जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल.
गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊनमधे आहे. २४ मार्चला सुरू झालेला पहिला लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, याकाळात कोरोना वायरसवर आपण नियंत्रण मिळवू शकलो नाही. त्यामुळे १५ एप्रिल ते ३ मे असं लॉकडाऊनचं दुसरं पर्वही झालं. त्यानंतरही कोरोना वायरस आटोक्यात न आल्याने १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवणार असल्याचा निर्णय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला.
सध्या आपण लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वात आहोत. येत्या चार पाच दिवसांत कदाचित हा लॉकडाऊन शिथील करण्याचा, मागं घेण्याचा निर्णय होईल. ३० मेपर्यंत सगळा महाराष्ट्र कोरोनामुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे १७ तारखेला लॉकडाऊन संपला नाही तरी महिना अखेरपर्यंत तरी हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येईल, असं अपेक्षित आहे.
आणि आपल्याला फार काळ लॉकडाऊनमधे राहता येणार नाही. आज ना उद्या तो आपल्याला संपवावा लागणार आहे. लॉकडाऊन संपल्यावर लोक पुन्हा कामावर जातील, दुकानं, शाळा, कॉलेज उघडतील. सगळे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात येतील. त्याने कोरोना वायरसची साथ पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, लॉकडाऊन कसं करायचं याची व्यवस्थित योजना करायला हवी.
मात्र, लॉकडाऊन संपवण्याचा आदर्श असा मार्ग असू शकतो का, याबद्दलही आपण विचार करायला हवा. जगप्रसिद्ध मॅगझिन ‘द इकॉनॉमिस्ट’नं यासंबंधी एक स्टोरी केलीय. यात त्यांनी लॉकडाऊन संपवण्यासाठी ४ गोष्टी गरजेच्या असल्याचं सांगितलंय. या गोष्टी पाळल्या तर येत्या काही वर्षात आपल्याला कोरोना वायरसपासून कायमची सुटका करून घेता येईल, असं ही स्टोरी सांगते.
हेही वाचा : रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन
पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल डिस्टसिंग. ‘द इकोनॉमिस्ट’च्या या वीडियो स्टोरीत सांगितल्याप्रमाणे ‘लॉकडाऊन हा फिजिकल डिस्टसिंग पाळण्याचा टोकाचा मार्ग आहे. पण यामुळे लोकांवर बंधनं येतात आणि अर्थव्यवस्थेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्यामुळेच हे टोकाचं फिजिकल डिस्टसिंग आपण फार काळ चालू ठेऊ शकत नाही. त्यामुळेच आता लॉकडाऊन संपवताना लोकांना त्यांचं आयुष्य नेहमीप्रमाणे जगता येईल आणि आजारही आटोक्यात राहील असे फिजिकल डिस्टसिंगचे असे कोणते प्रकार आहेत याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.’
फिजिकल डिस्टसिंगबाबत आपण चीनचा आदर्श ठेवायला हवा. योग्य प्रकारे फिजिकल डिस्टसिंग कसं करायचं याचं सगळं कौशल्य चीनने साध्य केलंय. अगदी शाळेतल्या मुलांनाही याबद्दल व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात आलंय. तिथल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्यात. निदान आत्तापर्यंत, कोरोना वायरसची दुसरी लाट येण्यापासून चीनने यशस्वीरित्या थांबवलंय. एखाद्या हॉटेलमधे एकावेळी किती माणसं जमू शकतात इथंपासून ते एखाद्या फॅक्टरीत एकावेळी किती लोकांना काम करण्याची परवानगी दिली जावी अशा चीनच्या अनेक गोष्टींकडे आपण गांभीर्याने पहायला हवं, असं द इकॉनॉमिस्टच्या या स्टोरीत म्हटलंय.
चीननंच कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा जुगाड शोधलाय. लॉकडाऊन पाळा अशी डब्ल्यूएचओनंही कुण्या देशाला शिफारस केली नव्हती. असं असलं तरी फिजिकल डिस्टसिंग कसं पाळायचं याचं एकसूत्री तत्त्व अजून कुणालाही समजलेलं नाही. एकमेकांपासून दोन हात अंतर ठेवून चालणं, सतत तोंडाला मास्क बांधणं या तात्पुरत्या उपाययोजना झाल्या. पण नेमक्या कोणती दिवसांनी हे उपाय बंद केले तरी चालतील याबद्दल कुठल्याच देशाच्या सरकारला काहीच माहीत नाही. फिजिकल डिस्टसिंग चुकीच्या पद्धतीनं झालं तर कोरोना वायरसची साथ पुन्हा एकदा जगाला मिठी मारेल, हा धोका आहेच.
लॉकडाऊन यशस्वी करणाऱ्या ४ गोष्टींपैकी तपासणी आणि कॉन्टक्ट ट्रेसिंग ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही कोरोना वायरसचे नवनवे पेशंट सापडत राहतील. त्यामुळे असे पेशंट कोण आहेत हे तत्काळ ओळखणं ही पहिली पायरी. त्यानंतर हे पेशंट कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात आले होते त्या सगळ्या लोकांच्या तपासण्या करणं, त्यांना काही काळ विलगीकरणात ठेवणं ही दुसरी पायरी. आता यापैकी कुणाला कोरोना वायरसची लागण झाली असेल तर ते कोणाच्या संपर्कात आले होते ते शोधून पुन्हा त्यांच्या तपासण्या करणं ही तिसरी पायरी.
