फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

१४ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


सोशल नेटवर्किंग साईटचा बाप म्हणजे मार्क झुकेरबर्ग याचा आज जन्मदिन. त्याने फेसबुकसारखं कम्युनिकेशनचं एक एडवान्स टुल बनवलं. पण आज ही साईट एक कंपनी झालीय. एक मोठा उद्योग उभा केलाय. जवळपास प्रत्येक देशात एक ऑफिस आहे. प्रत्येक देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे काम सुरुय. तर या सगळ्यांची सुरवात कशी झाली?

सोशल मीडिया म्हटलं की आपल्याला सगळ्यातं आधी फेसबुक आठवतं. आपण नवीन आलेले कुल एप कितीही वापरले तरी तरी फेसबुकवर दिवसातून एकदा वेळ घालवल्याशिवाय दिवस काही पूर्ण होत नाही. टाईमपास, मित्रमंडळींच काय चाललंय तसंच आपल्या लाईफचे अपडेट देण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी आपण फेसबुकचा वापर करतो.

पूर्वी डेस्कटॉप, लॅपटॉपवर वापरलं जाणारं फेसबुक आपल्या फोनमधे आल्यापासून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलंय. याच आपल्या प्रिय फेसबुकला घडवणारा मार्क झुकेरबर्ग. त्याने २० व्या वर्षी जगातली सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट बनवली. या साईटचा जन्म हॉस्टेलच्या रुममधे झाला. सुरवातीला फेसबुकचं नाव द फेसबुक होतं. त्यावेळी हे फक्त हावर्ड युनिवर्सिटीपुरताच बनवलं गेलं. पण अचानक सर्व विद्यार्थी तिथे आपलं अकाऊंट बनवू लागल्याने ट्रॅफिक वाढलं आणि युनिवर्सिटीचं सर्वर क्रॅश झालं.

हेही वाचा : सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?

लहानपणापासून कम्प्यूटरचं वेड

अशा अवलिया मार्कचा जन्म १४ मे १९८४ ला न्यूयॉर्कमधे झाला. एका उच्चशिक्षित कुटुंबात तो वाढला. त्याचे वडील डेंटिस्ट, तर आई मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याला ३ भावंडं आहेत. तो साधारण १२ वर्षांचा असल्यापासून त्याला कम्प्यूटर आणि प्रोग्रॅमिंगमधे इंटरेस्ट निर्माण झाला. त्याने झुकेनेट म्हणून एक मेसेजिंग प्रोग्रॅम डेवलप केला. ज्याचा वापर त्याच्या बाबांनी त्यांच्या डेंटल क्लिनिकमधे केला. त्यामुळे त्याचे वडील क्लिनिकमधे इंटीग्रेशन टेक्नॉलॉजी वापरणारे पहिले डॉक्टर ठरले.

ग्रॅज्यूएशन करत असताना त्याने अनेक शाळांसाठी सॉफ्टवेअर डेवलप केले. तसंच त्याने काही म्युझिक सॉफ्टवेअर आणि वीडियो गेमदेखील बनवले. त्यातलं एक म्युझिक सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही विकत घेतलं होतं.

हॉस्टेलमधे बनवलं सॉफ्टवेअर

त्यानंतर २००२ मधे मार्कने हावर्ड युनिवर्सिटीत एडमिशन घेतलं. तिथे त्याने कोर्समॅच नावाचं विद्यार्थांना त्यांच्या कोर्सनुसार क्लास शोधण्यात मदत करणारं सॉफ्टवेअर बनवलं. मग त्याने फेसमॅश नावाचं सॉफ्टवेअर बनवलं. ज्यात कॅम्पसमधले विद्यार्थी विद्यापीठातील निर्णयांसाठी वोट करू शकत होते. मात्र कालांतराने विद्यापीठाच्या प्रशासनाने ते बंद केलं.

दिव्य नरेंद्र, ट्विन्स कॅमेरॉन, टेलर विंक्लेवोस हे विद्यार्थी हावर्ड कनेक्शन या प्रोजेक्टवर काम करत होते. त्यांनी विद्यापीठासाठी सोशल नेटवर्किंग साईटचं डिझाइन बनवलं होतं. झुकेरबर्गने काही काळ त्या प्रोजेक्टसाठी काम केलं. नंतर एडुआर्दो सँवेरीन, क्रिस ह्युजेस व डस्टीन मॉस्कोविटज या मित्रांसोबत मार्कने द फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट सुरु केली.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

फेसबुकची वाढती लोकप्रियता

फेसबुकवर फोटो शेअर करू शकतो, मेसेज करू शकतो, आपली माहिती देऊ शकतो. आपल्या माहितीप्रमाणे फेसुबक फेब्रुवारी २००४ ला सुरु झालं. पण ही साईट जून २००४ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. त्यानंतर काही महिन्यातच त्याने शिक्षण सोडलं. पुढे २०१७ मधे हावर्डची डिग्री घेतली. मात्र त्यावेळी त्याने कॅलिफोर्नियात ऑफिस काढून तो फेसबुक चालवू लागला. २००४ च्या शेवटी फेसबुकचे १ लाख युजर्स होते.

२००५ मधे फेसबुकला बुस्ट मिळालं. त्याच्यासोबत एका कंपनीने टायप केलं. ज्यामुळे त्याला १२ लाख ७ हजार युएस डॉलर्सचा फायदा झाला, ही माहिती टाईम मॅगझिनच्या २००८ च्या अंकातली आहे. मग त्याने मार्केटींग करून अनेक तरुणांना फेसबुककडे वळवलं. त्यामुळे २००५ वर्षाच्या शेवटी ५० लाख युजर्स झाले. त्याने साईटवर नवे फिचर्स चालू केले. आणखी काही कंपन्यांसोबत वेंचर्स सुरु केले.

फेसबुक जगात पोचलं आणि

पुढे याचं नाव फेसबुक झालं. ही साईट जगभरात सुरु झाली. मग यात वेगवेगळ्या अशा ४० हून अधिक भाषांचा समावेश झाला. ग्रुप, पेज, गेम इत्यादी गोष्टी हळू हळू येऊ लागल्या. २०१२ मधे फेसबुकमधे मेजर बदल झाले. फेसबुक ही कंपनी शेअर बाजारात आली.

आज फेसबुकवर नाही असं कोणी म्हटलं तर समोरची व्यक्ती मागास तर नाही असे भाव लोकांच्या चेहऱ्यावर असतात. आता तर शाळेतल्या मुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळेच फेबु किंवा एफबीवर आहेत. जो कोणी फेसबुक सुरु करतो त्याचा वेळ फेसबुकवर कसा जातो कळतही नाही. लाईक्स, कंमेट्स, नवे पोस्ट यात अर्धातासाऐवजी दोन तास कधी गेले समजतही नाही. यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. मानसिक, शारिरीक आणि कौटुंबिक.

वर्च्युअल जगामुळे प्रत्यक्ष माणसापासून माणूस दूर होतोय, सतत एका पोजिशनमधे बसल्यामुळे मसल, नेक, एल्बो पेन आणि सततच्या वापरामुळे मनावर अजाणतेपणे येणार ताण. याचा सामना सध्याची पिढी करतेय.

हेही वाचा : आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं

फेसबुकने गाठलेली उंची

सध्या मार्क झुकेरबर्गचं वार्षिक उत्पन्न ७ हजार कोटी युएस डॉलर इतकं आहे. फेसबुक कंपनी २०१८ मधला रेवेन्यु ५ अब्ज एवढा होता. जगभरात फेसबुक रोज वापरणारे १ अब्ज युजर्स आहेत. सध्या फेसबुककडे वॉटसएप, इंस्टाग्राम, फ्रेंड्सफिड सारख्या आणखी काही सोशल नेटवर्किंग साईटसची मालकी आहे. मार्क २००९ मधे जगातला सर्वात तरुण कोट्यधीश बनला. टाईम आणि फोर्ब्स मॅगझिनच्या जगातील सर्वात शक्तीशाली, श्रीमंत आणि लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या लोकांच्या यादी मार्कचा समावेश झालाय.

फेसबुक ही साईट कोणत्याही इतर कंपनीसाठी सगळ्यात लोकांपर्यंत पोचण्याचं माध्यम बनलीय. आज फेसबुकच्या जोरावर लोक आपला बिझनेस चालवताहेत. आज लोकांची माहिती, त्यांच्या आवडीनिवडीचा, त्यांच्या इंटरनेटवरील प्रत्येक मुवमेंटचा डेटा फक्त फेसबुककडे आहे. हे कितीही धोकादायक असलं तरी लोक फेसबुक न वापरता राहू शकत नाहीत. कारण आपल्याला एकप्रकारे फेसबुकचं व्यसन लागलंय.

हेही वाचा : 

ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर

तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

भाजप नेत्यांना ट्रोल करून महाआघाडी चकमकी जिंकेल, युद्ध नाही

विकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहेत

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज