नोबेल मिळालेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर आपण कुठे करतो?

१६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


गेल्या सहा दिवसांत नोबेल पारितोषिकं मिळालेल्या व्यक्तींची नावं जाहीर झाली. यात जॉन बी गुडइनफ़, एम स्टेनली विटिंगम आणि अकीरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्र शाखेत पारितोषिक जाहीर झालं. त्यांनी लिथियम आयन बॅटरी बनवली. ही बॅटरी तर आपल्या रोजच्या आयुष्यातलीच. आपण याचा वापर रोज करतो. आणि सतत ती बॅटरी असलेल्या वस्तू वापरत असतो.

आपल्याला एखाद्याच्या कामाचं खूप कौतुक करायचं असेल तर आपण ‘नोबेल काम केलंस’ असं सहज म्हणतो. नोबेल हा शब्द कुठून आला हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. नोबेल हे पुरस्काराचं नाव आहे. हा पुरस्कार दरवर्षी मानव हितासाठी काम केलेल्या व्यक्तींना दिला जातो. नुकतंच यावर्षीचे नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींची नावं जाहीर झाली. यंदाचा पुरस्कार सोहळा १० डिसेंबरला होईल.

यावर्षीचे नोबेल पुरस्कार विजेते

यावर्षी औषधांच्या शाखेत विल्यम जी केलिन, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्जा. भौतिकशास्त्रात जेम्स पीबल्स, मिशेल मेयर आणि डिडिएर. साहित्य क्षेत्रात २०१८ साठी पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक. तर २०१९ साठी ऑस्ट्रेलियातले पीटर हेडकी. शांततेचं इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद. अर्थशास्त्रात अभिजीत बनर्जी आणि त्यांची बायको एस्थर डफ्लो तसंच माइकल क्रेमर इत्यादींना नोबेल पारितोषिकं जाहीर झाली.

रसायनशास्त्रात जॉन बी गुडइनफ़, एम स्टेनली विटिंगम आणि अकीरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यांना हे पारितोषिक लिथियमआयन बॅटरी बनवल्याबद्दल मिळालं. या बॅटरीने आपलं आयुष्यच खरंतर बदलून टाकलंय.

नोबेल पुरस्कार कोणी बनवला?

आपल्या लक्षात आलं असेल की विविध क्षेत्रात मानव हिताचं काम करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या व्यक्तींना नोबेल पारितोषिक दिलं जातं. त्यात केमिस्ट्री, फिजिक्स, लिट्रेचर, शांतता, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन आणि अर्थशास्त्र इत्यादींमधे दिला जातो.

नोबेल पुरस्कार हा स्विडीश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो. ते रसायन शास्त्रज्ञ, इंजिनियर आणि इंडस्ट्रियलिस्ट होते. त्यांनीच १८९५ ला ५ नोबेल पुरस्कार बनवले. त्यांनी हा पुरस्कार फक्त मानवाच्या हिताच ठरेल असं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनासाठी हा पुरस्कार होता.

१९०० ला नोबेल फाऊंडेशन सुरू झालं. आणि नोबेल पुरस्कारांचं वितरण पहिल्यांदा १९०१ ला झालं. विलहेलम रंटगेन हे पहिले शास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी निर्माण केलेल्या एक्स-रे टेक्निकसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. पुढे नोबेल फाऊंडेशनमधे सुधारणा होत गेली. आणि संपूर्ण पुरस्काराचं काम फाऊंडेशनच करू लागलं. आणि विज्ञानाशिवाय इतरही क्षेत्रात हा पुरस्कार दिला जाऊ लागला. सध्या रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायंस यांच्याकडून पारितोषिक प्रेझेंट केलं जातं.

हेही वाचा: नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?

फास्ट काळासाठी उपयुक्त बॅटरी

यंदा रसायन शास्त्रातलं लिथियम आयन बॅटरीला मिळालं. ही बॅटरी म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. बॅटरी महत्त्वाचा भाग कशी असा प्रश्न नक्की पडेल. पण सध्या आपण मोबाईल, लॅपटॉप या सगळ्या गोष्टींवर जगतोय. आणि त्या वस्तू याच लिथियमआयन बॅटरीवर जगतात.

बॅटरी या प्रकाराचा जन्म १८०० मधे झाला. याला जन्म देणारे इटालियन शास्त्रज्ञ आलेसांड्रो वोल्टा. त्यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिक सेल बनवला. या बॅटरी प्रकारांचे दोन गट बनवलेत. एक प्राथमिक ज्याला आपण बेसिक म्हणू शकतो. तर दुसरा म्हणजे माध्यमिक ज्याला आपण एडवान्स म्हणता येईल. एडवान्स बॅटरी या रिचार्जेबल असतात.

नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या या बॅटरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही हजारपेक्षा जास्त वेळा चार्ज करता येते. ती मोठ्यातल्या मोठ्या उपकरणापासून ते लहानातल्या लहान उपकरणातही फीट होते. लिथियम आणि आयन या बॅटरी पूर्वी स्वतंत्र होत्या. पण हे दोन्ही घटक एकत्र करून ही आताच्या फास्ट काळासाठी उपयुक्त बॅटरी बनवली.

हेही वाचा: काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल

लिथियम बॅटरी कुठे वापरतात?

लिथियम आयन बॅटरीमुळे आपण अपारंपरिक स्त्रोतांचा वापर वाढवू शकलो. म्हणजे सोलार, हायड्रोलिक इत्यादी ऊर्जांना साठवून ठेण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच अणुऊर्जेच्या वापरातही ही बॅटरी उपयोगी ठरते. ही बॅटरी मोबिलिटी करणाऱ्या सर्वच उपकरणांमधे असते. म्हणजेच मोबाईल, लॅपटॉप, ड्रोन, पोर्टेबल चार्जर, बॉइलर इत्यादी. त्याचबरोबर बॅटरी कारमधेही याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. आपण वॉटर स्पोर्टस करतो त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांमधे पेट्रोलचा वापर व्हायचा. पण ते बरंच रिस्की होतं. म्हणून आता बॅटरीवरच्या गाड्या वापरू लागलेत. त्या गाड्यांमधेही याच बॅटरीचा वापर होतो. आता बाजारात येणाऱ्या नव नव्या डिजिटल डायरी, स्लेट, प्लॅनर, रिडर, गेम इत्यादींसारख्या वस्तूंमधेही ही बॅटरी वापरतात.

लिथियम आयन बॅटरी ही वजनाला हलकी आहे, त्याला कोणतंही मेनटेन्स करावं लागत नाही, त्याची कपॅसिटी जास्त आहे त्यामुळे डिस्चार्ज होत नाही. हे सर्व त्याचे फायदे आहेत. पण तशाच या बॅटरीच्या मर्यादाही आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही बॅटरी फार काळ गरम जागेत ठेवता येत नाहीत. तसंच आपण जिथे ती बॅटरी वापरत आहोत त्याचं सर्किट. वोल्टेज आणि करंट बॅलन्स असणं गरजेचं असतं नाहीतर स्फोट होऊ शकतो. आणि बॅटरी मॅन्युफॅक्चर करताना खर्च जास्त येतो. या सर्व त्रुटी भरून काढण्यासाठी यावर आणखी प्रयोग होताहेत.

या बॅटरीमुळे आपलं लाईफ कितीतरी सोप्पं झालं. ही सगळी उपकरण आपल्याला सतत मदत करत असतात. पण ही बनवली त्या शास्त्रज्ञापेक्षा. ती उपकरणं वापरण्याजोगी झाली ते लिथियम आयन  बॅटरीमुळेच.

हेही वाचा: 

मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच