कामगारांसाठी बनवलेली जीन्स, स्टाईल स्टेटमेंट झाली

२० मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज तुम्ही जीन्स घातली आहे का? अचानक हा प्रश्न का, असं आपल्याला वाटत असेल. अरे, आज ब्लू जीन्स डे आहे. आपण कॉलेजला, कामाला, फिरायला कुठेही जाताना जीन्स घालतो. सो इझी, सो कम्फर्टेबल असं म्हणून आपण नेहमी शॉपिंगला गेल्यावर जीन्स घेत असतो. पण तरीही आपण जुन्या जीन्स कधीच फेकून देत नाही.

आपण कोणाला विचारलं की कधीही, कुठेही घालून जाता येतील असे आवडते कम्फर्टेबल कपडे कोणते? तर पटकन उत्तर येतं जीन्स आणि टीशर्ट. जीन्स जाड असली तरी ती एवढी कम्फर्टेबल असते की पावसाळा असो किंवा उन्हाळा आपण ती सहज कॅरी करतो. बघा ना, कितीही वेगवेगळे कपडे आले, फॅशन आली तरी जीन्स काही आऊट ऑफ फॅशन होत नाही.

याच आपल्या फेवरेट जीन्सचा आज दिवस आहे. म्हणजेच सगळ्यात महागडा ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिवाइसला म्हणजेच लेवी स्ट्रॉस अँड कंपनीला पहिल्यांदा जीन्स बनवण्याचं पेटंट २० मे १८७३ मिळालं होतं. म्हणूनच हा दिवस आता ब्यू जीन्स डे म्हणून साजरा केला जातो.

लेवी आणि जेकॉबने जीन्स बनवली

सॅन फ्रान्सिस्कोमधले बिझनेसमन लेवी स्ट्रॉस आणि रेनोमधले टेलर जेकॉब डेविस या दोघांनी एकत्र येऊन ही पँट बनवली. पहिल्यांदा ही पँट १९७१ ला बनवली आणि नंतर पेटंट घेतलं. जेकॉब या टेलरकडे लोक अशा पँटची डिमांड करत जी लवकर फाटणार नाही. मग त्याने मेटलचं बटण वापरून अशी जाड पँट शिवण्याचं ठरवलं. पण त्यावेळी ही पँट बनवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. २६ फेब्रुवारी १८२९ ला जर्मनीत जन्मलेल्या लेवी स्ट्रॉस यांचा २६ सप्टेंबर १९०२ ला अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को राज्यात निधन झालं.

मग तो लेवीकडे गेला. लेवीचा कापड निर्यातीचा आणि ड्राय गुड्स विकण्याचा व्यवसाय होता. जेकॉब त्या नेहमीचा ग्राहक होता. मग त्यांनी पार्टनरशिप केली. आणि पेटंट मिळवून ब्यू जीन्स बनवण्यास सुरवात केली. मात्र ही काही पहिली जीन्स नव्हती. सगळ्यात आधी जीन्स ही फ्रान्समधे १७०० मधे बनवली गेली होती, ही हिस्ट्री टीवीच्या प्रोडक्ट फॅक्ट्री या कार्यक्रमात दिली होती. त्यावेळी बनवलेली जीन्स आणि लिवाइसची जीन्स यात बराच फरक होता.

हेही वाचा: कॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं

लेवी जीन्स आणि इतर जीन्समधला फरक

फ्रान्समधे तयार झालेली जीन्स लोकर आणि कॉटनपासून बनवलेली होती. तसंच त्याला बटण, पॉकेट. लेबल यासारख्या गोष्टी नव्हत्या. जेकॉबने बनवलेली पँट कॉटन, पॉलिस्टर आणि सिंथेटिक मटेरीअलच्या ब्लेंडने बनवलेली होती. यात लेदरचं लेबल, तांब्याचं बटण आणि झिपर आणि कॉटनचे पॉकेट लावलेल होते. त्यामुळे त्याची पँट अधिक आकर्षक आणि नव्या जमान्याची होती.

लेवीच्या जीन्समधला फरक लोकांना आवडला. त्यानंतरच्या जीन्सच्या कंपन्यांनी लोकर न वापरता कॉटनपासून जीन्स बनवायला सुरवात केली. हो पण जीन्स बनवतात त्या कपड्याला डेनिम म्हणतात. पण आपण जीन्सला गेल्या काही वर्षांपासून डेनिम म्हणू लागलोय. जीन्सला सुरवातीपासूनच ब्लू जीन्स म्हटलं जात होतं.

जीन्स ब्लू का असते?

ब्लू म्हणायचं कारण एकच. जीन्स पारंपरिकरीत्या निळ्या रंगाचीच मिळत होती. डेनिम हे कापड नेहमीच निळ्या रंगात डाय केलं जात होतं. त्यामुळे तयार झालेली जीन्स निळ्या रंगाची होती. या जाड कपड्याला इंडिगो ब्लू रंग अगदी पक्का बसत होता. त्यामुळे पँट कितीही घासली, धुतली तरी त्याचा रंग निघत नव्हता.

मग ब्लू जीन्स हेच नाव युरोपियन देशांनी दिलं. हा निळा रंग म्हणजे भारतीय नीळचा रंग. नीळ वापरून डेनिमला आजही निळा रंग दिला जातो. ज्याला इंडिगो कलर म्हटलं जातं. गेल्या १५ ते २० वर्षांमधे अमेरिकेने डेनिम हा शब्द लोकप्रिय केला. डेनिमच्या कपड्यांच्या रेंजमुळे हे नाव आता सगळ्यांच्या तोडावर आलं.

हेही वाचा: लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे

कामगार वर्गाची जीन्स मिलिटरीसाठी

खरं तर ज्या कामगार वर्गासाठी ही जीन्स बनवलेली होती त्यांना ती वापरायला सोपी झाली. मिल, खाणीत, वस्तू वाहण्याचं काम करणाऱ्या मजदूरांसाठी ही जाड पँट उपयोगी ठरली. लवकर फाटत नव्हती, जाड असल्यामुळे त्यांच्या शरीराचं दगड, मातीपासून रक्षण होतहोतं. पँटची किंमत थोडी जास्त असली तरी बरीच वर्ष पँट चालत असल्यामुळे त्यांना परवडत होती.

कामगारांना पँट आवडली तरी या जीन्सने पुढे जाऊन एक मोठी उंची गाठली. अमेरिकन सिविल वॉर आणि पहिल्या वर्ल्ड वॉरमधे लेवीने मिलिटरीसाठी जीन्सची पँट बनवली. त्यांच्यासाठी ती सैनिकांना खूप उपयोगी ठरली. इथूनच पुढे जीन्सला सर्व स्तरातून पसंती मिळाली. आणि खऱ्या अर्थाने ब्लू जीन्स एराला सुरवात झाली. जीन्सच्या लोकप्रियतेत लिवाइसचं खूप मोठं श्रेय आहे.

तरुणांमधे लिवाइस जीन्सची क्रेझ

१९८० मधे लिवाइस हा जीन्समधला जगातला सगळ्यात मोठा ब्रँड बनला. त्यांनी वेगवेगळ्या जाहिरातींचं कॅम्पेनही केलं. त्यांनी तरुणांना टार्गेट करत त्यांच्यासाठी कावबॉय जीन्स आणली. या जीन्सला तरुणांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर त्यांनी रॉकर, मोड, हिप्पर आणि ग्रेसर्ससारख्या जीन्स आणल्या. याच सबकल्चर्स दिसून आले. म्हणजेच वेगवेगळ्या कम्युनिटीजमधल्या कल्चरच्या छटा त्या जीन्सच्या डिझाइनमधे होत्या.

लिवाइस जीन्सने बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या जीन्समधेसुद्धा अनेक बदल केले. आताच्या कॉर्पोरेट कामाच्या पद्धतीनुसार सॉफ्ट जीन्स बनवली. सध्या हा ब्रँड ११० देशांमधे आहे. त्यांनी २००२ नंतर काढलेली सिग्नेचर जीन्सची रेंज आजही खूप पॉप्युलर आहे. सध्या त्यांनी वर्कवेअर आणि जॅकेटच्या रेंजही बाजारात आणलीय.

हेही वाचा: आज वर्ल्ड व्हिस्की डेः बसण्याआधी हे वाचायलाच हवं

आणि लिवाइसने स्मार्ट जॅकेट लॉंच केलं

लेवी स्ट्रॉस अँड कंपनीने वॉलमार्ट आणि गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांबरोबर वेंचर केलंय. गुगलसोबत त्यांनी स्मार्ट जॅकेट २०१७ मधे लॉंच केलं. अँड्रॉइडमधे फिट केलेल्या फंक्शननुसार हे जॅकेट आपल्याला अलर्ट करतं, सूचना देतं.

सध्या बाजारात स्किनी, स्लिम, स्ट्रेट, बुटकट, टॅपर, रिलॅक्सड, फ्लेअर इत्यादी प्रकारच्या जीन्स आहेत. तसंच त्यांनी जीन्स व्यतिरिक्त शर्ट, टीशर्ट, अंडरगारमेंटपासून शू,एक्सेसरीजपर्यंत सर्व प्रोडक्ट लॉंच केलेत. आपल्याला माहिती आहे का, जीन्समधे डिझाइन किंवा कट देण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं.

यामुळे अनेकदा मांड्यांवर रॅश उठतात. त्यामुळे लेवी कंपनीने त्यांच्या प्रेस रिलिजमधे असं म्हटलंय, २०२० पर्यंत त्यांना केमिकलच्याऐवजी लेजर तंत्र जीन्स मेकिंगमधे आणायचंय. याच लेवी कंपनीने जीन्सचा ट्रेंड बनवला. जो आज इतक्या वर्षांमधे टिकून आहे. या कंपनीचे मार्च २०१९ मधले शेअर्स ६.६ बिलियन युएस डॉलर्सवर पोचले होते.

हेही वाचा: 

एक्झिट पोलचा महाराष्ट्रापुरता साधासरळ अर्थ असा आहे

देशभरातल्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात, ते इथे वाचा