लॉकडाऊनमधे चिअर्स करण्याआधी हे वाचायलाच हवं

१८ मे २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


चला आता बसुया, असे डायलॉग मित्रमंडळींमधे नेहमीच बोलले जातात. बसुया म्हणजे काय तर दारू पिणं. आता दारूमधे प्रत्येकाचे आवडते ब्रँड आणि प्रकार आहेत. पण हाय स्पिरीट ड्रिंकमधे व्हिस्की पहिली येते. दर मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी वर्ल्ड व्हिस्की डे साजरा करतात. सध्या तर लॉकडाऊनचे दिवस आहेत. मग तुम्हाला कोणती व्हिस्की आवडते, स्कॉटिश की आयरिश?

दारू. दारू ही नशा घर, नातेसंबंध उद्धवस्त करणारी, त्या माणसाच्या आयुष्याची पार वाट लावणारी. अशी कल्पना मागच्या दहा वर्षांपर्यंत आपण करत होतो. पण या आता दारू हे क्लास वर्गाचं ड्रिंक बनलेलं आहे. म्हणजे दारू पिणाराही क्लासी असल्याचं समजलं जातं. सेलिब्रेशनमधेही दारूचं महत्त्व अधिक वाढलं आहे. अरे हां, दारू काय? दारू म्हटलं की बेवडे, नको तितकं पिऊन रस्त्यात लोळण घेणारे आढवतात. त्यामुळे ड्रिंक्स, लिकर किंवा मग ज्या प्रकारची दारू पित आहात ते नाव घ्यावं. म्हणजे कोणाला राग येत नाही.

दारू प्राचीन काळातलं औषध होतं म्हणे

मग यात वाईन, बिअर, वोडका, जिन, व्हिस्की असे एक ना अनेक प्रकार आहेत. हे प्रकार म्हणजे शेवटी काय दारूच. यात अल्कोहल म्हणजे इथेनॉलचं प्रमाण कमी जास्त असतं एवढंच. पण यात मुख्य गोष्ट असते ती म्हणजे धान्य किंवा फळांचं आंबवणं. इजिप्तमधे साधारण ८ ते १० हजार वर्षांपूर्वी दारूचा शोध लागला. हा शोध लागला तेव्हा लाकडी डब्बे किंवा साठवून ठेवण्याची पद्धत आली होती.

हा काळ म्हणजे मेसोपोटेमियन इतिहासाचा सुरवातीचा काळ. तेव्हा बॅबिलियॉन राजाचं राज्य होतं. लाकडी भांड्यात पदार्थ ठेवले असता, त्याचा पाण्याशी संपर्क आला आणि तो पदार्थ आंबला. मग त्यातून निघालेला द्रव पदार्थ म्हणजे दारू, ही माहिती सायंस फूड लेखिका रेब्बेका रुप यांनी दिली.

हा प्रकार प्रत्येक देशाच्या मानवी संस्कृतीशी निगडीत आहे. तसंच आंबवलेले पदार्थ हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात, त्यामुळे पोटाचे विकार दूर होतात. त्याकाळी नशेची गोष्ट म्हणून न औषधी म्हणून बघितले जात होते. अगदी आजही काही घरांमधे गहू, द्राक्षं, ऊसाचा रस आंबवण्याची पद्धत आहे. हे पदार्थ वर्षभर आंबवण्यासाठी ठेवतात. घरातील कोणाला पोटाचे विकार झाल्यास किंवा पोट दुखत असल्यास त्या दारूतला एक टीस्पून प्यायला देतात किंवा त्याने पोटाला मालिश करतात.

हेही वाचा: संजय मोने बोलावतायत, चला आमरस पुरी खायला

आणि दारूला राजाश्रय मिळालं

अन्नपदार्थाचं आंबलेल्या पाण्याचा वापर परंपरागच अनेक धार्मिक गोष्टीसाठी, विशेषत: तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी केला जातो. हा शोध आठ हजार वर्षांपूर्वीचा असला तरी इ. स. पूर्व ४०० पासून या दारूला राजाश्रय मिळण्यास सुरवात झाली, रुप यांनी सांगितलं. एखाद्या पदार्थाचा राजाच्या आणि राज घराण्याच्या आहारात समावेश झाला की त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढते.

त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येशू ख्रिस्ताने द्राक्ष रस निर्माण केला ही कथा आपण अनेकांनी ऐकलीय. वर्षानुवर्षं ख्रिस्ती मिशनऱ्यांनी याचा प्रसार केल्यामुळे आणि मास म्हणजे ख्रिस्ती  लोकांच्या प्रार्थनेदरम्यान फादरांनी द्राक्ष रस म्हणजे वाईन घेण्याची प्रथा असल्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली.

व्हिस्की लोकप्रिय का झाली?

