कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत जगभरात ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः वयस्कर पुरुष हे कोरोनाच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. पण हा केवळ स्त्री-पुरुष एवढ्यापुरता मामला नाही. त्यामागच्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणांचा शोधही घ्यायला हवा.
आपल्या सगळ्यांच्या डोक्यात सध्या एकच विषय आहे कोरोना. घराघरात कोरोनाचा प्रसार कधी थांबणार, किती लोक मेले, किती बरे झाले अशीच चर्चा सुरू आहे. त्यासोबतच जगभरातले अभ्यासक कोरोनाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या अँगलनं अभ्यास करताहेत.
अशाच एका अभ्यासानुसार, कोरोना वायरसनं जगभरातल्या पुरुष वर्गाला आपल्या टार्गेटवर घेतल्याचं समोर आलंय. आकडेवारीही तेच सांगते. या सगळ्यात 'जेंडर रोल' महत्वाचा ठरतोय. पण त्यामागे अनेक कारणं आहेत. आरोग्यासारख्या महत्वाच्या विषयाबाबत आपण किती गंभीर व्हायला हवं हे सांगणारा हा सध्याचा काळ आहे.
हेही वाचा : युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
चीन, इटली, स्पेन या देशांना कोरोना वायरसचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. या वायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाहिली की ते सहज दिसून येईल. हा एक कॉमन ट्रेंड म्हणायला हवा. या संदर्भात वेगवेगळी आकडेवारी समोर आलीय.
ग्लोबल हेल्थ ५०/५० ही संस्था आरोग्यविषयक लिंग समानता या विषयावर काम करते. सध्या ही संस्था सीएनएन न्यूजचॅनलच्या मदतीनं कोरोनाचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव असलेल्या २५ देशांचा अभ्यास करून डाटा गोळा करतेय. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ही आकडेवारी पब्लिश केली जाते. या २५ देशांपैकी इटली, चीन, जर्मनी, स्पेन, इरान, दक्षिण कोरिया, फ्रांस, नेदरलँड, पोर्तुगाल, डेन्मार्क आणि स्वीडन या देशांत स्त्री आणि पुरुष यांच्यात कोरोना संक्रमणाचं प्रमाण नेमकं कसं आहे हे सांगितलंय.
चीन आणि पोर्तुगालमधे कोरोना संसर्गानं महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या मोठी आहे. ग्लोबल हेल्थची २५ मार्चपर्यंतची आकडेवारी चीनमधल्या एकूण मृतांपैकी ७१ टक्के, तर पोर्तुगालमधे ७० टक्के पुरुष आहेत, असं सांगते.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?
चीन, इटली, स्पेन या तीन देशांतल्या मृतांची संख्या अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कोरोना वायरसच्या इन्फेक्शनचा धोका कमी आहे. यात 'जेंडरचा रोल' महत्वाचा ठरताना दिसतोय. कारण महिलांमधे असलेलं स्मोकिंग आणि ड्रिंकचं अर्थात व्यसनाचं प्रमाण हे पुरुषांइतकं जास्त नाही. याचाही परिणाम या आकड्यांमधे दिसतोय.
कोरोना वायरसची जी काही लक्षणं आहेत त्यातलं महत्वाचं लक्षण आहे श्वास घ्यायला त्रास होणं. हा वायरस आपल्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर हल्ला करतो. याला विज्ञानाच्या भाषेत 'रेस्पायरेटिव सिस्टीम' असं म्हटलं जातं. व्यसनाचं प्रमाण अधिक असलेल्यांमधे ही सिस्टीम अधिक गतीने काम करत असते. तिचं काम धीम्या गतीनं झालं तर शरीराच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होतो. कोणताही आजार सहज कब्जा करू शकतो. त्यामुळे अशा 'व्यसनी' लोकांसाठी या वायरसचा धोकाही अधिक असतो. असे लोक कोरोनाचं सॉफ्ट टार्गेट ठरतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओच्या एका रिपोर्टनुसार, जगभरातली १५ हून अधिक वय असलेल्या लोकांमधे स्मोकिंग करणारे पुरुष हे ३६ टक्के आहेत. हेच प्रमाण महिलांमधे ७ टक्के एवढं आहे. एक पुरुष वर्षभरात ११ लिटर दारू पितो. दुसरीकडे महिलांमधे हे प्रमाण २ लिटर इतकं आहे.
डब्ल्यूएचओनं चीन, इटली आणि स्पेन या देशांमधली यासंदर्भात दिलेली आकडेवारी महत्वाची आहे. चीनमधे ५० टक्के पुरुष स्मोकिंग करतात. तर महिलांच्या बाबतीत हेच प्रमाण २ टक्के आहे. इटलीत २८ टक्के पुरुष तर १९ टक्के महिला स्मोकिंग करतात. स्पेनमधे स्मोकिंगचं हे प्रमाण पुरुषांमधे ४० टक्के आणि महिलांमधे १७ टक्के इतकं आहे. ही आकडेवारी नेमकं काय सांगते? तर जगभरात आज स्मोकिंग करण्याचं प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमधे जास्त आहे. आणि कोरोना वायरसनं अशाच लोकांना आपलं एक सॉफ्ट टार्गेट केलंय.
हेही वाचा : तैवान कोरोना डायरी २: विलगीकरणात क्रिएटिव जगता येतं
कोरोना वायरसचा संसर्ग हा वयस्कर आणि त्यातल्या त्यात पुरुषांमधे अधिक प्रमाणात आढळतो. यामागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत. खरंतर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती ही वेगवेगळी असते. त्यात त्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती टिकवण्यात त्या व्यक्तीचं वयही तितकंच महत्वाचं ठरतं.
लहान मुलांचा विचार केला तर त्यांच्यामधे कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण कमी आहे. पुरुष आणि महिलांचा विचार केला तर पुरुषांना याचा धोका अधिक आहे. आणि त्यातल्या त्यात वयस्कर पुरुषांना याचा धोका तर सर्वात जास्त आहे.
पुरुषांना याचा धोका जास्त असण्याचा संबंध एका प्रोटिनशी जोडला जातोय. याबद्दल मध्यंतरी इंडिया टुडेवर एक लेख आला होता. त्यात याबद्दल विस्तृत माहिती दिली होती. एसीइ २ हे एक प्रोटीन आहे. या प्रोटीनचा संबंध आपल्या शरीरातल्या एन्झाईमशी आहे. एन्झाईमचं काम हे आपल्या प्रथिनांच्या जटिल रचना असतात त्यांच्या जैवरासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवण्याचं असतं. तर हे एसीई २ एन्झाईम ब्लडप्रेशरशी संबंधित आहे. हे प्रोटीन आपलं ब्लडप्रेशर सुरळीत करण्याचं काम करतं.
कोरोना वायरस सगळ्यात जास्त एसीइ २ वर परिणाम करतो. वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर वय वाढतं तसं एसीइ २ चं प्रमाणही वाढत जातं. त्यामुळे साहजिकच वयस्कर व्यक्तींमधे कोरोनाचा संसर्ग अधिक होताना दिसतोय. स्त्री-पुरुषांचा विचार केल्यास पुरुषांवर त्याचा अधिक परिणाम दिसतो. त्यामुळे या वायरसचं सॉफ्ट टार्गेट हे पुरुष आणि त्यातल्या त्यात वयस्कर पुरुष असल्याचं दिसतं.
म्हणजेच काय तर कोरोना वायरस हे काही आपलंसारखं, माणसारखं स्त्री-पुरुष असा भेदभाव करत नाही. ते फक्त कमजोर, दुबळी प्रकृती असलेल्यांना आपल्या टार्गेटवर घेतं. तिथं गरीब, श्रीमंत असाही काही भेद चालत नाही. राजा असो की रंक कमजोर प्रकृतीचा असेल तर कोरोना वायरस त्याला एका रांगेत उभं करतो.
हेही वाचा :
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही
लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर