गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं. कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो.
आरोग्य विम्याच्या अनेक पॉलिसीत घरातच उपचाराची सुविधा असते. पण दोन परिस्थितीतच अशा प्रकारची परवानगी मिळते. पहिलं म्हणजे हॉस्पिटलमधे बेड उपलब्ध नसेल तर आणि दुसरं म्हणजे गंभीर पेशंट हा हॉस्पिटलपर्यंत पोचू शकत नसेल तर विमा कंपन्यांकडून दिले जाणारे लाभ हे पॉलिसीधारकाला दिले जातात.
यात कोरोना पेशंटचा समावेश आहे. हा पर्याय सहा ते सात वर्षांपासून नियमित दिला जातोय. बहुतांश विमा कंपन्या या घरातच उपचारापोटी आलेल्या खर्चाची भरपाई देण्याचं नियोजन करतात. पण दावा करताना पॉलिसीत हॉस्पिटलायजेशन ऍट होमची अट आहे की नाही, हे पाहणं गरजेचं आहे.
हेही वाचा: एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय
गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं.
कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो. विशेष म्हणजे पॉलिसीची रक्कम ही केवळ एकाच व्यक्तीला मिळू शकते. कुटुंबातल्या इतर सदस्यांना वेगवेगळी पॉलिसी घ्यावी लागेल. इर्डाने पॉलिसीचा कालावधी हा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवलाय. तो याआधी ३१ मार्च होता.
अनेक विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना होम केअर पॅकेजची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या पॅकेजच्या आधारे आयसोलेट राहून उपचार करणार्यांना विमा योजनाचा लाभ मिळू शकतो.
विमा कंपन्या या होम केअर पॅकेजमधे औषधं, घरातच नर्स, डॉक्टरचं कन्सल्टेशन, सीटी स्कॅन, एक्स रे आणि कोरोना चाचणीचा खर्च देत आहे. पेशंटचा रिपोर्ट निगेटिव येत नाही, तोपर्यंत सर्व वैद्यकीय खर्च यात कवर केले जातात.
हेही वाचा: डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?
घरातच कोरोनावर उपचार करताना आयसीयूसारखी सुविधा आणि उपचाराची गरज भासली तर विमा कंपन्या खर्च देतील की नाही, हे सांगता येत नाही. याबद्दलचं स्पष्टीकरण नव्याने पॉलिसी घेताना पॉलिसी कंपनीकडून घेतलं पाहिजे. अनेक कंपन्या होम केअरच्या सुविधेंतर्गत पॉलिसीच्या एकूण रकमेपैकी १० ते ५० टक्केच रक्कम देत आहेत.
होम केअरनुसार विम्याचा दावा करताना सर्व टेस्टिंग रिपोर्ट, औषध खरेदीच्या पावत्या, सीटी स्कॅन रिपोर्ट, डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन ही कागदपत्रं असणं गरजेचं आहे. कोणत्याही कंपनीचा आरोग्य विमा घेताना होम आयसोलेशन किंवा होम केअरची सुविधा आहे की नाही, हे तपासून पहावं.
पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी आरटीपीसीआरचा पॉझिटिव रिपोर्ट हा आयसीएमआरच्या मंजूर प्रयोगशाळेतला असावा. यात स्पेसिमन रेफरल फॉर्म आयडी असणंही गरजेचं आहे. होम आयसोलेशन आणि उपचारादरम्यानचा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
तसंच घरातच उपचार करण्यासंदर्भातचा सल्ला डॉक्टरांनी लिखित स्वरूपात दिलेला असावा. ही शिफारस विमा कंपनीला दाखवावी लागेल. काही कंपन्या नेटवर्कमधल्या हॉस्पिटलच्या डॉक्टरची होमकेअरची शिफारस ग्राह्य धरतात.
हेही वाचा:
अचूक गुंतवणुकीतून महागाईवर मात कशी करायची?
सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?
(हा लेख दैनिक पुढारीत पूर्वप्रसिद्ध झाला आहे)