अँजेलिना जोलीला बड्डे विश करण्यापूर्वी हे वाचा

०४ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आपल्याला अँजेलिना जोली खूप आवडते. आपण तिला सोशल मीडियावर फॉलोसुद्धा करतो. तिचे बरेच सुपर हिट सिनेमे पाहिलेत. तिच्या सौंदर्यावर फक्त पुरुषच नाही महिलाही तेवढ्याच फिदा आहेत. ९० चं दशक गाजवलेली ही अॅक्ट्रेस आजही तेवढीच फेमस आहे. पण एवढंच नाही, ती एक मानवतावादी कार्यकर्ताही आहे.

जगातल्या सगळ्यात सुंदर एक्ट्रेसमधे वारंवार नाव घेतलं जातं, ती म्हणजे अँजेलिना जोली. जगभरात तिचे दिवाणे आहेत. ही हॉलिवुडची एक्ट्रेस फक्त तिच्या सौंदर्यासाठी नाही तर तिच्या बुद्धिमत्तेसाठीसुद्धा फेमस आहे. तिला ब्युटी विथ ब्रेन असंही तिचे काही चाहते म्हणतात.

याच बिनधास्त आणि बोल्ड अँजेलिनाचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे ४ जून १९७५ ला कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलसमधे झाला. तिचं बालपण न्यूयॉर्कमधे गेलं. तिचे वडील जॉन वॉइग्ट हे हॉलिवुडमधे एक्टर होते. म्हणजे एक्टींगचं बाळकडू तिला घरातून वारशाने मिळालं.

स्वमेहनतीने अभिनेत्री बनली

ती ११ वर्षांची असताना पुन्हा लॉस एंजेलसला शिफ्ट झाली. तिचे वडील सिनेक्षेत्रातले तिचे गॉडफादर. असं असतानाही तिने लॉस एंजेलसमधे फिल्म अँड थिएटर इंस्टीट्युटमधे २ वर्षं प्रशिक्षण घेतलं. पुढे न्यूयॉर्क युनिवर्सिटीतून थिएटरचा अभ्यास केला. १६ व्या वर्षापासून स्वत: धडपड करून काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती.

काम मिळत नसल्यामुळे आपल्या भावाच्या कॉलेज असाईनमेंटच्या शॉर्टफिल्ममधे काम केलं. पुढे ती अनेक म्युझिक वीडिओमधे दिसली. सायंस फिक्शन सायबॉर्ग २ हा तिचा पहिला लीड रोल असलेला सिनेमा १९९३ ला रिलिज झाला. यानंतर मात्र तिला कधीच मागं वळून बघावं लागलं नाही.

हेही वाचा: टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

अँजेलिनाची ऑस्करपर्यंतची झेप

१९९५ ला आलेला हॅकर सिनेमा तिच्या करिअरला दिशा देणारा ठरला. पुढे तिने जिया नावाचा टीवी सिनेमा म्हणजेच सिरीज केली. ज्यात तिने मॉडेलच्या आयुष्यातला संघर्ष साकारला. आणि याच भूमिकेसाठी तिला ऑस्करनंतरचा सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला. इथूनच तिची लोकप्रियता वाढत गेली.

आजही गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या प्रश्नांमधे ‘वाय अँजेलिना जोली इज फेमस?’ हा प्रश्न आहे. तिच्या फेमस होण्यामागची अनेक कारणं आहेत. त्यातलं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिने साकारलेला गर्ल, इंटरप्रिटेड हा १९९९ ला रिलिज झालेला सिनेमा. हा सिनेमा अमेरिकेतल्या प्रसिद्ध लेखिका सुसान केयसन यांच्या गर्ल, इंटरप्रिटेड या कादंबरीवर आधारीत आहे. या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यात अँजेलिनाला बेस्ट सपोर्टींग रोलचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

हेही वाचा: अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

दिग्दर्शन आणि निर्मितीत पाय रोवले

यामुळे ती ९० चं दशक गाजवणाऱ्या एक्ट्रेसपैकी एक ठरली. ‘अ मायटी हार्ट’, ‘स्काय कॅप्टन अँड द वर्ल्ड ऑफ टुमारो’, ‘वाँटेड’, ‘चॅलेंजिंग’, ‘सॉल्ट’, ‘प्लेइंग बाय आर्ट’, ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’ या अँजेलिनाच्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत पुढे भरपूर नावं जोडली गेली. मग ती डायरेक्टिंग आणि प्रोडक्शनमधेही उतरली.

