महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते.
मोहनदास करमचंद गांधीजी या महान नेत्याचं हे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष आहे. महात्मा गांधीजींवर या आधी काही कमी लिहिलं आणि बोललं गेलं नाही. कविता, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक लिखाण, गाणी, चित्र, शिल्प, नाटक, सिनेमा अशा अभिव्यक्तीच्या सगळ्या माध्यमातून गांधीजीजी झिरपत असतात. माणसाच्या वागण्यात गांधीजीजी डोकावत असतात. गांधीजीजी २० व्या आणि २१ व्या शतकात जन्मलेल्या प्रत्येक भारतीयाच्या भावविश्वाचा महत्वाचा भाग आहेत.
जगात दर तीन दिवसाला गांधीजीवरचं नवं पुस्तक येतं, असं म्हणतात. जगातल्या सहाशे युनिवर्सिटींमधे गांधीजीवर अभ्यास केला जातो, संशोधन केलं जातं. आणि इतकं सगळं करूनही एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अजूनही आपल्याला कळले आहेत, असा दावा कुणीच करु शकत नाही. कारण प्रत्येकाला गांधीजी नव्यानं उलगडत असतात! आपल्याला उलगडलेल्या गांधीजींशी आपला संवाद करून देणारा एक अनोखा कार्यक्रम अविष्कार या संस्थेकडून सादर केला जातोय. कार्यक्रमाचं नाव आहे – ‘उमगलेले गांधीजी’
या कार्यक्रमाचे प्रयोग सध्या होत आहेत. त्यातलाच एक प्रयोग रविवार २४ नोव्हेंबरला मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला. स्टेजवर पाच खुर्च्या लागलेल्या. आजुबाजुला गांधीजीचे फोटो, कार्यक्रमाचं पोस्टर आणि अविष्कार संस्थेचा लोगो असलेले पोस्टर. बस! इतकंच नेपथ्य. काही प्रयोगांत तर खुर्च्यांऐवजी पाच लोक बसू शकतील असा लांबलचक बाक असतो किंवा या पाच खुर्च्यांच्यामागे एखादं झाड.
संपूर्ण स्टेजभर मोकळ्या ढाकळ्या पद्धतीनं हे नेपथ्य लावलं जातं. समोर गांधीजींच्या आणि गांधीजींवरच्या लेखांचं अभिवाचन चाललेलं असतं. त्याचे शब्द कानावर पडत असतात आणि स्टेजवरच्या त्या मोकळ्या जागेत गांधीजी दिसत राहतात. सुत कातणारे, पंचा घातलेले, बुद्धासारखे निर्मळ हसणारे गांधीजी तिथं फिरत असतात. प्रत्येक प्रयोग गांधीजी असंच हसत पाहात असतील.
हेही वाचा : बाप एकच असतो, तो कसा बदलणार?
हा कार्यक्रम म्हणजे लेखांचं अभिवाचन. गांधीजींनी लिहिलेले, गांधीजींवर लिहिलेले, गांधीजींच्या आठवणी सांगणारे, गांधीजींचा विचार स्पष्ट करून सांगणारे हे लेख असतात. या लेखांचं अभिवाचन टीवी, सिनेमामधे काम करणाऱ्या कलाकारांकडून केलं जातं. अभिनयासाठी सराव केल्यामुळे या कलाकारांच्या आवाजाला अनायसे छान वळण मिळालेलं असतं. त्यांच्या या ट्रेण्ड आवाजामुळे अभिवाचनाची चव वाढते.
दर वेळेला नवे कलाकार यात सामील होतात. आत्तापर्यंत रोहिणी हट्टंगडी, चिन्मयी सुमीत, आनंद इंगळे, सुनील जोशी, धनश्री करमरकर, चंद्रकांत कुलकर्णी, किशोर कदम, मंगेश भिडे अशा अनेक कलाकारंनी याचं अभिवाचन केलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कलाकार बदलले, त्यांचे आवाज बदलले तरी त्या सगळ्या कलाकारांची जागा एकच आहे! हे सगळे कलाकार एकाच जागेवर बसून हे अभिवाचन करतायत आणि ती जागा म्हणजे गांधीजी प्रेमाची जागा.
गांधीजी प्रेमामुळे हे सगळे कलाकार एकत्र आले आणि दीपक राज्याध्यक्ष यांनी या कार्यकमाची संकल्पना पुढे मांडली. उन्मेष अमृते यांच्या संशोधनातून काही प्रभावी लेख पुढे आले आणि त्याचं संकलन करून कार्यक्रमाची संहिताच तयार केली गेली. शेवटी अरूण काकडे यांच्या निर्मीतीतून या सगळ्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप मिळालं. अभिवाचनातून गांधीजीविचारांचं पुनरुज्जीवन करणं हा यामागचा मुख्य हेतू होताच. पण त्याचसोबत गांधीजीजींची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न गांधीजीजींच्याच सत्याग्रहाच्या मार्गानं हाणून पाडणं हेही या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असल्याचं लक्षात येतं.
गांधीजी पूर्ण कळलेत असा दावा कुणीही करू शकत नसलं तरी त्यांचं एकही पुस्तक न वाचता आम्हाला गांधीजी पूर्णपणे कळालेत असा काहींचा तोरा असतो. याच अविर्भावात अशा लोकांकडून गांधीजींवर अश्लाघ्य शब्दांत टीका होत असते. त्यातही ‘लगे रहो मुन्नाभाई’ सारख्या सिनेमातून गांधीजी तत्त्वज्ञान म्हणजे एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करायचा हेच लोकांपर्यंत पोचतं. आणि मजबुरी का नाम महात्मा गांधीजी होऊन जातं!
पण गांधीजी त्यापलिकडे आणि त्या अलिकडेही खूप काही आहेत हे समजून घेण्यासाठी हे लगे रहोचं तत्त्वज्ञान ओलांडून ‘उमगलेले गांधीजी’ समजून घ्यायला हवेत. गांधीजी कसे घडले, त्यांचे सत्याग्रहाचे आणि अहिंसेचे प्रयोग काय होते, एक राजकीय आणि सामाजिक नेता म्हणून समाजात त्यांचा काय प्रभाव होता याबरोबरीनं गांधीजींनी केलेलं आत्मचिंतन, त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांचा त्यांनी लावलेला अर्थ हे सगळं स्पष्ट करणाऱ्या लेखांचं कार्यक्रमात अभिवाचन होतं.
नरहर कुरूंदकरांचा ‘गोळवलकर गुरूजी आणि गांधीजी’, वि. स. वाळिंबे यांचा ‘मूठभर मीठ’, ‘छोडो भारत’ घोषणेची श्रीपाद केळकर यांनी सांगितलेली हकीकत, ‘गांधीजी आणि सशस्त्र क्रांतिकारक’ सुरेश द्वादशीवार यांचा लेख आणि काश्मीर प्रश्नाविषयी गांधीजी काय म्हणाले असते हे सांगणारा रामचंद्र गुहा यांचा लेख असे अनेक महत्वाचे लेख कार्यक्रमात वाचले जातात.
हेही वाचा : गांधीजीजी पुन्हा वायरल झालेत
महत्वाचं म्हणजे, गांधीजी चुकले ती योग्य जागा कोणती असू शकते याचं दर्शन हा कार्यक्रम करून देतो. गांधीजी मुस्लिमधार्जिणे आहेत, फाळणीला ते जबाबदार आहेत, भगतसिंगची फाशी थांबवण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत असं सांगत गांधीजी कसे चुकीचे होते हे पटवून देण्याचा अट्टहास अनेकांकडून होत असतो. यातला एकही आरोप खरा नाही हे या कार्यक्रमातून उमगतं. त्याचसोबत `गांधीजी आणि माझी भेट’ या डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या लेखाचं अभिवाचन झाल्यावर गांधीजींचा मान राखत त्यांच्यावर लॉजिकल टीका कशी करायची याचा प्रत्यय येतो.
गांधीजींवरच्या या सगळ्या लेखांचं एकत्रीकरण करून पूर्वग्रह नसलेल्या मनाच्या पांढऱ्या, कोऱ्या कॅनवॉसवर हे लेख ठेवले. लेख ऐकल्यानंतर मनात येणाऱ्या भावना त्यालागांधीजी असतील. गांधीजींना अशी सकारात्मक सापेक्षपणाची झालर हा कार्यक्रम देतो. उमगलेले गांधीजी पाहुन, ऐकुन त्यावर चिंतन करुन आणि संपूर्ण जोडून जे निर्माण होईल तो कोलाज म्हणजे आपल्याला उलगडलेले कार्यक्रम अनुभवासोबत अनुभूतीच्या पातळीवर साठवून हा कोलाज तुम्हीही तयार करू शकाल!
हेही वाचा :
गांधीजी विरोधकांचा पंथ निर्माण करताना
खऱ्या गांधीजींच्या विसरत चाललेल्या आठवणी