शेवटच्या पेशंटची तपासणी होईपर्यंत हे चक्र असंच चालू राहील. तपासण्या करण्यासाठी त्या तपासणी किटचं उत्पादन करणं, त्याचा वापर शिकवणं, ते लोकांपर्यंत पोचून करणं अशा ही तपासण्या करणं ही खरंतर खूप महागडी, अत्यंत किचकट आणि मोठी प्रक्रिया असेल. पण देशांना फिजिकल डिस्टसिंग कमी करायचं असेल तर अशाप्रकारे लोकांच्या तपासण्या करणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय, तंत्रज्ञानाचा वापर करून याचा शॉर्टकट आपण शोधून काढू शकू.
हे कोरोना स्पेशलही वाचा:
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट
अॅपल, गुगल यासारख्या काही कंपन्यांनी हा शॉर्टकट शोधणं चालूही केलंय. ट्रेसिंगचे काही अॅप वापरून अशा प्रकारचा डाटा साठवता येतोय का हे शोधण्यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करतायत. एखाद्या माणासाला लागण झाली असेल तर या अॅपच्या माध्यमातून हा माणूस कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात आला हे शोधणं शक्य होईल.
जर्मनी, आयलँड, अमेरिका यांसारख्या देशांनी आपापले ट्रॅकिंग अॅप तयार करून बाजारात आणलेत. भारतानंही आरोग्य सेतू लाँच केलाय. पण हे अॅप सुरक्षिततेच्या कारणावरून वादात सापडलंय. गुगल आणि अॅपलने एकत्र येऊन प्रोटोकॉलप्रमाणे अॅप तयार करत आहेत.
एखाद्या माणसाने एखाद्या ठिकाणी प्रवास करणं सुरक्षित आहे की नाही असा ऑनलाईन पासपोर्ट देण्यासाठी सरकार या अॅपचा वापर करू शकते. चीनमधे अशी व्यवस्था सुरूही झालीय. अनेक व्यवहार करताना आपल्या मोबाईलवरच्या अॅपमधला ग्रीन झोन चीनी लोकांना दाखवावा लागतो. मात्र, यासाठी देशांना भरपूर नवा पैसा ओतावा लागेल. एक नवा उद्योग यातून सुरू होईल. असे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्या लोकांची एक आर्मीच देशाला तयार ठेवावी लागेल.
लॉकडाऊन संपल्यानंतर करायची तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर आपलं सगळं लक्ष केंद्रीत करावं लागेल. आपली आरोग्य व्यवस्था दर्जेदार नसेल तर साथरोगामुळे मरणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. डॉक्टरांची चांगली टीम तयार करणं, त्यांना दर्जेदार शिक्षण देणं, त्यांना सुसज्ज बनवणं, पुरेसे वेटिंलेटर्स, आयसीयू बेड आणि हॉस्पिटल्स तयार ठेवणं यात आपण आत्ता पैसा गुंतवला तर साथरोगाशी प्रत्यक्ष सामना करावा लागेल तेव्हा आपली धांदल उडणार नाही. अनेकांचे प्राण वाचतील.
या सगळ्या उपायांऐवजी कोरोना वायरसची साथ कायमची संपवण्याचा चौथा आणि सोपा उपाय जगाकडे आहे आणि तो म्हणजे लसीकरण. कोरोना वायरसची लस शोधण्यासाठी अनेक देश प्रयत्न करतायत. जगभरात जवळपास ९१ ठिकाणी लस निर्मितीचं काम चालू आहे. यातल्या काही लसींचं काम तर आता दुसऱ्या टप्प्यातही पोचलंय. लोकांवर त्याचा प्रयोग करणं चालू आहे. २०२० च्या सप्टेंबरपर्यंत कोरोना वायरसची लस उपलब्ध होईल, असा दावा ऑक्सफर्ड युनिवर्सिटतल्या शास्त्रज्ञांनी केलाय. पण अनेक संस्थाच्या म्हणण्यानुसार अशी लस निघायला डिसेंबर उजाडेल.
हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक
थोडक्यात, कोरोना वायरसवरची लस निघायला जास्तीत जास्त एक वर्षाचा काळ लागेल. पण त्यानंतर एक वेगळं आव्हान सरकारसमोर असेल. या लसीचं उत्पादन आणि वितरण करणं अत्यंत अवघड आहे. या लसी तयार करणारे कारखाने उभे करायला सरकारने आत्ताच चालू करायला हवं. त्यात काही बिलियन डॉलरचा खर्च येईल. पण ही गुंतवणूक केली नाही तर लसीचा शोध लागेल तेव्हा उत्पादनाची कमतरता जाणवेल.
ही कमतरता आपल्याला एका वेगळ्या संकटाकडे नेऊ शकेल. काही बलाढ्य देश या लसी जास्त किमतीला प्राधान्याने विकत घेतील. त्या देशातही ही लस काही मूठभर श्रीमंत लोकं पैशाच्या जोरावर विकत घेतील आणि तिची खरी गरज असलेल्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना, महिलांना, लहान मुलं आणि वृद्धांना ताटकळत थांबावं लागेल.
लस येईल तेव्हा येईल आणि ती आपल्याला मिळेल तेव्हा मिळेल पण तोपर्यंत आपला देश पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येऊ नये यासाठी सगळ्याच देशातल्या सरकारांना अत्यंत मेहनत करावी लागणार आहे. आपलं आयुष्य आधीसारखं सुरळीत होईलच. पण त्यासाठी नागरिकांनाही भरपूर संयम ठेवावा लागेल.
हेही वाचा :
लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा
कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
लॉकडाऊनमधे आपण माणुसकीलाच क्वारंटाईन केलंय का?
कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?
महिनाभराच्या लॉकडाऊनपासून या देशांनी घेतला मोकळा श्वास
लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!
आपण खरेदी करत असलेल्या पेट्रोलवर सरकार लावत १७५% टॅक्स
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन
WHOनं सांगितलेल्या खाण्यापिण्याबद्दलच्या पाच टिप्स भिंतीवर चिकटवा
भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?