फळांचे, भाज्यांचे, औषधांचे वाढते भाव, शिक्षणाचं खासगीकरण, वैद्यकिय सुविंधांच्या वाढणाऱ्या किमती यासगळ्यातून महागाई किती वाढतीय हे तर दिसतंच आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अर्थिक ओझं हलकं करण्यासाठी गुंतवणूकीतून पैसे कमवणं हा बेस्ट मार्ग आहे. पण ही गुंतवणूक योग्य व्हायला हवी.
महागाईचा दर पुन्हा चार टक्क्यांपेक्षा वर गेलाय. ऑक्टोबरमधे ठोक महागाईचा दर हा ४.६२ टक्के होता. सप्टेंबरमधे हाच दर ३.९९ टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमधे ठोक महागाईचा दर ३.३८ टक्के राहिला आहे. वाढत्या महागाईपासून स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असेल, तर इक्विटीला गुंतवणुकीत सामील केलं पाहिजे. कारण इक्विटी म्यूच्युअल फंडमधे गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते. इक्विटीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी.
सध्याच्या काळात इक्विटी म्युच्युअल फंडने १२ ते १५ टक्के परतावा मिळू शकतो. या आधारावर मुलांचं शिक्षण वगैरे ध्येयं आपण सहजपणे पूर्ण करू शकू. त्यासाठी एक मंत्र लक्षात ठेवावा. नुकसान होणार नाही अशाच ठिकाणी आपले पैसे गुंतवले जातायत याबाबत सजग असावं. या आधारावर आपला पैसा सुरक्षित राहील आणि चांगला रिटर्नही म्हणजेच परतावा मिळेल.
मुदत ठेवीऐवजी डेट फंड हा चांगला पर्याय मानता येईल. डेट म्युच्युअल फंडची डेट इन्स्टुमेंटमधे गुंतवणूक होते. बाँड, डिबेंचर्स, सरकारी सिक्युरिटीज इत्यादी डेट फंड म्हणून ओळखले जातात. डिपॉझिट सर्टिफिकेट, कमर्शियल पेपरदेखील डेट इन्स्ट्रुमेंट म्हणून ओळखले जातात. वेगवेगळी आर्थिक ध्येयं गाठण्यासाठी मुदत ठेवीपेक्षा डेट फंड चांगला परतावा देतात.
मुदत ठेवीत परतावा खूपच कमी मिळतो. आजच्या घडीला मुदत ठेवींवरील व्याजदर कमी होत चाललेत. पोस्ट टॅक्स रिटर्नदेखील चांगले दिसत नाहीत. त्यामुळे महागाई दरावर मात करण्यासाठी मुदत ठेवी हे पुरेसं शस्त्र नाही.
हेही वाचा : एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय
इक्विटीला गुंतवणुकीचा भाग बनवा. कारण इक्विटी म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करणं नेहमीच फायद्याचं ठरलंय. इक्विटीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवा. या काळात १२ ते १५ टक्के परतावा मिळू शकतो. या आधारावर मुलांचे शिक्षण, विवाह यासारखी ध्येयं इक्विटीच्या माध्यमातून पूर्ण करता येतात.
व्यक्तिगत पातळीवर दरवर्षी खर्चात वाढ होत चाललीय. दरवर्षी साधारणत: १० ते १२ टक्क्याने खर्चात वाढ होते. महागाई ही सामान्यांसाठी मोठी गोष्ट असते. वैद्यकीय आणि शिक्षणाच्या खर्चात वाढ होतेय. अशा स्थितीत दीर्घकाळासाठी ध्येय निश्चित करायचं असेल, तर महागाईचा दर हा सरासरी ८ ते १० टक्के गृहीत धरला पाहिजे.
हेही वाचा : सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?
सोनं महागाई दरावर काही प्रमाणात अंकुश ठेवण्याचे काम करते. दीर्घकाळात महागाई 6 टक्क्याने वाढली असेल, तर सोन्याऐवजी इक्विटी किंवा डेट फंडमधे गुंतवणूक फायद्याची आहे. या दोन्ही गुंतवणुकीतून 6 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळण्याची हमी मिळते.
भाड्यातून मिळणार्या उत्पन्नातून काही प्रमाणात महागाई दरावर मात करू शकतो. यासाठी वाढत्या महागाईच्या आधारावर भाड्यात वाढ करायला हवी.
हेही वाचा : रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?
आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणुकीची संधी निर्माण झालीय. अॅपल, फेसबुक, गुगलसारख्या कंपनीत गुंतवणूक समाधानकारक परतावा देतात. त्यामुळे भारतात लिस्टेड नसलेल्या कंपनीत गुंतवणूक करावी.
पण दीर्घकाळासाठी आंतरराष्ट्रीय फंडची कामगिरी चांगली नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं असतं. त्या तुलनेत घरगुती फंडने चांगला परतावा दिला आहे. भारतीय शेअर बाजारात या कंपन्यांची कामगिरी पाहूनच गुंतवणुकीचा विचार करायला हवा.
पोर्टफोलिओमधे डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं असतं. डायव्हर्सिफिकेशनमुळे जोखीम कमी होते. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक. वेगवेगळ्या असेट क्लासमधे होणारी गुंतवणूक म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. एक गुंतवणूक खराब परतावा देत असेल, तर दुसरी गुंतवणूक त्याची कसर भरून काढते.
हेही वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?
इक्विटीत जोखमीनुसार गुंतवणूक करावी. कमी जोखीम हवी असेल, तर लार्ज कॅप फंडची निवड करायला हवी. मॉडरेट इन्व्हेस्टर असाल तर लार्ज आणि मिड कॅप फंड चांगले असतात. अॅग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर मिड कॅपमधे गुंतवणूक वाढवावी. अर्थात ही गुंतवणूक सर्वाधिक जोखमीची असते.
कर्जाची परतफेड करण्याआधी हिशोब करायला हवा. गुंतवणुकीतून अधिक लाभ मिळणार की रिपेमेंटमधून, याचं आकलन करा. उदा. आपलं गृहकर्ज एक कोटींचं असेल, तर हाऊस प्रॉपर्टीपासून दोन लाखांचं नुकसान आहे असं समजा. दहा वर्षांसाठी असणार्या कर्जाचा व्याजदर ९ टक्के गृहीत धरू. पोस्ट टॅक्समधे आपला व्याजदर ८ टक्के राहील. त्यामुळे गुंतवणुकीतून ८ टक्क्यांपेक्षा अधिक फायदा होत असेल, तर लोन रिपेमेंट करणं फायदेशीर ठरणार नाही.
हेही वाचा :
तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार?
सरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोहन सिंग
आपल्यासमोर येणारे देशाच्या जीडीपी ग्रोथचे आकडे दिशाभूल करणारे
(हा लेख दैनिक पुढारीच्या ९ डिसेंबरच्या अंकात पुर्वप्रकाशित झाला आहे)