एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.
गाव म्हटलं की आपल्याला नदी लागते. नदीशिवायच्या गावाची आपण कल्पनाच करू शकत नाही. पण जगात तर असे काही देश आहेत की तिथे नदीच नाही. आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं अस्मानी संकट आहे. आपल्याकडे असलेल्या नद्यांचा वापर करण्यापेक्षा त्याची सांडपाणी केंद्र बनवण्यावर आपला भर अधिक असतो. मात्र त्या देशांमधली स्थिती पाहिली की हायसं वाटतं. त्यामुळे या नद्या नसलेल्या ह्या काही ठराविक देशांची माहिती करुन घ्यायला हवी.
दरडोई वार्षिक उत्पन्नाचा विचार केला तर कतार जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे. जगातले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेल आणि नैसर्गिक वायुचे साठे या देशात आहेत. कतार म्हणजे vमध्यपूर्वेतल्या अरबी बेटावरचा सर्वात छोटा देश. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया तर इतर बाजुंनी इराणचं आखात आहे.
हेही वाचाः उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?
ऐतिहासिकदृष्ट्या ओमानी लोक हे दर्यावर्दी. व्यापार हा मुख्य व्यवसाय असल्यानं त्यांनी भारतीय उपसागर, पूर्व आफ्रिका आणि मध्यपूर्वेत आपलं वर्चस्व निर्माण केलं. १९७० नंतर ओमेनची सत्ता ही सुलतान कबूस यांच्या हातात आली. त्यांनी सर्वसमावेशक धोरणं आखलं आणि सर्व मध्य पूर्वेतल्या लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवले.
मस्कत ही या देशाची राजधानी.जगातल्या मोठ्या बंदरांपैकी एक असलेलं हे बंदर. हे बंदर 'जहाज नांगरण्याची जागा' म्हणून ओळखलं जातं. ओमान प्राचीन वारसा आणि संस्कृती लाभलेला देश आहे. जवळपास ८ लाख लोकवस्ती असलेलं ओमान सगळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं.
प्रशांत महासागरातला किरीबाती हा अगदी छोटासा देश. प्रशांत महासागरात होत असलेल्या हवामान बदलांचा परिणाम हा थेट सामान्य लोकांच्या आयुष्यावर होतोय. प्रशांत महासागरात एकूण ३३ बेट आहेत. आणि त्यापैकी जवळपास २१ बेटांवर लोकवस्ती आहे. या बेटांना समुद्रापासून धोका आहे आणि त्यातूनच हे बेट संपुष्टात येईल असं २०१२ मधे तिथले तत्कालीन राष्ट्रपती एनोटे टोंग यांनी म्हटलंय.
समुद्राची पातळी सातत्याने वाढतेय त्यामुळे अनेक समस्यांचा सामना लोकांना करावा लागतोय. शेतीसाठी जमीन नाही. त्यामुळे इथल्या जवळपास लाख भराहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशाला मोठ्या प्रमाणात वस्तू आयात कराव्या लागतात. दिवसेंदिवस हा देश बुडत जातोय.
अर्थात इस्लाम धर्माचं उगमस्थान. मक्का आणि मदिना हि इस्लाम धर्मीयांची प्रमुख प्रार्थनास्थळ इथंच आहेत. तेलामुळे या देशाचं अर्थकारण घडलं. याच बळावर हा देश जगातल्या अतिश्रीमंत देशांच्या यादीत जाऊन बसलाय. १९३६ मधेच या देशानं तेलाचा व्यवसायाच्या दृष्टीनं विचार करायला सुरवात केली होती. आणि त्यातूनच आजचं या देशाचं महत्व जागतिक स्तरावर नजरेत भरणार आहे.
हेही वाचाः जालियॉंवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र लढ्याचा टर्निंग पॉईंट
१९६१ ला या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं. हा देश प्राचीन ऑटोमन किंवा तुर्की राजेशाहीचा भाग होता. १९ व्या शतकाच्या मध्यावर कुवैतने पेट्रोलियमच्या आधारावर आपल्या आर्थिक कक्षा रुंदावण्याला सुरवात केली होती. १९९० मधे इराकने या देशावर आक्रमण केलं. यात कुवैतचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अमेरीकेच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा हे राष्ट्र उभं राहिलं.
सात राज्य मिळून बनलेला देश अशी युएइची ओळख आहे. मध्य पूर्वेतलं सगळ्यात प्रगत राष्ट्र असं त्याला म्हटलं जातं. १९७१ मधे तत्कालीन राष्ट्रपती शेख झायेद यांनी आजुबाजुची अविकसित राज्यं एकत्र करुन ह्या राष्ट्राची उभारणी केली. तेल हा महत्त्वाचा घटक असला तरी त्याचा योग्य वापर या राष्ट्राने केला आणि जगभर आपली एक ओळख निर्माण केली.
आज पर्यटन आणि व्यापाराचं एक प्रमुख केंद्र म्हणून युनायटेड अरब अमिरातची ओळख बनलीय. या देशातलं एक नाव जगभर चर्चेत असत ते अबु धाबी आणि दुबई. इथलं सगळ्यात मोठं राज्य अबु धाबी. जवळपास २०० बेट मिळून बनलेलं. सात राज्यांमधलं सगळ्यात मोठं राज्य. तर आधुनिक आणि प्रगत असं जगातलं प्रमुख शहर ओळखलं जाणारं दुबई. या देशाची आर्थिक राजधानी. जगातली सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफा ही सुद्धा इथचं आहे.
हिंदी महासागरातल्या आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळचा एक बेट असलेला हा देश. १९१२ ते १९७५ या काळात कोमोरोस ही फ्रान्स या देशाची वसाहत होती. हा आफ्रिका खंडातला तिसरा सगळ्यात छोटा देश आहे. मोरोनी ही या देशाची राजधानी आहे. १९७५ मधे याला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालं. मात्र आजतागयत हा देश राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहे. देशातली अर्ध्याहून अधिक जनता दारिद्र्यरेषेखालचं जीवन जगतेय.
फक्त दोन चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा देश आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लहान देश. लोखसंख्या ही अंदाजे ३३,००० आहे. इथं राजेशाही सरकार आहे. मोनॅकोपासून इटलीची बॉर्डर केवळ १६ किलोमीटरवर आहे. मोनॅको हा सगळ्यात जास्त घनता असलेला देश आहे. इथल्या लोकांना आयकर भरावा लागत नाही हे विशेष. त्यामुळे इथली प्रत्येक व्यक्ती आज करोडपती आहे.
हेही वाचाः विकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहेत
युरोपातला एक छोटासा देश. क्षेत्रफळ अवघं ४४ हेक्टर. ख्रिश्चन धर्मगुरु पोप यांचं निवासस्थान इथं आहे. हे इटलीच्या रोम शहरात वसलेलं एक छोटं राज्य आहे. या देशाची लोकसंख्या जेमतेम असली तरी त्यांच्याकडे स्वतःची अशी स्वतंत्र सेना आहे. इथंली व्यवस्था ही राजेशाही स्वरुपाची आहे. पोप हा इथला राजा असतो. आणि पाच वर्षाकरता तो राष्ट्रपती नियुक्त करतो.
कतार आणि सौदी अरेबियाच्या मधे एका खाडीत असलेला बहरीन हा देश ३३ बेटांनी बनलेला आहे. बहरीन याचा अर्थ असा की जो चारी बाजूंनी समुद्राला लागुन आहे असा. बहरीन हा अरब देशांमधला सगळ्यात छोटा देश आहे. १९३२ मधे या देशाने सुरवातीला तेलाच्या साठ्यांचा शोध लावला होता. या देशाची करंसी ही दीनार आहे अर्थात २.६ अमेरिकन डॉलर. इस्लाम हा इथला अधिकृत धर्म असून अरबी ही या देशाची राष्ट्रभाषा आहे.
हा देश सगळ्यात उष्णता असलेला देश म्हणून ओळखला जातो. इथलं तापमान हे ४५ डिग्री सेल्सिअस इतकं असतं. ४०० वर्ष जुना असलेला मौसकुट हे इथला झाड खुप प्रसिद्ध आहे. ज्याला इथं ‘ट्री ऑफ लाईफ’ असंही म्हणतात.
हेही वाचाः
काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण
तेलंगणाने गोदावरीवर कसं उभारली जगातली सर्वांत मोठी पाणीउपसा योजना?