भावांनो, आपल्या लाडक्या टिकटॉकवर पुन्हा बंदी येणार?

२१ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधे लाखो अॅप असतील. आपण त्यातले काही फेमस आणि गरजेचे अॅप वापरतो. पण आपल्याकडे सगळ्यागोष्टींसाठी कायदे आहेत. तसे डिजिटल मीडियासाठी नाही. आता बाईट डान्सच्या टिक टॉक आणि हॅलोच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरुय. तर बाईट डान्स काय म्हणतंय तक्रारीबद्दल.

टिक टॉक अॅप म्हणजे मस्त विरंगुळा. एप्रिल महिन्यापासून हे अॅप सातत्याने चर्चेत येतंय. या अॅपमुळे देशात वेगवेगळ्या वाईट घटना घडल्यामुळे अॅप बंद करण्यात येणार होतं. पण बंदी उठल्यानंतरही या अॅपची चर्चा काही थांबली नाही. आणि या चर्चेत टिक टॉकचा भाऊ हॅलोलासुद्धा सामील केलंय. या दोघांना देशद्रोही अॅपही म्हटलं गेलं. पण आता तर या अॅपच्या कंपनीला थेट सरकारनेच नोटीस पाठवलीय.

जगातल्या ७५ भाषांमधे हॅलो आणि टिक टॉक

या चिनी अॅपला केंद्र सरकारने २१ प्रश्न विचारलेत. आणि प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर हे अॅप भारतातून हद्दपार करण्याचा इशाराही दिलाय. आता असं काय झालं म्हणून सरकारने हे पाऊल उचललं?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसची इकॉनॉमिक विंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वदेशी जागरण मंचने दोन्ही अॅपची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीय. या तक्रारीनंतर इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही पावलं उचलली आहेत.

यिमिंग झांग या चिनी तरुणाने २०१२ मधे बाईट डान्स टेक्नॉलॉजी ही आयटी कंपनी सुरू केली. याच कंपनीने २०१६ मधे डॉयिन नावाचं अॅप लाँच केलं. त्याला चीनमधे प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच अॅपचं रूपांतर पुढे टिकटॉकमधे झालं. तसंच डिसेंबर २०१८ मधे हुक्सि आलं. जे जून २०१८ मधे हॅलो म्हणून इतर देशांमधे लॉंच झालं.

टिक टॉक हे शॉर्ट वीडियो शेअरींग अॅप आहे. तर हॅलो हे कंटेट शेअरींग अॅप आहे. सध्या भारतात टिकटॉकचे दीड कोटी युजर्स आहेत तर हॅलोचे एक कोटी फॉलोवर्स आहेत. या अॅपमधे जगातल्या ७५ भाषांचा समावेश करण्यात आलाय. आता मात्र या अॅपवर खूप टीका होतेय. अॅप सातत्याने वादात सापडतंय.

हेही वाचा: बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

अमेरिकन सरकारने ठोठावला दंड

अमेरिकेत या दोन्ही अॅपवर खूप टीका होतेय. बाईट डान्स कंपनीच्या या अॅपवरुन लोकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित नाही. आणि लहान मुलांकडून अवैधरीत्या त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती काढून घेतली जाते, असा आरोप केला होतो. आणि हा आरोप काही अंशी खरा ठरल्यामुळे या कंपनीला ५० लाख ४० हजार युएस डॉलर्स एवढा दंड भरावा लागला.

स्वदेशी जागरण मंचाच्या समन्वयक अश्विनी महाजन यांनी टीका केली. त्यांच्या मते, टिक टॉक आणि हॅलो अॅप म्हणजे देशद्रोही लोकांचा अड्डाचं बनलाय. तरुणांमधे लोकप्रिय असलेल्या अॅपचा वापर करून तरुणांना देशाविरोधात, सरकार विरोधात भडकवलं जातंय.

हेही वाचा: रशियन फेसअॅपवर फोटो एडिट करताय. मग आपण सावध राहिलं पाहिजे

सरकारने कोणते प्रश्न विचारलेत?

हॅलो अॅपने मॉर्फिंग केलेल्या ११ हजार राजकीय जाहिराती इतर सोशल मीडिया साईट्सना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलाय. हा मुद्दा आरोपकर्त्यांकडून ठळक केला जातोय. कारण यातून बऱ्याच राजकीय नेत्यांची बदनामी करण्यात येतेय. तसंच अश्लिल, भयावह असा कंटेट दाखवायला सुरवात केल्याचाही आरोप होता यावरही उत्तर मागितलंय. आणि भारतातले सायबर कायदे समजून घेण्याचाही सल्ला दिलाय.

त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे १३ वर्षांच्या पुढची कोणतीही व्यक्ती हे दोन्ही अॅप वापरू शकते. यावरुन मुलांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न विचारण्यात आलाय. कायद्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्तीला मुलं मानलं जातं. मग मुलांना हे अॅप वापरण्यापासून कसं, काय रोखणार?

हेही वाचा: अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणू

बाईट डान्स कंपीनीचं उत्तर काय?

या सगळ्यावर बाईट डान्स कंपनीने म्हटलं, आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करू. तसंच आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू. आम्ही आमच्या यशात भारतीय बाजाराचा आणि इथल्या लोकांचा मोठा वाटा आहे. यापुढे आम्ही समाजाचे मुद्दे अधिक गांभीर्याने घेऊ. त्याचबरोबर आज आम्ही डिजिटल इंडियाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनलोय. आमचे दोन्ही अॅप हे १५ भारतीय भाषांमधे आहेत.

पुढच्या तीन वर्षांत भारतात आम्ही १ अब्ज युएस डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत. तसंच नव्या तंत्रज्ञानाच्या आधाराने इन्फ्रास्ट्रक्चर बनवू, स्थानिकांना नोकऱ्या देऊ. इथल्या लघु उद्योजकांना या प्रकल्पात भागीदार बनवू. आणि स्किल इंडिया उपक्रमाला पाठिंबा देऊ, असं कंपनीचं म्हणणं आहे.

चिनी कंपनीने वेगवेगळी आश्वासन दिलीत. पण या आश्वासनांवर सरकार विश्वास ठेवणार का आणि आपल्या लाडक्या टिकटॉकची टिकटिक सुरू राहणार का हे आपल्याला येत्या काळातच कळणार आहे. त्यामुळे सध्या तरी आपणच टिकटॉक वाजतंय जोरात असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा: 

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

मार्शल आर्टचा अनभिषिक्त सम्राट ब्रुस ली खूप मोठा फिलॉसॉफरही आहे

सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं ही खरंच मिरवण्याची गोष्ट आहे?

पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?