जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

१५ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


क्रांतिकारी कवी आणि संवेदनशील शायर कैफी आझमींचा आज शंभरावा जन्मदिन. वयाच्या ११ व्या वर्षापासून मुशायरे गाजवणारे कैफीजी पुढची सत्तररहून अधिक वर्षं भारताला समृद्ध करत राहिले. त्यांचं अफलातून व्यक्तिमत्त्व चिमटीत पकडणारी कविता त्यांचे जावईबापू जावेद अख्तर यांनी लिहिली होती, अजीब आदमी था वो.

आज १४ जानेवारी. बरोबर शंभर वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या आजमगडमधल्या मिझवान नावाच्या गावात कैफी आझमींचा जन्म झाला. फक्त उर्दू आणि हिंदीच्याच नाही तर सगळ्याच भारतीय कवितांवर त्यांच्या बंडखोरीचा प्रभाव पडला. त्यांच्या सिनेमातल्या गाण्यांवर जगभरच्या काव्यरसिकांनी प्रेम केलं.

वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या गजला गाजू लागल्या. ते मुशायरांमधे त्या सादर करू लागले. पण ते भावाच्या गजला चोरतात, अशी शंका त्यांच्या वडिलांसकट अनेकांना होती. त्यामुळे त्यांनी एक विषय देऊन समोर गजल लिहून घेतली. ती गजल थेट बेगम अख्तरनी गाण्याइतपत सरस उतरली.

शाळेत असतानाच त्यांची बंडखोरी दिसू लागली. त्यांनी शाळेत संप घडवला होता. पुढे ते चले जावच्या लढ्यात उतरले आणि कम्युनिस्ट पक्षातही सक्रीय झाले. फाळणीनंतर त्यांचे वडील पाकिस्तानात गेले. पण ते भारतात राहिले. खूप संघर्षात आणि गरिबीत राहिले. पोटापाण्यासाठी सिनेमाची गाणी लिहू लागले.

त्यांचे काव्यसंग्रह गाजलेच. पण त्यांची गाणीही कवितांच्या तोडीची होती. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही असो  किंवा झुकी झुकी सी नजर बेकरार हैं की नही  असो. मिलों ना तुम तो हम घबराएं अशा प्रेयसीच्या भावना व्यक्त करतानाच सिमटी सी शरमायी सी  म्हणत ते प्रेयसीचं तरल वर्णनही करत होते. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो  ही गजल असो किंवा अब तुम्हारे हवाले वतन साथियों सारखं देशभक्तीपर गाणं असो, कैफींचे साधे सोपे शब्द लोकांच्या हृदयात जाऊन बसले.

म्हातारपणात त्यांनी हट्टाने मुंबई सोडली. आपल्या गावी जाऊन राहिले. त्यांच्यानंतर कैफींची मुलगी अभिनेत्री शबाना आझमी आणि कॅमेरामन मुलगा बाबा आझमी यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. शबाना आणि त्यांचे पती जावेद अख्तर कैफींवर यादों के राहगुजर नावाचा कार्यक्रमही करायचे. दीर्घकाळ कैफींबरोबर राहणारे जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर छान कविताही लिहिलीय. त्यातून कैफींचं व्यक्तिमत्त्व उभं राहतं. ती आज त्यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त.

अजीब आदमी था वो

मुहब्बतों का गीत था

बगावतों का राग था

कभी वो सिर्फ फूल था

कभी वो सिर्फ आग था

अजीब आदमी था वो

 

वो मुफलिसों से कहता था

कि दिन बदल भी सकते हैं

वो जाबिरों से कहता था

तुम्हारे सर पे सोने के जो ताज हैं

कभी पिघल भी सकते हैं

वो बंदिशों से कहता था

वो बंदिशों से कहता था

मैं तुमको तोड सकता हूं

सहुलतों से कहता था

मैं तुमको छोड सकता हूं

हवाओं से वो कहता था

मैं तुमको मोड सकता हूं

 

वो ख्वाब से ये कहता था

कि तुझको सच करूंगा मैं

वो आरजू से कहता था

मैं तेरा हमसफर हूं

तेरे साथ ही चलूंगा मैं

तू चाहे जितनी दूर भी

बना ले अपनी मंजिलें

कभी नहीं थकूंगा मैं

वो जिंदगी से कहता था

 

वो जिंदगी से कहता था

कि तुझको मैं सजाऊंगा

तू मुझसे चांद मांग ले

मैं चांद ले के आऊंगा

 

वो आदमी से कहता था

कि आदमी से प्यार कर

उजड रही है ये जमीं

कुछ इसका अब सिंगार कर

 

अजीब आदमी था वो

वो जिंदगी के सारे गम

वो जिंदगी के सारे गम

तमाम दुख

हर इक सितम से कहता था

मैं तुमसे जीत जाऊंगा

कि तुमको तो मिटा ही देगा

एक रोज़ आदमी

भुला ही देगा ये जहां

मेरी अलग है दास्तां

 

वो आंखें जिनमें ख्वाब हैं

वो दिल है जिनमें आरजू

वो बाजू़ जिनमें है सकत

वो होंठ जिनपे लफ्ज हैं

रहूंगा उनके दरमियां

कि जब मैं बीत जाऊंगा  

 

(राजकमल प्रकाशनच्या लावा या काव्यसंग्रहातून साभार)