आपण ऑफिसमधे काम केल्यानंच आज वर्क फ्रॉम होम शक्यः सुंदर पिचाई

२४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात.

तंत्रज्ञान जगासाठी किती महत्त्वाचं आहे हे कोरोना साथरोगानं अधोरेखित केलंय. साथरोगातून बाहेर येण्यासाठी वेगवेगळ्या देशातल्या सरकारांनी अल्फाबेट कंपनीकडे मदतीचा हात मागितलीय. गुगल आणि युट्यूबसारख्या कंपन्यांचं पालनपोषण या अल्फाबेट कंपनीकडून केलं जातं. आत्ता कोरोनाच्या निमित्तानं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांची एक छोटी मुलाखत टाईम मासिकानं घेतलीय.

भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ म्हणून सुंदर पिचाई यांचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. पिचाई यांच्या अध्यक्षतेखाली अल्फाबेटनं अॅपल कंपनीसोबत एक स्मार्टफोन तयार करण्याचं काम चालू केलंय. लोक वायरसच्या संपर्कात आले तर त्यांना त्याची तात्काळ माहिती देण्याचं काम या स्मार्टफोनद्वारे केलं जाईल. गुगलचेही हजारो कर्मचारी पिचाई यांना असा स्मार्टफोन बनवण्यात मदत करतायत. खुद्द पिचाई यांनीच या नव्या प्रोजेक्टची माहिती टाईम मासिकाशी बोलताना दिलीय. इथं आपण पिचईंच्या त्या मुलाखतीले काही महत्त्वाचे मुद्दे बघूत.

हेही वाचा : राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

स्पर्धेपेक्षा संकट मोठं आहे

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. संकटकाळात गरज निर्माण होते तेव्हा संशोधनालाही प्राधान्य मिळतं. २००० साली डॉट कॉम क्रॅश झाल्यामुळेच गुगलची सुरवात झाली होती. डॉट कॉम क्रॅश जगभरात इंटरनेटचा अतिवापर झाल्यामुळे आला होता. त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी गुगलची गरज निर्माण झाली होती. म्हणूनच जगात कोणतीही अडचण आली की त्यावर मात करण्यासाठी गुगलकडून काहीना काही धडपड केली जाते. कोरोना वायरसमुळे जग अधिक क्रिएटिव होईल आणि नवा विचार करू लागेल. आत्ताही आपल्याला डिस्टन्स लर्निंगचं उदाहरण हेच दाखवून देतं.

एरवी एकमेकांच्या स्पर्धक असणाऱ्या अल्फाबेट आणि इतर टेक कंपन्या सध्या एकमेकांचं सहकार्य घेऊन काम करतायत. मी वेगवेगळ्या देशांच्या लीडरशी चर्चा करतो तेव्हा आत्ता हे संकट आमच्या अंतर्गत स्पर्धेपेक्षा खूप मोठं आहे, याची कल्पना मला आली. आम्ही आधीपासूनच अनेक विषयांवर एकत्र काम करतो. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आम्ही सगळे एक झालोय. आता कोरोना वायरसच्या विरोधातंही आम्ही सगळे एकत्र लढा देतोय.

माणसाच्या खासगीपणाचं काय?

स्मार्टफोनवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आम्ही अॅपलसोबत काम करणार आहोत. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आली तर त्याची माहिती या सॉफ्टवेअरमुळे संबंधिताला मिळेल. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात रोगराईचा प्रसार रोखणं शक्य होईल. यामुळे लोकांच्या खासगीपणाचा अधिकार धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी टीका होतेय.

पण खरंतर, माणूस कुठे जातोय, काय करतोय याची माहिती मोबाईलला द्यायची की नाही हे त्या माणसानं ठरवायचंय. त्या माणसानं परवानगी दिली तरच मोबाईलला ही माहिती घेता येईल. आणि त्यातून मिळणारी माणसाची व्यक्तिगत माहिती किंवा लोकेशन डेटा अॅपल किंवा गुगल कुणाकडेही साठवला जाणार नाहीय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

ग्लोव घातल्याने कोरोना वायरसपासून संपूर्ण संरक्षण होतं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

दर्जेदार पत्रकारितेची गरज

कोरोना वायरसमुळे बातम्या देणाऱ्या स्थानिक संस्थांवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे लोकांपर्यंत विश्वसनीय बातमी पोचवण्यात ते कमी पडतील. त्यांच्यासाठी काही योजनांवर गुगल काम करतंय. त्यांना काही अनुदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुगल न्यूज इनिशिएटीवच्या माध्यमातून आम्ही आधीही हे केलंय. पण स्थानिक पातळीवर दर्जेदार पत्रकारिता तयार व्हायला हवी. त्यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागतील. त्याने फेक बातम्यांनाही आळा बसेल.

विश्वसनीय संस्था आणि तज्ञ शोधणं खरंतर खूप अवघड आहे. पण आत्ताच्या कोरोनाच्या काळात ते फार सोपं झालंय. एखाद्या वैज्ञानिकाकडे किंवा डॉक्टरकडे ही माहिती सहज मिळू शकते. ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे आलेल्या मजकूरातलं तथ्य तपासून मगच तो लोकांपर्यंत पोचावा अशी यंत्रणा आम्ही उभारलीय. पण सध्या या यंत्रणेवर विश्वास ठेवणं शक्य नव्हतं. म्हणून बाहेरून येणाऱ्या सगळ्या बातम्या आणि जाहिरातींवर आम्ही निर्बंध घातले होते.

ऑफिसमधे काम केल्यानंच वर्कफ्रॉम होम शक्य

आपण घरूनही चांगल्या दर्जाचं काम करू शकतो हे कोरोनामुळे आपल्याला कळलंय. पण वर्क फ्रॉम होम करण्याआधी आपण ऑफिसमधे बसून काम केलंय. त्यामुळेच आत्ता वर्क फ्रॉम होम शक्य होतंय. आधी ऑफिसमधे काम करून आपण या यंत्रणेला एक पाया घालून दिलाय. त्यामुळे हा पाया असाच भक्कम ठेवण्यासाठी पुन्हा ऑफिसची गरज पडणार आहे. ऑफिसला येण्याजाण्यासाठी लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यासाठी दुसरा चांगला पर्याय आपल्याला शोधावा लागेल.

अनेक घरात चांगल्या दर्जाची टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट उपलब्ध नसतं. यामुळे काही कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. हे अंतर भरून काढण्यासाठी गुगल एक प्रकल्प आणतंय. अमेरिकेतल्या ग्रामीण भागात आणि शहरातल्याही गरिबांपर्यंत इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा पुरवणं गरजेचं आहे.

हेही वाचा : फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल

एकीचं बळ सगळ्यात मोठं

कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय.

वायरसने सगळ्या मानवजातीलाच संकटात टाकलंय, असं आपण म्हणतो. पण अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांवर वायरस जास्त परिणाम करतोय. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न टांगणीला लागलाय.

या सगळ्यात आपण एकत्र येऊन प्रयत्न केले तरच त्याचा उपयोग होईल. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे. याप्रमाणे पुढच्या संकटांवरही आपल्याला एकत्र येऊनच काम करावं लागेल. भविष्यात येणारे साथरोग कसं रोखायचं? तापमान वाढीच्या प्रश्नाला कसं हाताळायचं? कृत्रिम बुद्धिमत्तेपासून सुरक्षितता कशी बाळगायची? हे सगळे प्रश्न आपण एकत्र आलो तरच सुटणार आहेत.

हेही वाचा : 

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

ग्रेट लॉकडाऊन: आत्ताची आर्थिक मंदी १९३०च्या जागतिक महामंदीहून वाईट

५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट