काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा

२० ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


काश्मीरवर आपण सध्या खूप तावातावाने मतं मांडतोय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून तर खूप उलटसुलट मेसेज फिरताहेत. या मेसेजमधून काश्मीरबद्दल लोकांमधे गैरसमजच जास्त पसरवले जाताहेत. या सगळ्यांमधे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी काश्मीर प्रश्नाचा विविधांगी वेध घेणाऱ्या पुस्तकांची एक यादी फेसबुकवर शेअर केलीय.

सध्या काश्मीरवर प्रत्येकाकडे काहीतरी मत आहे. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून आलेल्या फॉरवर्डच्या मदतीने आपल्यापैकी अनेकांनी काश्मीरवरचं हे मत तयार केलंय. पण व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून आलेली ही माहिती आपण संदर्भांच्या कसोटीवर पडताळून घेतली नाही. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून येणाऱ्या माहितीपेक्षा ज्या लोकांनी तिथे आपली आयुष्यं घालवलीत, तिथे राहून अभ्यास केलाय त्यांचे अनुभव महत्त्वाचे आहेत. अशा काही पुस्तकांची नावं मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी सुचवलेली आहेत. रवीश कुमार यांनी ही यादी हिंदी पट्ट्यातले वाचक नजरेसमोर ठेऊन सुचवलीय.

या पुस्तकांविषयी रवीश कुमार लिहितात, 'महत्त्वाचं म्हणजे यातली बहुतांश पुस्तकं ही ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि ही पुस्तकं खरेदी करूनच वाचली पाहिजेत, असंही काही नाही. जवळपासच्या चांगल्या लायब्ररीमधेही आपल्याला ही पुस्तकं मिळू शकतात. आणि ही पुस्तकं वाचता वाचताच आपल्याला कळेल की काश्मीर प्रश्न नेमका आहे काय?'

'हिंदीपट्ट्यातल्या वाचकांनी ही पुस्तकं नक्की वाचायला हवीत. कारण, काश्मीरवरची त्यांची बरीचशी मतं ही नेत्यांच्या आध्याअधुऱ्या भाषणांवर, हिंदी पेपरांतला कचरा आणि न्यूजचॅनलच्या बकवास चर्चांवर आधारित आहेत. काश्मीरवर हिंदीत एकच पुस्तक आहे. कश्मीरनामा. या पुस्तकाविषयी मी अनेकदा लिहिलोय. सुरवातीला हेच पुस्तक वाचा आणि मग हळूहळू दुसरी पुस्तकं हातात घ्या,' असं रवीश कुमार यांनी सुचवलंय.

अशोक कुमार पाण्डेय यांनी लिहिलेलं हे पुस्तक राजपाल अँड सन्स प्रकाशनाने प्रकाशित केलंय. अमेझॉनवरही हे पुस्तक उपलब्ध आहे. अशोक पाण्डेय यांनी आपल्या पुस्तकात १०० हून अधिक पुस्तकांचा संदर्भ दिलाय. या संदर्भांचीही आपल्याला मदत होईल. त्यामुळे अगोदर हिंदीतलं हे पुस्तक वाचा आणि मग हळूहळू दुसऱ्या पुस्तकांना हात लावा. ए. जी. नूरानी यांची पुस्तकं तर नक्की वाचायला हवीत.

हेही वाचाः पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

1. ARTICLE 370- A CONSTITUTIONAL HISTORY OF JAMMU AND KASHMIRA G NOORANI

2. THE KASHMIR DISPUTE 1947-2012 - A G NOORANI

3. THE KASHMIR DISPUTE 1947-2012, VOLUME 2 - A G NOORANI

4. UNDERSTANDING KASHMIR AND KASHMIRI CHIRSTOPHER SNEDDEN

5. WHAT HAPPENED TO GOVERNANCE IN KASHMIR - AIJAZ ASHRAF WANI

6. THEY SNATCHED MY PLAYGROUND - KHALID JEHANGIR

7. MY KASHMIR IN PEACE AND TURBULENCE-STORY OF A NATIVE IN EXILE - B L KAUL

8. CRAFTING PEACE IN KASHMIR - VERGHESE KOITHARA

9. KASHMIR EXPOSING THE MYTH BEHIND THE NARRATIVE - KHALID BASHIR AHMAD

10. UNRAVELLING THE KASHMIR NOT - AMAN M. HINGORANI

11. JAMMU AND KASHMIR 1998 AND BEYOND, COMPETITIVE POLITICS IN THE SHADOW OF SEPARATISM - VOLUME 2, REKHA CHOWDHARY

12. RADIO KASHMIR IN TIMES OF PEACE AND WAR - RAJESH BHATT

13. KASHMIR AND BEYOND 1966-84 - JAWAID ALAM

14. BETWEEN THE GREAT DIVIDE, PAKISTAN ADMINISTERED KASHMIR - ANAM ZAKARIA

15. K FILE- CONSPIRACY OF SILENCE - BASHIR ASSAD

16. A DESOLATION CALLED PEACE - ARTHER ZIA AND JAVAID IQHBAL

17. IDENTITY POLITICS IN JAMMU AND KASHMIR - REKHA CHOWDHARY

18. RELIGION INTER- COMMUNITY RELATIONS AND THE KASHMIR CONFLICT - YOGINDER SIKAND

19. THE MANY FACES OF KASHMIR NATIONALISM - NANDITA HAKSAR

20. LANGUAGE OF BELONGING - CHITRALEKHA ZUTSHI

21. KASHMIR’S CONTESTED PAST - CHITRALEKHA ZUTSHI

22. TERRITORY OF DESIRE, REPRESENTING THE VALLEY OF KASHMIR - ANANYA JAHANARA KABIR

23. KASHMIR HISTORY POLITICS REPRESENTATION - CHITRALEKHA ZUTSHI

24. THE VALLEY OF KASHMIR, THE MAKING AND UNMAKING OF COMOSITE CULTURE - APARNA RAO

25. OUR MOON HAS BLOOD CLOTS - RAHUL PANDITA

26. KASHMIR AS I SEE IT - ASHOK DHAR

27. CURFEWED NIGHT - BASHARAT PEER

हेही वाचाः 

नाथ पै नावाचा झंझावात समजावून सांगणारी पुस्तकं

तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?

खरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच

जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल

विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?