वागणूक द्यायच्या असा आरोपही केला जातो. 

त्या ७५ व्या वर्षीसुद्धा २५ वर्षांच्या तरुणीप्रमाणे काम करत. सकाळी ४ वाजल्यापासून काम करायच्या. त्या सलग १८ तास काम करायच्या. त्या म्हणायच्या शांतता येईल तेव्हा अरबांशी बदला घेणार नाही, त्यांना माफ करू. पण त्यांनी त्यांच्या देशातल्या मुलांना मारण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं यासाठी त्यांना माफ नाही करणार. 

हेही वाचा: प्रमोद महाजनांनी मोदींना भाजप हायजॅक करू दिला असता?

एक आयर्न लेडी दुसऱ्या आयर्न लेडीच्या मदतीला

टाईम मॅगझिनने २० व्या दशकातील सर्वात शक्तिशाली २५ महिलांच्या यादी प्रसिद्ध केली. त्यात इंदिरा गांधी, मदत तेरेसा, वर्जिनिया वुल्फ, क्युरी मडोना, इथेनॉर मार्गरेट, ओप्रा विन्फ्रे यांच्यासोबत गोल्डा मेयर यांचंदेखील नाव होतं.

भारतीयांना गोल्डा मेयर यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान शस्त्रास्त्रांची मदत केलेल्या मदतीसाठी कायम लक्षात राहतात. इस्रायलची त्यावेळी परिस्थिती बिकट होती. तरीही इंदिरा गांधींनी त्यांना पत्र लिहून कळवल्यावर गोल्डांनी शस्त्रास्त्रांचं जहाज भारतात पाठवलं.

त्या बदल्यात त्यांना भारताशी राजकीय संबंध प्रस्थापित करायचे होते. ही मदत म्हणजे एका आयर्न लेडीसाठी दुसऱ्या आयर्न लेडीने केलेली मदत आहे.

हेही वाचा: कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस