आज जगभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे लोक योगा करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय मंडळींनीही वेगवेगळ्या शहरांत आयोजित योग कार्यक्रमात सहभाग नोंदवला. देशभरातल्या वातावरणाचा वेध घेणारा हा फोटो कोलाज.
भारतात लाखो लोकांनी शुक्रवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. योग दिनाचं यंदा पाचवं वर्ष आहे. पहाटेपासून ठिकठिकाणी योगाची लगबग दिसली.
१) पंतप्रधान मोदींनी झारखंडची राजधानी रांची इथल्या प्रभात तारा मैदानावर योगा केला.
२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड इथं रामदेव बाबांसोबत योगा केला.
३) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणाच्या रोहतक इथे योगा केला.
४) गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात आयोजित योग समारंभात सहभागी साधू.
५) मुंबईतल्या सेक्स वर्करनी मास्क घालून योगा समारंभात सहभाग घेतला.
६) लष्कराच्या श्वानांनीही आजचा योगायोग साधला.
७) ओडिशाच्या पुरी इथल्या किनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी वाळूने योग दिनाची प्रतिकृती साकारली.
८) नवी दिल्ली इथल्या एका कार्यक्रमात जटाधारी बाबाने योगाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
९) गुजरातमधे भारत-पाकिस्तान बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी योगासनं केली.
१०) न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयासमोर मुलामुलींनी योगासनं केली.
हेही वाचाः
अरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर
योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं
वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार
ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मोपदेशकांची क्रिकेट टीम
भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी