आज १० जुलै. निकोल टेस्ला यांचा जन्मदिन. आपलं रोजचं आयुष्य एवढं सुकर आहे, त्यामागे अनेक संशोधकांचा हात आहे. यापैकीच एक म्हणजे निकोल टेस्ला. त्यांनी एक्सरे, वीज पासून वायफायपर्यंत अनेक शोध लावले. यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी कमीच. त्यांच्या ६ महत्त्वाच्या शोधांनी जग बदललं. ते कोणते शोध होते?
आपल्याला खूपदा इतिहासाचा कंटाळा येतो. पण इतिहासातच तर सगळे शोध लागले. ज्याचा आज आपण पुरेपुर उपयोग करत आहोत. आणि यातला महत्त्वाचा शोध म्हणजे वायफायचा. सध्या आपलं वाफायशिवाय पानही हलत नाही. सतत मोबाईल, लॅपटॉप, टॅब इत्यादींना वायफाय जोडलेला लागतो. मग याचा शोधणाऱ्याला तर आपण थँक्यू म्हटलंच पाहिजे ना भाऊ.
सायबेरिअन-अमेरिकन इंजिनियर आणि भौतिकशास्त्रज्ञ निकोल टेस्ला यांना वायफायचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी १८५६ ला ऑस्ट्रो हंगेरीअन साम्राज्यात म्हणजेच आताच्या सायबेरियात झाला. त्यांचे वडील चर्चमधे फादर म्हणजेच प्रिस्ट म्हणून काम करत होते. तर आई शेती करत होती. टेस्ला यांना ३ बहिणी आणि १ भाऊ होता. पण ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या भावाचा घोडेस्वारी करताना अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा टेस्लांनी एवढा धक्का घेतला की पुढची बरीच वर्षं त्यांनी मानसिक आजाराशी झुंज देत घालवली.
पण आपल्या आजारपणावर मात करत पुढे जाऊन ते खूप शिकले. त्यांनी गणित आणि भौतिक शास्त्राचा अभ्यास टेक्निकल युनिवर्सिटी ग्रॅझमधून केला तर तत्त्वज्ञानाचा अभ्यास प्राग युनिवर्सिटीतून केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी करण्यासाठी अमेरिकेत आले. आणि इथूनच त्यांच्या शोधाची म्हणजेच त्यांनी लावलेल्या शोधाच्या कथांना सुरवात होते.
हेही वाचा: स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ
टेस्ला यांनी फक्त वायफायचा शोध लावला नाही. त्यांनी खूप महत्त्वाचे शोध लावले. अनेक शोधांपैकी ६ शोध ज्यामुळे जग बदललं ते कोणते?
आपल्या कोणी प्रश्न विचारला की विद्युत ऊर्जेचा शोध कोणी लावला तर आपण लगेच म्हणून थॉमस अल्वा एडीसन. पण टेस्लासुद्धा एडीसन यांच्यासोबत काम करत होते. टेस्ला १८८२ पासून ब्रशलेस एसी म्हणजे अल्टरनेट करंटवर काम करत होते. मग त्यांना पॅरिसमधे एडिसन कंपनीत डीसी म्हणजे डायरेक्ट करंट साफ करण्याचं काम मिळालं. मग २ वर्षांनी त्यांना इंजिनियर म्हणून एडिसन कंपनीच्या हेडक्वारटरमधे बढती दिली. त्यांच्या कामावर इंप्रेस होऊन एडिसनने त्याचं विद्युत उर्जेच्या डिझाइनमधे सुधारणा करून द्यायला सांगितलं आणि त्याबदल्यात ५० हजार डॉलर देण्याचं कबूल केलं.
काही महिन्यांनी टेस्ला यांनी अल्टरनेंट करंट मोटरच्या वापराने अल्टरनेट करंटचा यशस्वी प्रयोग केला. डायरेक्ट करंट हा धोकादायक असतो. हा करंट आपण वापरू शकत नाही. पण अल्टरनेट करंट जो आपण वायरींगने सगळीकडे जोडतो आणि त्यावर आपला बल्ब, पंखा, कंप्युटर चालतो. पण या प्रयोगाचे टेस्लांना पैसे, नाव काहीच मिळालं नाही. त्यांच्यासोबत छळ झाला.
पण पुढे जाऊन त्यांनी यात संशोधन करून इलेक्ट्रॉनिक सर्किट, एसी पावर सिस्टीम, हाय वोल्टेज ट्रान्सफॉर्मर, मीटर्सची निर्मिती केली आणि त्याचे पेटंट आपल्या नावे करून घेतले. यातूनचं त्यांनी टेस्ला कॉईल बनवली म्हणजेच इलेक्ट्रिकल रिझोनंट ट्रान्सफॉर्मर सर्किट बनवलं. ज्यामुळे आपल्या घरात लाईट लागली.
हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी
आपल्याला शाळेत विज्ञानाच्या पुस्तकात फिजिक्समधे एक्सरेची माहिती दिलेली होती. यातल्या इलेक्ट्रोमॅग्नेटीक अँड आयोनायझिंग रेडिएशनवर १८०० पासून संशोधन होतहोते. यावर टेस्ला यांनी पुन्हा संशोधन करून किर्लियन फोटोग्राफीमधे सुधारणा करून ते माणसाचं डॉक्युमेंटेशन करण्यायोग्य बनवलं.
हे तंत्र आजही वैद्यकीय चाचणी आणि आजाराचं निदान करण्यासाठी वापरलं जातं. एक्सरेचा वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर होतो त्याचं क्रेडीट टेस्ला यांना जातं.
गुग्लिल्मो मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला असं सांगितलं जातं. पण अमेरिकेच्या सुप्रिम कोर्टाने म्हटलंय की मार्कोनीच्या आधी टेस्ला यांनीच शोध लावलाय. रेडिओ सिग्नल म्हणजे फ्रिकवेन्सी. त्या फ्रिकवेन्सी एकवटून रेडिओला सिग्नल येण्यासाठी ट्रान्समीटर १८९३ मधे टेस्ला यांनी बनवलं. आणि याचं प्रदर्शन १८९७ च्या द नॅशनल इलेक्ट्रिक लाईट असोसिएशनमधे केलं.
१८९८ मधे टेस्लांनी त्याच्या शोध लावला, ज्यावरुन आपल्या घरात भांडण होतं ते म्हणजे रिमोट. त्यावेळी हा रिमोट रेडिओ फ्रिकवेन्सी स्विचरचं काम करण्यासाठी बनवला होता. ज्यात बोट प्रॉपेलर, स्केल डाऊन रनिंग लाईट, रबर अशा सर्व गोष्टी होत्या. ज्या आपण आजच्या रिमोटमधेही बघू शकतो. टेस्लांनी बनवलेला रिमोट पुढे अमेरिकी सैन्यदलाने आपल्या वापरासाठी घेतला, असं नाडिया कोवर्सकाय यांनी आपल्या लिंकडीनवरच्या लेखात म्हटलंय. त्या न्यूयॉर्क सायंस सोसाटीच्या अध्यक्ष आहेत.
हेही वाचा: मोनालिसा चित्राचा पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची
टेस्लांचा पहिला शोधही मोटरच होता. मग ही इलेक्ट्रिक मोटर मोटर कोणती? आता आपण जे रिस्ट वॉच, डिस्क ड्राईव, पाण्याच पंप, पंखा, घरगुती उपकरणे इत्यादी वस्तूंमधे वापरतो. रोटेटींग मॅग्नेटीक डिस्क असलेलं मोटर होतं. या मोटर आणि त्याच्या तंत्राशिवाय या कोणत्याच वस्तू आपण बनवू शकत नाहीत. शोध १९३० साली महायुद्धानंतर औद्योगिक संकटाच्या काळात लागला. पुढे या मोटरमुळे अनेक यंत्र बनवणं सोप्पं झालं.
आपण आज जे वायफाय वापरतो त्याचं बेसिक हे टेस्लांनीच शोधलं होतं. इलेक्ट्रो मॅग्नेटीक इंडक्शनला इलेक्ट्रिकल सिंग्नलिंगची जोड देऊन इंटरनेट जोडण्यात आलं. आणि वायरलेस ब्रॉडबँड सुरु केलं. त्यासाठी बनवण्यात आलेलं मशिन हे आताच्या राऊटर सारखंच होतं. त्यांच्या या सुरवातीच्या संशोधनाने आज आपण अत्याधुनिक वायफाय सिस्टीम वापरत आहोत. याचबरोबर त्यांनी लेझर, प्रिंटींग, वायरलेस फोन इत्यादींमधे मोठं संशोधन केलं.
निकोल टेस्ला यांचा मृत्यू न्यूयॉर्कमधे त्यांच्याच घरात ७ जानेवारी १९४३ ला झाला. त्यांच्या या अद्भूत कामामुळे सायबेरियात त्यांचा जन्मदिन विज्ञान दिन म्हणून साजरा करतात. त्यांच्या निकोल टेस्ला हा नवोदीत संशोधकांना पुरस्कार दिला जातो.
हेही वाचा:
आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपण कोणती काळजी घ्यावी?
अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून
आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं