वाचा स्वामी विवेकानंदांचं जग जिंकणारं भाषण

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ३ मिनिटं


११ सप्टेंबर १८९३. आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. या ऐतिहासिक भाषणाचा अधिकाधिक प्रामाणिक मराठी अनुवाद.

स्वामी विवेकानंदांचं सर्व धर्म परिषदेतलं भाषण तसं छोटंसंच आहे. पण त्यात मोठा विचार आहे. त्यामुळे त्याकडे वेगवेगळ्या दृष्टींनी पाहता येतं. वेगवेगळ्या विचारधारांचे पूर्वग्रह घेऊन त्याचे अनुवाद होऊ शकतात. किंबहुना झाले आहेत. म्हणूनच या ऐतिहासिक इंग्रजी भाषणाशी अधिकाधिक प्रामाणिक राहून साध्या सोप्या मराठीत केलेला अनुवाद करण्याचा हा एक  प्रयत्न. त्यात काही त्रुटीही राहू शकतात, म्हणून त्याचं मूळ भाषणही परिच्छेदानुसार सोबत दिलंय. कदाचित तुम्हाला काही नवे अर्थ गवसू शकतील. आपण विवेकानंदांना जे म्हणायचंय त्याच्या जवळ जाऊ शकतो.
मूळ इंग्रजी भाषण अद्वैत आश्रम प्रकाशनाच्या ` Complete Works of Swami Vivekananda`च्या volume1 मधून घेतलंय. 
My American Sisters and Brothers, 
माझ्या अमेरिकेच्या बहिणींनो आणि भावांनो,
It fills my heart with joy unspeakable to rise in response to the warm and cordial welcome which you have given us. I thank you in the name of the most ancient order of monks in the world; I thank you in the name of the mother of religions; and I thank you in the name of millions and millions of Hindu people of all classes and sects.
तुम्ही माझं उबदार प्रेमाने स्वागत केलं. त्यामुळे माझं हृदय शब्दात व्यक्त करता येणार नाही अशा आनंदाने उचंबळून आलंय. संन्याशांच्या जगातील सर्वांत प्राचीन परंपरेच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. सर्व धर्मांच्या आईच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. सर्व जाती आणि संप्रदायांच्या कोट्यवधी हिदूंच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. 
My thanks, also, to some of the speakers on this platform who, referring to the delegates from the Orient, have told you that these men from far-off nations may well claim the honor of bearing to different lands the idea of toleration. I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true.
या मंचावरून बोललेल्या पूर्वेकडील देशांच्या काही वक्त्यांचेही मला आभार मानायचेत. सहिष्णुतेचा विचार दूरदेशांमधे पसरवण्याचे त्यांचे दावे सन्मान्यच आहेत. माझा धर्म सहिष्णुता आणि सर्वांचा स्वीकार करण्याचा संदेश देतो, याचा मला अभिमान आहे.  आम्ही केवळ सर्वसमावेशक सहिष्णूतेवरच विश्वास ठेवतो असं नाही, तर जगातील प्रत्येक धर्म सत्य असल्याचं मानतो. 
I am proud to belong to a nation which has sheltered the persecuted and the refugees of all religions and all nations of the earth. I am proud to tell you that we have gathered in our bosom the purest remnant of the Israelites, who came to Southern India and took refuge with us in the very year in which their holy temple was shattered to pieces by Roman tyranny. I am proud to belong to the religion which has sheltered and is still fostering the remnant of the grand Zoroastrian nation.
पृथ्वीवरील सर्व देशांच्या आणि सर्व धर्मांच्या छळ सोसलेल्या निर्वासितांना आश्रय देणारा देश माझा आहे, याचा मला अभिमान वाटतो. मला तुम्हाला अभिमानाने सांगायचंय, सर्वात जुन्या इस्रायली समुदायांचे वंशज आम्ही हृदयात जपून ठेवलेत. रोमनांच्या हल्ल्यांनी त्यांची पवित्र देवळं उद्ध्वस्त केली तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात इस्रायलींनी दक्षिण भारतात आश्रय घेतला. महान पारशी राष्ट्राच्या अवशेषांना आश्रय देणाऱ्या आणि आजही उभारी देणारा धर्म माझा आहे, याचाही मला अभिमान आहे.
I will quote to you, brethren, a few lines from a hymn which I remember to have repeated from my earliest boyhood, which is every day repeated by millions of human beings: ‘As the different streams having their sources in different places all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to Thee.
भावांनो, मी अगदी लहानपणापासून तोंडपाठ करून वारंवार म्हटलेल्या आजही लाखो लोक ज्याचं रोज पारायण करतात, त्या स्तोत्रातील काही ओळी मी आता ऐकवतोय, `वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावलेले वेगवेगळे प्रवाह शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. तसंच हे देवा, वेगवेगळ्या प्रवृत्तींमुळे माणसं वेगवेगळे रस्ते निवडतात. ते वाकडे किंवा सरळ वाटत असले तरी ते शेवटी तुझ्यापर्यंतच पोचतात.’
The present convention, which is one of the most august assemblies ever held, is in itself a vindication, a declaration to the world of the wonderful doctrine preached in the Gita: “Whosoever comes to Me, through whatsoever form, I reach him; all men are struggling through paths which in the end lead to me.”
आजची ही परिषद आजतागायत झालेल्या झालेल्या मेळाव्यांपैकी सर्वाधिक पवित्र असणारी एक प्रतिज्ञा आहे. ती गीतेतील एका छान शिकवणुकीनुसार जगाला उद्देशून केलेली एक घोषणा आहे, 'जो माझ्याकडे येतो, तो कसाही असो, मी त्याचा भेटतो. सगळेजण माझ्यापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर धावाधाव करतात. ते रस्ते माझ्याकडेच येतात.’
Sectarianism, bigotry, and its horrible descendant, fanaticism, have long possessed this beautiful earth. They have filled the earth with violence, drenched it often and often with human blood, destroyed civilization and sent whole nations to despair. Had it not been for these horrible demons, human society would be far more advanced than it is now. But their time is come; and I fervently hope that the bell that tolled this morning in honor of this convention may be the death-knell of all fanaticism, of all persecutions with the sword or with the pen, and of all uncharitable feelings between persons wending their way to the same goal.
सांप्रदायिकता, धर्मांधता आणि त्याचे प्रभाव, कट्टरता यांनी दीर्घकाळ या सुंदर पृथ्वीवर ताबा ठेवलाय. त्यांनी हिंसाचार करून पृथ्वीला माणसाच्या रक्ताने भिजवलंय. कित्येक संस्कृतींचा नाश केलाय. कितीतरी देश पुसून टाकलेत. हे राक्षस नसते तर मानवी समाज आज कितीतरी विकसित असता. पण आता मात्र त्यांचा काळ आलाय. आज या संमेलनाच्या सन्मानार्थ एक घंटानाद झाला. मला कळकळीची आशा आहे, की तो घंटानाद सर्व प्रकारच्या धर्मवादाची, तलवार आणि शब्दांच्या जोरावर केलेल्या दडपशाहीची आणि एकाच ध्येयाकडे चाललेल्या माणसांच्या अनुदार भावनांची मृत्युघंटाच ठरावी.