दिल्लीत रंगलेल्या ट्रान्सजेंडर कवी संमेलनाची गोष्ट

१७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.

साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी दिल्लीत साहित्योत्सव साजरा केला जातो. यानिमित्त देशभरातल्या विविध भाषांमधले साहित्यिक इथं येतात. त्याच्याशी थेट बोलण्याची संधी मिळते. वाचक आणि साहित्यिकांना जोडण्याचा हा उत्सव असतो.

यंदाच्या साहित्योत्सवाचं खास आकर्षण होतं ट्रान्सजेन्डर पोएट मीट म्हणजेच तृतीयपंथी कवी संमेलन. १५ ट्रान्सजेन्डर कवी या मंचावरुन आपल्या कविता वाचून दाखवणार होते. कार्यक्रमाच्या आधी हे सर्वच्या सर्व १५ ट्रान्सजेंडर कवी हॉलच्या बाहेर घुटमळत होते.

उत्तर भारतात ट्रान्सजेंडरकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे. इथल्या लोकांना बिहारच्या नौटंकीफेम भिखारी ठाकूरच्या लौंडा डान्सच्या माध्यमातून नाचगाणं करण्याची संधी दिली खरी. पण ते लौंडा डान्स करणारे बहुतांश पुरुष असतात. त्यात क्वचितच कुणी ट्रान्सजेंडर असतो. इथे या लोकांना मिठ्ठा म्हटलं जातं. समाजात या थर्ड सेक्सला मान्यता मिळालेली नाही.

मुळात मुघलांच्या राजवटीत सुरु झालेली लौंडे पाळण्याची परंपरा युपी आणि बिहारमधे अजूनही आहे. कुणाकडे किती लौंडे आहेत यावरुन त्याचं समाजातलं स्थान किती मोठं आहे हे ठरतं. असाही समज आहे की एकदा का या लौंडांचा नाद लागला की पुरुषाला खऱ्या बाईचाही विसर पडतो. सेक्रेट गेममधल्या गणेश गायतोंडेला कक्कू का जादू हवा असतो ना बिलकूल तसाच.

तर ही सगळी अशी परीस्थिती आहे. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या या ट्रान्सजेंडर कवी संमेलनाला गर्दी होणं स्वाभाविक होतं. हे देशातलं अशाप्रकारचं पहिलंच कवी संमेलन असेल. त्यामुळं हे लोक काय लिहतात, कसं वाचतात, याबद्दल लोकांना उत्सुकता होती. 

भारतातल्या पहिल्या ट्रान्सजेन्डर प्राचार्य डॉ. मनोबी बंदोपाध्याय यांनी या १५ कवींना एकत्र आणलं होतं. मनोबी स्वत: बंगाली साहित्यात पीएचडी आहेत. आपल्या कम्युनिटील्या अशाच सुशिक्षित ट्रान्सजेंडरचा एक वेगळा समाज तयार करण्यासाठी मनोबी यांनी पुढाकार घेतलाय. यात सिविल इंजिनियर, प्रोफेसर, सामाजिक कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे यातले १३ जण बंगालमधले आहेत. एक झारखंड आणि एक बिहार.

भगव्या साडीत मनोबी खूप सुंदर दिसत होत्या. बाकीच्या ट्रान्सजेंडरही असाच भडक मेकअप करुन आल्या होत्या. आपलं वेगळंपण जपणारं. मनोबीनं भूमिका मांडली आणि कवी संमेलनाला सुरवात झाली. 

दिल्लीत साहित्य अकादमीच्या आवारात भरलेल्या या कवीसंमेलनाला आता प्रत्यक्ष सुरवात झाली. पहिली कवी राणी मजूमदार. कोलकात्यातल्या एका कॉलेजमधे बायोलॉजीची प्रोफेसर. ती सध्या पीएचडी करतेय. राणीने प्रेमाची भावना व्यक्त करणारी कविता सादर केली.

हमारा प्यार

कंडोम लेकर आए हो
प्यार तो नही
अभी अभी तो सोयी थी
तुम्हारे साथ
दिखाओं तो मेरी मांग भर कर के
कमर के निचे जितना सा घर बंधी हुँ मै
वहाँ केवल बिडी के अंगारे
और फेंकी हुई झु्ठे चाय की प्याली
आओ ना आज दोनो आसमान हो जाएं
दोनो सुबह का सपना बन जाए
चावल उबल रहाँ है
दाल बनेगी अभी 
और क्या बनाऊ तुम्हारे लिॆए? बोलो?
तुम्हारा फेंका हुआ ढेर सारा सुहाग
होंठोंपर लगा कर
मैं हर रोज ढुंढती हूँ
क्या कोई भ्रूण आया तो नहीं 
रात की चादर को रोशनी में पसार कर
बार बार देखती हूँ
जितनी वह भिगी थी दाग से
उतने में ही फैली है मेरी दुनिया
फैला है हमारा प्यार!!

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. बहोत खुब बहोत खुब. माहौल झाला आणि एका मागून एक या १५ अवलियांनी या मंचावरुन नव्या विचारांची उधळण केली. राणीने आणखी एक कविता सादर केली. तिची ही कविता समाजाचा ट्रान्सजेंडरकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे त्यावर कटाक्ष टाकते.

लोग कहते है

'तब समाज बदलेगा'
पल्लू के निचे सेब रखें है
कोई कहता है आलू रखें है
उनको यह नही पता,
की सेब-आलू नहीं
आज कल स्पंजवाली ब्रा भी मिलती है
एकबार ट्रेन से कोलकाता शहर में घुम रही थी
एक लडका कौतोहल से देख रहाँ था
मानो सोच रहाँ हो यह सच है या झुठे
मरे हाथों मे विभूतिभूषण बंडोपाध्याय की किताब खुली थी
मै उस लडके को देखकर मुक्त हो गयी
वह मुझ में रहस्य ढ़ुंढ रहा था 
मर्द शरीर स्त्री बनने की कितनी प्रतिष्ठा 
मेरे स्तन रहें या ना रहें मै लडकी हुँ
यह बात तो कोई पुरुष नही मानेगा ना?
हम ट्रान्सजेन्डर है
शरीर का पुरुष
मन का नारी
सब शरीर को देखते है
मन को कोई नही देखता 
हम चाहते है की मन को देखें
हमारी आत्मा को देखे
तभी हमारा जीवन सफल होगा
तभी हमारा संघर्ष खत्म होगा
तब समाज बदलेगा।

असं आतापर्यंत न समजलेल्या ट्रान्सजेंडर समुदायाची ओळख हळूहळू रसिकांमधे लागली होती. कवितांना मिळणाऱ्या प्रतिसादातून हे ठळकपणे दिसत होतं. यानंतर पीएचडी स्कॉलर देवदत्ता बिस्वासची कविता ट्रान्सजेंडरचं एकाकी जगणं उलगडून दाखवते.

घर बसाने का भूख

अंदर से खाई जा रहीं है
बिमार बुझे माँ बाप के ठीक होने की दुआ
और इस बीच में मेरे बदले हुए रुप की दिन गुजरान
दूर गाँव मे जहाँ मै निर्वासित थी
वहाँ एक रोशनी नजर आ रहीं है
मै आज इस खुशी के आँगन में खडी हुँ
दिन गुजारने की जद्दोजेहाद मे
गली की मोड पर लौट आती है अकेली हवा
जब सवाल आता है सिंदूर का
जबाव है मेरा खामोशिया
सवाल आता है माँ होने का
अंदर गर्भाधान महसूस करती हुँ मै
योनी पथ में धुनी का कुँडली
जैसे धुंध मे भीगी हुई काठ
मैदान में उतरी सीने में कई अरमान लिए 
आँखों में रोशनी की झलक
मन में गंगा स्नान 
या फिर हस्तमैथुन
क्या कोई तन ना छुकर मन को छुएगा
आशिक के उपर वहीं सच्चा प्रेम है 

छत्तीसगढची रविना बरीहाची कविताही अस्वस्थ करणारी आहे. हिजडा आहे म्हटल्यावर समाजानं धुतकारलं. मग हा माणसारखा जन्म घेऊन काय फायदा असा सवाल ती आपल्या कवितेतून करते. तिचा हा सवालही रसिकांमधे आरपार घुसला.

आओ ना इस देश

ओ मनवा
आओ ना इस देश
झुठे रिश्ते तुटे नाते
कही नही अब चैन
आओ ना इस देश

बचपन की फुलवारी छुटी
यौवन का यह झुला चपटा
सिलकी बस सेज
आओ ना इस देश

आधी नारी
मन भी आधा
जीवन का है कैसी बाधा
कैसा है यह भेस
आओ ना इस देश

मुक्त अब करों अब दुषचिंता से
द्वंदो की इस चीर पीडा से
हर लो मन लवलेश
मनवा
आओ ना इस देश

सर्वात शेवटी आली रेशमा प्रसाद. बिहारमधली दबंग किन्नर. दबंग यासाठी की बिहारमधे ती भल्याभल्यांना पुरुन उरलेय. गेल्यावर्षी रेशमानं पाटण्यात किन्नर महोत्सव भरवला होता. ती थेट भिडते. जे चूक ते चूक. जे बरोबर ते बरोबर. हां मैं किन्नर हुँ असं ती छाती ठोकपणे सांगते.

सिसक हैं मै किन्नर हूँ

मुझे चाहिए वह पहचान 
जो तुम से पुछी न जाती हो
कि तूम आदमी हो या औरत
मै जो बताऊँ अपना पहचान
पहचान से अचकचा जाते हो
जबडे तुम्हारे खिल जाते
एक हलकी सी हंसी का कहर
मेरे जिस्म पर छिडक जाते हो
यह जहर अंदर तक हिला देता है
क्यों की मै ऐसी हुँ 
तूम स्विकारो या ना स्विकारो
मै जो कहूँ मैं किन्नर हूँ
मेरी आँखों मे आंखे डाल कर झाकते हो
तुम अपने नजरों से उपर से निचे तक तलाश डालते हो
मेरी जिंदगी की पहचान मेरी है
और उनकी तलाश भी मेरी है
बरसो बाद मै अपने आप को पहचान पायी हुँ
फिरभी तुम्हारी तलाश बाकी है
मै कौन हुँ मै जानती हुँ
क्या बताना चाहतें हो मुझे अब भी बाकी है तलाश

रेशमाचा मार्ग वेगळा आहे. तिला किन्नरांसाठी एक युनिवर्सिटी सुरु करायचीय. भिकारी ठाकूरच्या लौंडा डान्सवर बंदी घालण्याची तिची मागणी आहे. लौंडा डान्स किन्नरांना बीभत्स पध्दतीनं दाखवतो असं तिला वाटतं.

या कवी संमेलनात वारंवार 'पोस्ट बॉक्स नंबर २०३, नालासोपारा' या हिंदीतल्या प्रसिध्द लेखिका चित्रा मुदगल यांच्या कादंबरीचा उल्लेख झाला. मुंबईतल्या हिजड्यांची ही गोष्ट आहे.

कायद्यानं मान्यता मिळाल्यानंतर एलजीबीटीक्यू क्युनिटी आता समाजाकडून मान्यतेसाठी झटतेय. भाकरी, भिख नका देऊ पण आमच्याशी बोला, आम्हाला बोलू द्या असा नवा विचार घेऊन तृतीयपंथी समाजानं साहित्यात शिरकाव केलाय. आता लवकरच समाजात विरघळ्याची प्रक्रिया सुरु व्हावी हीच त्यांची इच्छा आहे.