पण दारू दारू काय, आज तर व्हिस्की दिन आहे. सगळ्या प्रकारच्या दारूचं मूळ हे अल्कोहल म्हणजेच आंबवणं आहे. तिथूनच पुढे वेगवेगळे प्रकार उदयाला आले. व्हिस्कीचा जन्म स्कॉटलॅंडमधे झाला की आयर्लंडमधे यावर अजूनही इतिहासकारांचं एकमत झालेलं नाही. खरं तर इ. स. १०० मधे मध्य पूर्व आशियामधले ख्रिस्ती दारू बनवत होते. याचा उल्लेख प्राचीन ग्रीक फिलॉसॉफर अलेक्झांडर यांनी त्यांच्या हस्तलिखितात केला आहे.

हेही वाचा: अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

हीच पद्धत व्हिस्की बनवण्यासाठी इ. स. १२०० मधे स्कॉटलॅंड आणि आयर्लंडमधे वापरली गेली. व्यापार आणि धर्म प्रसाराच्या निमित्ताने फिरणाऱ्या लोकांकडूनच पदार्थांची देवाण घेवाण झाली तसंच व्हिस्कीच्या बाबतीतही घडलं असल्याची माहिती फुड एक्सप्लोरर एमिली बेला यांनी दिली. पण विविध ठिकाणी व्हिस्की स्कॉटलॅंडची असल्याचं लिहिलं गेलं आहे. 

व्हिस्की तर स्कॉटलंडचं राष्ट्रीय पेय आहे. आणि १५ व्या शतकानंतर संपूर्ण जगात स्कॉटिश व्हिस्की लोकप्रिय झाली. त्यामुळे या व्हिस्कीला एकप्रकारचं ग्लॅमर आलं. यामागचं कारण म्हणजे इंग्लंडचा राजा हेन्री तिसरा याने राजघराण्यापुरता मर्यादित असलेली व्हिस्की सगळ्यांसाठी खुली केली. त्यामुळे व्हिस्कीचं उत्पादन वाढलं. सगळीकडे विकली जाऊ लागली.

आणखी एक गंमत म्हणजे १५०८ मधे एका डॉक्टरने एका पेशंटला व्हिस्की प्रिस्क्राइब केल्याचं सांगितलं जातं. त्याशिवाय का ते राष्ट्रीय पेय आहे. तसंच अमेरिकन राज्यक्रांतीच्यावेळी व्हिस्कीचा वापर करन्सीप्रामणे केला जात होता, असंही बेला सांगतात.

व्हिस्कीच्या दोन स्पेलिंग का आहेत? 

व्हिस्की पिताना त्यावरची स्पेलिंग वाचली आहे का किंवा इतर ठिकाणी कुठे वाचनाता व्हिस्कीच्या इंग्रजी स्पेलिंगमधली गडबड तुमच्या लक्षात आली आहे का? whisky आणि whiskey अशा दोन प्रकारच्या स्पेलिंग इंग्रजीत वापरण्यात येतात. यामागे काही विशेष असं कारण नाही. सर्व अमेरिकी आणि युरोपीयन उत्पादनांवर whiskey असा उल्लेख करतात. तर इतर जगभरातल्या उत्पादनांवर whisky असा उल्लेख करतात.

व्हिस्की ही सगळ्यात स्ट्रॉंग दारू समजली जाते. प्रत्येक ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या व्हिस्कीतली एक कॉमन गोष्ट म्हणजे साधारण एक ते तीन वर्ष तिला लाकडी रांजणात ठेवलं जातं. त्यामुळे त्यात खूप मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड तयार झालेला असतो. अशावेळी तिला ७८.५ डिग्री सेल्सिअसवर गरम केलं जातं. जेणेकरून त्याचं बाष्पिभवन होईल. ही दारू पिण्यायोग्य होईल. दारू आंबवण्यासाठी सध्या ईस्ट आणि साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, असं डॉ. विजय खुराना म्हणाले.

हेही वाचा: तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

व्हिस्की कशापासून बनवतात?

व्हिस्की बनवण्यासाठी मका, बार्ली, रे आणि गहू या  धान्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अमेरिकी व्हिस्कीमधे सर्वाधिक मक्याचा वापर केला जातो. यात प्रत्येक देशाची व्हिस्की बनवण्याची प्रत्येकाची आपली एक वेगळी स्टाईल दिसून येते. अमेरीकेत ५१ टक्के स्मॅशिंग तंत्र वापरलं जातं. म्हणजेच आंबवण्यासाठी ठेवलेलं धान्य फुगत जातं. ते पुन्हा बारीक करून पुन्हा पाण्यात ठेवावं लागतं.

तर आयरीश व्हिस्की ओक झाडाच्या लाकडाच्या रांजणात ठेवतात. हे लाकूड थोड सफेद कलरचं असतं. बॉटलमधे भरण्यापूर्वी किमान तीन वर्ष ही दारू राजंणात ठेवली जाते. ही बॉटलिंगपूर्वी अगदी स्मूथ बनवली जाते. स्कॉटिश व्हिस्कीला तर आंबवण्याची प्रक्रिया अर्धी झाली म्हणजे दोन वर्ष झाल्यावर स्मोक दिला जातो. ही व्हिस्की पूर्णपणे बार्लीपासून बनवतात. तर कॅनडिनयन व्हिस्की ही २ ते ३ प्रकारच्या धान्यांची बनवतात पण ती वेगवेगळे आंबवून मग एकत्र स्मूथ दारू बनवली जाते.

किती ते दारूचे प्रकार?

बरबॉन किंवा रे या अमेरिकी व्हिस्की आहेत. पण बरबॉन म्हणजे मक्याचा वापर करून बनवलेली. आणि रे म्हणजे रे या धान्याचे वेगवेगळे प्रकार वापरून बनवलेली. तसंच व्हिस्की स्पिरीट म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण सर्वाधिक असलेली दारू आहे. या कॅटेगरीत वोडका, जिन, जॅपनिज व्हिस्की म्हणजे स्कॉच, रम, ब्रॅंडी आणि स्च्नॅप्स हेसुद्धा येतात.

हेही वाचा: मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

पाण्यासारखाच दिसणारा वोडका पारंपरिकरीत्या रशियात बटाट्यापासून बनवला जातो. आणि रम म्हणजे सेम वोडकाच पण यात काकवीचा वापर केला जातो. रममधे डार्क आणि लाईट असे दोन असतात, ते रंग कॅरमलमुळे येतात. तर जिनसुद्धा अशीच बनवली जाते. मात्र यात द्राक्षाच्या रसाचाही वापर होतो. रम आणि जिन कॅरेबियन बेटांवर बनवली जाते. 

तर बॅंडी डचमधला वाईनचा प्रकार. यात वाईन हलकी बर्न केली जाते आणि अडीच वर्षं रांजणात साठवली जाते. म्हणूनच ही इतर वाईनपेक्षा थोडी हेवी असते, म्हणून ही नॅचरल स्पिरीटच्या कॅटेगरीत मोडत नाही. पोर्ट वाईन हा पोर्तुगीज वाईनचा प्रकार आहे. यात फक्त २० टक्के अल्कोहल असतं. द्राक्षांपासून बनवलेली ही वाईन फार काळ आंबवली जात नाही. शॅरी हा स्पेनमधल्या वाईनचा प्रकार देखील पोर्ट वाईनप्रमाणे बनवला जातो. आणि सगळ्यात लोकप्रिय असलेली बिअर पूर्वी अननसापासून बनवली जात होती. पण आता सफरचंद, द्राक्षं, गूळ, साखर, तांदूळ, गहू वापरून बनवतात.

दारू पिणारे आणि उत्पादन करणारे देश

सध्या जगभरात व्हिस्कीचं उत्पन्न घेतलं जात आहे. जगात सर्वाधिक व्हिस्कीचं उत्पन्न घेणारा स्कॉटलँड हा देश आहे. ७० कोटी लिटर एवढं उत्पन्न घेतलं जातं. त्यानंतर आयर्लंड हा ८ कोटी नऊ लाख लिटर उत्पन्न घेणार दुसरा देश तर अमेरिका ३७ लाख लिटरचं उत्पन्न घेते. आणि आपल्या भारतात १ कोटी २० लाख लिटरचं उत्पन्न झाल्याचं स्टॅटेस्टिका या मार्केट रिसर्च कंपनीच्या डेटा अनॅलिस्ट रिओ इटो यांनी २०१८च्या रिपोर्टमधे लिहिलं आहे.

व्हिस्की बनवली जाते. तशी प्यायलीही जाते. तर व्हिस्की पिणाऱ्या देशांमधे सर्वात पहिला नंबर लागतो तो पूर्व युरोपीयन देशांमधल्या मोलडोवा आणि बेलरुस. या देशांनी १७.४ ते १७.२ टक्के एवढी व्हिस्की गेल्या १५ वर्षांत घेतली आहे. तर सर्वात कमी पिणाऱ्या देशांमधे लिबिया हा शून्य टक्के व्हिस्की पिणारा देश आहे. त्यानंतर पाकिस्तान, कुवेतमधे ०.१ टक्के व्हिस्की घेतली गेली. भारतात २.५ ते ४.९ टक्के व्हिस्की घेतली गेली. असं स्टॅटेस्टिकाच्या २०१८च्या रिपोर्टमधे म्हटलं आहे. हा रिपोर्टमधे दर १५ वर्षांमधे किती दारू प्यायली जाते याची आकडेवारी दिलेली आहे.

हेही वाचा: 

आपला आपला अंदाजः सगळ्या पक्षांना विस्कळीतपणाचा फटका बसणार

कॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं