तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?

०२ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


वॉट्सअपवरचे फॅमिली ग्रुप हे फेक न्यूजचे अड्डे आहेत, असं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. पुस्तकांपेक्षा इथल्या माहितीवरच लोकांचा जास्त विश्वास बसतोय. पण आता आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला लावा. त्यातून त्यांना आणि तुम्हालाही बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील.

सध्या सगळीकडे वॉट्सअपची चर्चा आहे. फेसबूक, ट्विटर यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही वॉट्सअपवरच्या फॉरवर्डचीच चर्चा असते. वॉट्सअपवर असं झालं, मी वॉट्सअपवर ते वाचलं, असं आपल्या आजूबाजूला बोललं जातं. अनेकदा या फॉरवर्डमधे कुठलाही ठोस पुरावा, दाखला नसतो. असते ती निव्वळ प्रचारकी माहिती. आपापले हितसंबंध जपणारी. आता तरुणांनी स्वतःसोबत आपल्या आईवडलांनाही वॉट्सअप युनिवर्सिटीच्या जंजाळातून बाहेर काढावं, आणि पुस्तकं वाचून स्वतःला शोधावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी केलंय. आपल्या लेखवजा फेसबूक पोस्टमधून त्यांनी यासंबंधीची मांडणी केलीय. त्या लेखाचं हे स्वैर भाषांतर.

कधीही प्रकाशकाकडे जाऊ नका. पुस्तकं तुम्हाला तुमच्यात असलेल्या अपूर्णतेमुळे भयभीत करतात. कमी वेळ आहे आणि खूप काही वाचायचंय असं वाटतं राहतं. काही पुस्तकांचे कवर आपल्याला खेचून घेतात, तर काहींच्या नावावरून आपण त्यांच्याकडे जातो. गेल्या काही दिवसांत पुस्तकांविषयी माझ्या ज्ञानात नवी भर पडलीय. पुस्तकांना नुसतं बघत राहणंही त्यांना समजून घेण्यासारखंच आहे.

प्रकाशकाकडे नियमित जायला हवं

पुस्तकांच्या याद्या बघितल्या की लक्षात येतं लोक वेगवेगळ्या विषयांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातून ज्ञानाच्या जगाची रुपरेषा आपल्या ध्यानात येते. पुस्तकांच्या कवरला त्याच्यातल्या साहित्याच्या दृष्टिनं बघणं महत्त्वाचं आहे. त्यातून आपण अनेकानेक कलाकारांना ओळखू शकतो.

प्रकाशकाचं ऑफिस हे कधीच जुनं वाटतं नाही. कोणतं ना कोणतं नवं पुस्तक तिथं येत असतं. आलेलं असतं. जुनं पुस्तकही अचानक नवं आणि महत्त्वाचं वाटतं. यासाठी प्रकाशकाकडे नियमित जायला हवं. राजकमल प्रकाशनाच्या ऑफिसमधे गेले होतो. संपादकाला पटवायचं होतं.

रंगीबेरंगी फुलांचे फोटो घेत, अचानक त्यांनी रात्रीच्या अंधारात फोटो काढायला सुरवात केली. छान दिसत असूनही मला ते बरोबर वाटलं नाही. रात्री उशिरा घरी परतणारा माणूस अंधारात कुठं लाल गुलाबाचे फोटो घेतो का? त्यांच्या रागाला कलात्मक रुप देण्यासाठी त्यांनी जळत्या आगीचे फोटो काढायला सुरवात केली. तेव्हा मला समजलं ही कला नाही तर एक समस्या आहे.

हेही वाचा: सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

पुस्तकरुपानं लेखकांच्या गाठीभेटी

राजकमलच्या ऑफिसमधे अगदी मान वर करुन मी पुस्तकं बघत होतो. एका बाजूला नव्या कवरमधे दिनकर यांची पुस्तकं होती. दिनकर यांनी लोकदेव नेहरु या नावाने पुस्तक लिहिलंय. मला ही गोष्ट माहीत नव्हती. एवढचं नाही तर त्यांचं अजून एक पुस्तक पहिल्यांदाच नजरेस पडलं. विवाह की मुसीबतें.

वंदना राग यांच्याशी माझी इथंच पहिल्यांदा भेट झाली. त्यांची एक नवी साहित्यकृती येतेय. फायर फ्लाय ऑन बोर्ड. त्यानंतर अशोक पांडे आले. त्यांच्या काश्मीरनामा या पुस्तकाचा उल्लेख अनेकवेळा आलाय. यावेळी त्यांचं काश्मीरच्या पंडितांवर पुस्तक येतंय. काश्मीर प्रश्नावर गेल्या पंधराशे वर्षांतल्या चर्चेवर आधारित हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे, कश्मीर आणि कश्मीरी पंडित.

पाल्यांना पुस्तक वाचलं का ते विचारा

पुस्तक प्रदर्शनाच्या तयारीवेळी संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वेळ घालवून बरं वाटलं. त्यांनाही आराम मिळाला. सोबत जेवणही केलं. ज्यांनी मागच्या तीन, चार  वर्षांपासून किंवा मग मागची दहा वर्ष पुस्तकं घेतली नाहीत, त्यांनी आता काहीतरी वाचावं. त्यातून तुम्हाला बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील. बदलायला लागाल. स्वतःची एक यादी तयार करुन काय वाचायला हवं हेही आपण ठरवू शकतो.

तरुणांनी आपल्या आई वडलांना थोडं क्रॉस चेक करायला हवं. त्यांना काश्मीरवरचं एखादं पुस्तक बघितलंय का ते विचारा! टीवीवरच्या मालिका आणि चॅनेल बघून ते तुम्हा तरुणांवर फालतूच्या बढाया मारतात.

आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं हेसुद्धा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. हुंड्यामधे स्कूटर आणि पैसे मिळाले की बरेच वडील अभ्यास करणं सोडून देतात. आणि पुढे लोकशाहीत दुर्गंधी पसरवतात. अशा लोकांना बदला म्हणजे देश बदलेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत: तरुणांनीही वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर पडलं पाहिजे.

हेही वाचा: 

कोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा! 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?

सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का? 

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?