अँजेलिनाने स्वत:ला कधीच कोणत्या चौकटीत ठेवलं नाही. तिने सर्व प्रकारचे सिनेमे केले. तिच्या दिग्दर्शनातून आणि कथेच्या निवडीतून ती मानवतावादी असल्याचं दिसून येतं. तिने आर्ट सिनेमे बनवण्यावर भर दिला. तिचे सिनेमे वेगळ्या दाटणीचे होते. तिने यात क्रिएटिविटीला प्राधान्य दिलं.

२००७ मधे तिचा ‘अ प्लेस इन टाईम’ हा सिनेमा रिलिज झाला. पुढे २०११ ला ‘इन द लँड ऑफ ब्लड अँड हनी’, २०१४ ला ‘अनब्रोकन’, २०१५ ला ‘बाय द सी’ आणि २०१७ ला ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर’ इत्यादी सिनेमे तिच्या डायरेक्शनखाली आले.

तसंच तिने बऱ्याच सिनेमांची निर्मितीही केलीय. त्यात कम अवे, मेलेफिसन्ट आणि याचा दुसरा भाग मेलेफिसेन्ट मिस्ट्रेस ऑफ एविल. त्याचबरोबर पुढच्या वर्षी अँजेलिना निर्माती म्हणून गोरील्ला आणि इतर प्राण्यांची गोष्ट असलेला द वन अँड ओन्ली इवान हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा: अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

अँजेलिनाबद्दल गॉसिपिंग

अँजेलिना एकूण सिनेक्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे सक्रीय असते. याचबरोबर तिचं एंडोसमेट्स, जाहिराती, फोटोशूट सुरु असतं. आपल्याला माहिती आहे का, की वोग, पीपल, वॅनिटी फेअर सारख्या जगभरातल्या असंख्य मॅगझिनने तिला जगातली सगळ्यात सुंदर महिला म्हणून नावाजलंय. तर एसक्वायर आणि एफएचएम या पुरुषांच्या मॅगझिनने अँजेलिनाला सेक्सिएक्ट वुमन अलाईव्हचा किताब दिलाय.

ती कुठेही गेली की तिच्या मागेपुढे मीडिया, पॅपराझी सतत तिला शूट करत असतात. तिचे फोटो काढत असतात आणि तिच्या हालचालीची बित्तंबातमी देत असतात. तिच्या सिनेमांपासून त्याचं चित्रीकरण, तिचे ड्रेस ते अगदी तिच्या पर्सनल आयुष्यातलं लग्न, घटस्फोट, मुलं या सगळ्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असते. पण या सगळ्यात ती एक मानवतावादी विचारांची, महिलांचे मुद्दे पुढे आणणारी बाई आहे, हीच गोष्ट ठळकपणे समोर येते. तिला नेहमीच सुंदर आणि सेक्सीबरोबरचं बंडखोर असंही म्हटलं गेलंय.

हेही वाचा: माणसात असलेला काला बंदर कसा काढता येईल?

अँजेलिनाचं मानवतावादी काम

तिच्याबद्दल होणाऱ्या या सगळ्या गॉसिपिंगमधे आणि तिला दिली जाणारी लेबल, विशेषणं, किताब याकडे ती फार लक्ष देत नाही. अँजेलिना २००१ मधे युएनच्या रेफ्युजी कमिशनची गुडविल अम्बॅसिडर बनली. तिने कंम्बोडियातल्या रेफ्युजीसाठी स्वत: तिथे जाऊन मदत केली. जगात शांती नांदावी म्हणून जगातल्या जवळपास सर्व देशांचा दौरा केला.

तसंच रेफ्युजींच्या हक्कांसाठी आणि त्या हक्कांचं कायद्यात रुपांतर व्हावं यासाठी तिने खूप प्रयत्न केले. त्यासाठी तिला २००५ मधे ग्लोबल ह्युमॅनिटरिअन एक्शन पुरस्कार मिळाला. सध्या अँजेलिना तिच्या सिनेमांच्या कामासह सेक्शुअल वॉयलेंसवर काम करतेय. स्वतःच्या करिअरसोबतच आपल्या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करणाऱ्या आज बड्डे विश तर केलंच पाहिजे.

हॅप्पी बड्डे डिअर अँजेलिना.

हेही वाचा: 

शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

ट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा

ऑस्करच्या आयचा घो!