बिझनेस सायकल फंड: गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

२८ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.

शेअर बाजाराची दिशा ही नेहमीच वरची असते. एप्रिल १९९६ला १०० ने सुरू झालेला सेन्सेक्स आज ६० हजारच्या आसपास आहे; तर एप्रिल १९९६ला १ हजारने सुरू झालेला निफ्टी ५० हा इंडेक्स आज १८ हजारच्या जवळपास आहे. सरासरी १७ टक्के रिटर्न या दोन्ही निर्देशांकांनी स्थापनेपासून दिलेले आहेत. जे मुदत ठेवी सोनं, रिअल इस्टेट या पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा कितीतरी अधिक आहेत.

असं असेल तर मग लोक शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडामधे गुंतवणूक करायला का घाबरतात? कारण शेअर बाजाराची दिशा नेहमीच वरची असली तरी तिचा मार्ग सरळ नसतो. तेजी-मंदीच्या हेलकाव्यांनी अल्प ते मध्यम काळात शेअर बाजार नेहमीच अनिश्चिततेने ग्रासलेला असतो. देशोदेशीच्या अर्थव्यवस्था वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतात. कधी त्या तेजीच्या वारूवर स्वार होतात, तर कधी मंदीच्या झाकोळाने काळवंडून जातात.

मॉडेल बिझनेस सायकल फंडचं

देशाची अर्थव्यवस्था ज्या टप्प्यांमधून प्रवास करते, त्यांचा परिणाम देशातल्या व्यवसाय क्षेत्रावर होत असतो. विस्तार, उच्चतम विस्तार, आंकुचन आणि मंदी या चार अवस्थांमधून व्यवसाय क्षेत्र मार्गक्रमण करत असते. ज्याला 'मॅक्रो इकॉनॉमी फॅक्टर' म्हणतात. उदाहरणार्थ - अर्थव्यवस्थेतल्या सुधारणा, टॅक्स, बेरोजगारी, भाववाढ. त्यांचा परिणाम व्यवसायांवर फार मोठ्या प्रमाणावर पडत असतो.

याशिवाय एखाद्या कंपनीचा व्यवसाय विस्तार, तिच्या उत्पादनांना असणारी मागणी, स्पर्धा वगैरे घटक असतातच. म्हणून देशाची अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने त्या देशातला व्यवसाय, व्यापार क्षेत्र हे वर उल्लेख केलेल्या सायकलमधून जात असतात. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही खाली-वर होत राहते, ती या व्यापार सायकलमुळे. मग या बिझनेस सायकलला ओळखून आणि कोणत्या सायकलमधे कोणती क्षेत्रं चांगली कामगिरी करतात आणि कोणती क्षेत्रं खराब कामगिरी करतात, याचा विचार करून त्याप्रमाणे गुंतवणूक धोरण आखलं तर?

नेमकं हेच बिझनेस सायकल फंड करतात. त्यांच्या गुंतवणुकीचा दृष्टिकोन हा टॉप-डाऊन असतो. म्हणजे ते पहिल्यांदा देशाची अर्थव्यवस्था कोणत्या टप्प्यात आहे ते पाहतात. त्या टप्प्यानुसार कोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीची संधी आहे, हे शोधतात. आणि मग त्या क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या कंपन्यांचा सखोल अभ्यास करून उत्तम कंपन्यांची निवड करतात. आणि त्यांच्या शेअर्समधे गुंतवणूक करतात.

हेही वाचा: मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

यश मॅनेजरच्या कौशल्य, अभ्यासावर

बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमिटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमिटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपली गुंतवणुकीची क्षेत्रं बदलतात. शिवाय ते थिमिटीक फंड हे एक किंवा दोन, क्षेत्रात गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना सेक्टर्सची मर्यादा नसते. शिवाय ते उच्च, मध्यम, लहान अशा सर्व कंपन्यांमधे गुंतवणूक करतात.

बिझनेस सायकल फंडाचं यश हे संपूर्णपणे फंड मॅनेरच्या कौशल्यावर आणि अभ्यासावर अवलंबून असते. यापूर्वीही टाटा बिझनेस सायकल फंड आणि आयसीआयसीआय बिझनेस फंड हे बाजारात आलेले आहेत. आयसीआयसीआय फंड १८ जानेवारी, २०२१ तर टाटा फंड ४ ऑगस्ट, २०२१ला सुरू झाला. त्यांनी आजअखेर अनुक्रमे ३०.२० टक्के आणि ६.९२ टक्के रिटन दिले आहेत.

आदित्य बिर्ला सन लाईफनेही आपला बिझनेस सायकल फंड बाजारात आणला आहे. १५ नोव्हेंबर, २०२१ला तो सुरू झाला आहे आणि २९ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत तो १० रुपयाने गुंतवणुकीस खुला राहील. किमान गुंतवणूक ५०० रुपये करता येईल. विनीत माल आणि नितेश जैन हे दोघे फंड मॅनेजर संयुक्तपणे या फंडाचं व्यवस्थापन पाहतील. या फंडाचं स्वरूप हे बरेचचं फेक्सि कॅप फंडासारखं असल्यामुळे ते सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक योग्य आहेत.

जोखीम घ्यायची तयारी हवी

बिझनेस सायकल ओळखून आपलं गुंतवणूक धोरण आखणं कधीही श्रेयस्करच तेजीच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर अशी किती चांगली कामगिरी करतात. आणि मंदीच्या काळात फार्मा, आयटी ही क्षेत्रं मंदीची लाट कधी थोपवून धरतात. हे आपण पाहतोच. शिवाय काही इतर साधारण प्रसंग म्हणा किंवा आपली म्हणा, देशावर किंवा जगावर येत राहतात. अशावेळी कुशल फंड मॅनेजर आपले गुंतवणूक धोरण बदलतो किंवा पूर्णपणे नव्याने आखतो.

कोरोनाच्या साथीने फार्मा क्षेत्र किती बहरलं आणि वर्क फ्रॉम होममुळे आयटीतल्या कंपन्यांचा व्यवस्थापन खर्च कमी होऊन त्यांचा नफा किती वाढला हे आपण पाहिलंच आहे. त्यामुळे एखादा नावलौकिक असलेला फंड मॅनेजर असेल, तर त्या बिझनेस सायकल फंडमधे आपल्या आर्थिक आणि जोखीम क्षमतेनुसार अवश्य गुंतवणूक करावी.

हेही वाचा: 

तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

देशभर चर्चेचा विषय बनलेल्या रिहानाचं वायरल सत्य असत्य

आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

आपल्याला काय त्याचं : तरूणाच्या स्थित्यंतराची तरूणीनं सांगितलेली गोष्ट

(दैनिक पुढारीतून साभार)