ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
२०१८ च्या जूनमधली गोष्ट. मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची बायको तन्वी सेठ यांनी लखनौ पासपोर्ट सेवा केंद्राकडे पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पण नवरा, बायकोचा धर्म वेगवेगळा असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी आपल्याला पासपोर्ट नाकारल्याचा आरोप तन्वी यांनी केला. दोघांनी धर्म बदलून लग्न केल्यास पासपोर्ट मिळेलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचाही आरोप झाला. यातून वादाला सुरवात झाली.
प्रकरण समजून घेण्याआधीच ट्रोल गँगने या सगळ्याला धर्माचा रंग दिला. कट्टरवाद्यांनी नवरा बायकोच्या मामल्याला लव जिहाद म्हटलं. ट्रोल गँग परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर तुटून पडली. त्यांच्यावर मिम म्हणजे विनोदी मजकूर लिहून वेगवेगळ्या इमेज तयार केल्या. नको नको त्या कमेंट केल्या. स्वराज यांना हिंदूद्रोही ठरवलं. शक्य होईल त्या सगळ्या बाजूंनी स्वराज यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. खिल्ली उडवणाऱ्यांनी स्वराज यांच्या वयाचाही विचार केला नाही. त्यांच्या आजारपणालाही विनोदाचा भाग बनवलं.
भारतात हिंदू, मुस्लिम फोडणी देऊन हा वाद चघळणं सुरू होतं. त्यावेळी सुषमा स्वराज देशाबाहेर होत्या. १७ ते २३ जून २०१८ या काळात त्या युरोपच्या दौऱ्यावर होत्या. २४ जूनला भारतात आल्यावर त्यांनी ट्विट केलं.
'मी नसताना देशात काय काय झालंय, हे मला माहीत नाही. तरीही काही ट्विटमुळे मला स्वतःला सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. मी हे ट्विट आपल्या सगळ्यांसाठी इथे शेअर करतेय. मी हे ट्विट लाईक करतेय.'
असं ट्विट टाकल्यावर सुषमा स्वराज यांनी एकापाठोपाठ ६० ट्विट लाईक करून ट्रोल गँगची जगापुढे फजिती केली. काही रिट्विटही केले. आणि महत्त्वाचं म्हणजे सुषमा स्वराज यांना ट्रोल करणारं दुसरं तिसरं कुणी नव्हतं. या गँगमधल्या लोकांना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते खासदार, मोठमोठे नेते आणि सैन्यातले अधिकारी फॉलो करत असल्याचं उघड झालं. सुषमा स्वराज यांना भलंबुरं म्हणाऱ्यांमधल्या एकाला तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही फॉलो करतात, असं द लल्लनटॉप या वेबसाईटने आपल्या एका स्टोरीत नोंदवलंय.
Change your name to Vaheeda Shaikh, apply for a passport, do a press conf with a fake harassment story, get @ndtv to cover it, tweet to @SushmaSwaraj, get a passport in two hours and then do gharwapsi! https://t.co/05f9DUpLaY
— Shefali Vaidya ஷெஃபாலி வைத்யா शेफाली वैद्य (@ShefVaidya) June 22, 2018
या सगळ्या प्रकरणानंतर सुषमा स्वराज यांचं सरकारशी, पक्षाशी जमत नसल्याचंही बोललं गेलं. पण त्या स्वतः यावर काहीच बोलल्या नाहीत. ना भाजपच्या कुणा नेत्यानेही यावर प्रतिक्रिया दिली. असंच हे प्रकरण संपलं. आता सुषमा स्वराज गेल्यावर यापैकीच अनेकजण शोक व्यक्त करताहेत. शेवटी टाईम टाईम की बात, हेच खरं.
हेही वाचा : सुषमा स्वराज यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे, हार्ट अटॅकमुळे नाही
सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनाचे आपण दोन भाग करू शकतो. एक २०१४ पूर्वीचा आणि दुसरा २०१४ नंतरचा. सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातम्या दाखवताना टीवीवर त्यांची भाषण दाखवली जाताहेत. ही सारी भाषण २०१४ आधीची आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळला तर आपल्याला यात २०१४ नंतरचं भाषण सापडत नाही. त्यामुळे सध्याच्या राजकारणावरची त्यांची भूमिका आपल्याला सहज कळत नाही. त्यामुळे २०१४ नंतरचं सुषमा स्वराज यांचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला थेट ट्विटरवर जावं लागतं. आणि तिथलं राजकारणही समजून घ्यावं लागतं.
आपल्या डिजिटल डिप्लोमसीमुळे ट्विटरवर त्या राजकारणातल्या ट्विटर क्वीन म्हणून प्रसिद्ध होत्या. ट्विटरवर त्यांचे १३ मिलियन म्हणजे सव्वा कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण त्या मात्र कुणालाही फॉलो करत नव्हत्या. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही नाही. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या जगातल्या १० महिला नेत्यांमधे स्वराज यांचं नाव घेतलं जातं.
एवढंच नाही पंतप्रधान मोदी वगळता मोदी सरकार १.० मधल्या त्या एकमेव मंत्री असतील ज्या ट्विटरवर एवढ्या फेमस आहेत. त्यांनी ट्विटरवर स्वतःचा फॉलोअर क्लास तयार केलाय. तो सांभाळलाय. ट्विटरवरल्या लोकप्रियतेत मोदी मंत्रिमंडळातले दुसरे कुणी सहकारी स्वराज यांच्या आसपासही नव्हते. स्वराज यांचा हा वेगळेपणाच ट्रोल गँगला खटकत असावा, हे वेळोवेळी समोर आलंय. पण स्वराज यांनी मात्र थेट लोकांना मदत करत आपली स्वतःची स्पेस तयार केली. या सगळ्या काळात त्या कुठं भाषण करताहेत, असं आपल्याला दिसलं नाही.
स्वराज यांच्या निधनाबद्दल केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही शोक व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावर तर शोकसंदेशांचा पूर आलाय. ट्विटरवर तर सुषमा स्वराज यांच्या नावाचे सात, आठ ट्रेंड सुरू आहेत. या सगळ्यामागे सुषमा स्वराज संप्रदाय आहे. हा पंथ त्यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत उभा केलाय. ट्विटर वापराचं एक सूत्र हजरजबाबीपणा आहे. आणि स्वराज यांच्या स्वभावातच हजरजबाबीपणा आहे. या हजरजबाबीपणाला त्यांनी मानवतावादाची जोड देत आपला संप्रदाय वाढवला.
ट्विटरवर कुणी आपल्या अडीअडचणी सांगितलं की सुषमा स्वराज मदतीला धावून जायच्या. पासपोर्ट हवा असेल, विसाचा अर्ज रखडला असेल, परदेशात फसवणूक झाली असेल, ओलिस ठेवलं असेल, तर लोकही त्यांच्याकडे विनासंकोच आपली अडचण घेऊन ट्विटरवर यायचे.
सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात २०१४ ते २०१९ मधे परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या दुसऱ्या महिला होण्याचा मानही स्वराज यांना मिळाला. या काळात नरेंद्र मोदी यांच्याच दौऱ्यांची चर्चा झाली. ते जगभर दौरे करत होते. तिथे कुठेही मोदींसोबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नसायच्या. वेगवेगळे करारमदार करण्यासाठी स्वतः मोदीच दिसायचे. दुसरीकडे सुषमा स्वराज आपली स्पेस तयार करत ट्विटरच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालय लोकांपर्यंत पोचवत होत्या.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
२०१७ मधली घटना आहे. पाकिस्तानी नागरिक हिरा शिराज यांना आपल्या एक वर्षाच्या मुलीला ओपन हार्ट सर्जरीसाठी भारतात आणायचं होतं. पण त्यांना काही केल्या मेडिकल विसा मिळत नव्हता. मग त्यांनी ट्विटरवरून सुषमा स्वराज यांच्याकडे विनंती केली आणि एका झटक्यात त्यांचा प्रॉब्लेम सुटला.
लाहोरला राहणाऱ्या शाहजाब इक्बाल यांनाही असाच प्रॉब्लेम येत होता. त्यांनी ट्विट केलं. 'अल्लानंतर आमच्यासाठी शेवटची आशा तुम्हीच आहात. प्लीज, भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयाला मेडिकल विसा द्यायला सांगा.' यावर तत्काळ कार्यवाही करत स्वराज यांनी इक्बाल यांना मेडिकल विसा मिळवून दिला. थेंबे थेंबे तळे साचे तसं सुषमा स्वराज यांनी लोकांना अशा छोट्या छोट्या प्रसंगांत मदत केली. मी तर मंत्री आहे, माझं हे काम नाही, असं त्यांनी सांगितलं असतं, तर आज आपल्याला हा स्वराज संप्रदाय दिसलाच नसता.
तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांनी २०१९ मधे स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर केलं. त्यामुळे स्वाभाविकच मोदी सरकार २.० मधे त्यांचा समावेश झाला नाही. पण सुषमा स्वराज मंत्री नसणार हे कळाल्यावर ट्विटरवर खूप हळहळ व्यक्त झाली. त्यादिवशी त्यांचं नाव ट्विटर ट्रेंडमधेही आलं. पण या सगळ्यांमधे सुषमा स्वराज यांच्या कारभाराचा लेखाजोखा कुणी मांडला नाही. सारी चर्चा त्यांच्या ट्विट महिम्याभोवतीच फिरली. २०१४ आधी जसं त्या फर्राटेदार भाषण करून संसद गाजवायच्या. तसं त्यांचं गेल्या पाच वर्षांत गाजलेलं भाषण आपल्याला सापडत नाही.
ट्विटरवर त्यांना एकाने आपल्या ८५ वर्षाच्या आजीचं पासपोर्ट तयार करण्यासंदर्भात विचारलं. त्यासाठी त्याच्याकडे आधार कार्ड आणि वोटर कार्ड एवढी दोनचं कागदपत्रं होती. या कागदपत्रांच्या आधारावर पासपोर्ट काढून आपल्या आजीला पहिलावहिला विमानप्रवास घडवता येईल का, असं त्याने विचारलं. त्यावर स्वराज यांनी 'आजीही पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. आणि या दोन कागदपत्रांच्या आधारे त्यांना पासपोर्टही मिळू शकतो' असं सांगत त्या नातवाची अडचण चुटकीसरशी सोडली.
एकदा तर त्यांना एकाने मलेशियातून ट्विट केलं. आपल्या मित्राला परत भारतात पाठवण्यासाठी मदत करण्याची विनंती त्याने केली होती. त्याच्या इंग्रजीमधे ग्रामरच्या खूप चुका होत्या. त्यावरून तो खूप ट्रोल झाला. अनेकांनी ‘भावा, मराठीत बोलायचं की’ असा डायलॉगही त्याला ट्विटवर सुनावला.
या सगळ्यांवर सुषमा स्वराज यांची भूमिका खूप समजुतीची होती. 'काही प्रॉब्लेम नाही. परराष्ट्र मंत्री झाल्यापासून सगळ्याच प्रकारचा इंग्रजीचा लहेजा आणि ग्रामर आता मी शिकलेय.'
स्वराज यांना काही लोक खेटायचाही प्रयत्न करायचे. त्यांचीही त्या शाळा घ्यायच्या. गेल्यावर्षीच्या जूनमधली गोष्ट आहे. एकाने त्यांना ‘मी मंगळावर अडकलोय. मला मदत करा’ अशी खोचक विनंती केली. त्यावर स्वराज यांनी शाळा घेतली, ‘तू मंगळावर अडकला असशील तरी भारतीय वकिलातीचे लोक तुला तिथेही मदत करायला येतील.’
असं आणखी एकाने आपल्या घरातलं फ्रीज काम करत नसल्याची तक्रार केली. त्यावर स्वराज म्हणाल्या, 'भावा, मी तुला फ्रीज दुरुस्तीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही. कारण मी अडचणीत सापडलेल्या माणसांना मदत करण्यात बिझी आहे.'
हेही वाचा : काश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय
गेल्या पाच वर्षांत सोशल मीडियाची राजकारणातली उठाठेव वाढलीय. निव्वळ उठाठेव वाढली नाही तर अनेकदा सोशल मीडियावर दिवसभराच्या राजकारणाची रूपरेषा ठरतेय. त्यामुळे अनेक राजकारण्यांनी सोशल मीडियाची उठाठेव सांभाळण्याचं काम काही प्रोफेशनल संस्था, लोकांना दिलंय.
गेल्या एप्रिलमधे सुषमा स्वराज यांचं ट्विटर अकाऊंटही अशा संस्थांकडूनच हाताळलं जात असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेला कारणही तसंच होतं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर देशभरात चौकीदार चोर हैंचा नारा विरोधकांकडून दिला जात होता. लोकांमधेही हा नारा खूप फेमस झाला. याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर स्वतःच्या नावाआधी चौकीदार लावण्याचा ट्रेंड काढला. मग काय. एकापाठोपाठ भाजपच्या झाडून सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनीही स्वतःच्या नावापुढे चौकीदार लावलं.
सुषमा स्वराज यांनीही असंच केलं. पण त्यांच्या चौकीदारीवर काही लोकांनी आक्षेप घेतला. तुम्ही आमच्या परराष्ट्र मंत्री आहात. भाजपमधली एकमेव संवेदनशील व्यक्ती तुम्ही आहात. मग तुम्हाला स्वतःच्या नावापुढे चौकीदार असं लिहिण्याची गरजच काय? असा सवाल एकाने केला. त्यावर दुसऱ्या एकाने हे ट्विटर अकाऊंट स्वतः सुषमा स्वराज हाताळत नसल्याचं सांगितलं.
दोन्ही ट्विटला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या, 'देशाबाहेर राहणारे भारतीय आणि भारताच्या हितासाठी मी चौकीदारी करतेय. आणि अकाऊंट मी स्वतः हाताळतेय. माझं कुणी भूत नाही.'
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. दिल्ली भाजपचे नेते मांगे राम गर्ग यांचं निधन झालं. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारं ट्विट सुषमा यांनी केलं. यावर एकाने लिहिलं, 'अम्मा, शीला दीक्षित यांच्यासारखी आपलीही खूप आठवण येईल.'
यावर सुषमा स्वराज म्हणाल्या, 'आपल्या आगाऊ सदिच्छांसाठी खूप धन्यवाद.' त्यांच्या या हजरजबाबी उत्तरानंतर या रिकामटेकड्या युजरने आपलं ट्विट डिलिट करून टाकलं.
नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० नुसारचा काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. सरकारच्या या निर्णयावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. ट्विटरवर तर दोन दिवस कलम ३७० ट्रेंडमधे होतं. या सगळ्यांत सुषमा स्वराज यांनीही एक ट्विट केलं.
हेही वाचा :
विशेष राज्याचा दर्जा मिळतो, म्हणजे नेमकं काय होतं?
पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?
महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन
३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी