म्युच्युअल फंडातली गुंतवणूक काढून घेताना कोणती काळजी घ्यावी?

२६ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडमधे गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढलीय. म्युच्युअल फंडबाबत सर्वत्र चर्चा होत असल्याने नागरिक यात गुंतवणूक करताना अधिक सजग राहतात. अन्य योजनांच्या तुलनेत परतावा अधिक मिळत असल्याने नागरिक म्युच्युअल फंडबाबत सकारात्मक दिसतात. मात्र या फंडची वाजवीपेक्षा अधिक माहिती बाळगणारी मंडळी अन्य गुंतवणूकदारापेक्षा अधिक गोंधळात पडलेले असतात.

म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करण्याचं अनेक मंडळी धाडस दाखवत नाहीत. कारण म्युच्युअल फंडमधे सुरवात कशी करावी, यावरून अनेक जण संभ्रमात असतात. या द्विधा मन:स्थितीमुळे अनेक दिवस जातात आणि चांगला परतावा मिळवण्याची संधीही हातची निघून जाते. त्यामुळे काही मंडळी जाहिरात किंवा संकेतस्थळाचा आधार घेत गुंतवणुकीचा विचार करतात. मात्र यापेक्षा कठीण गोष्ट तर पुढेच आहे.

फंडची विक्री कधी करावी?

गुंतवणुकीच्या सायकलच्या शेवटी असणारा कळीचा मुद्दा म्हणजे फंडची विक्री कधी करावी. फंड विक्रीवरून गुंतवणूकदार लवकर निर्णय घेत नाहीत आणि घेतला तर, नुकसान तर झालं नाही ना? अशी भीती बाळगून असतो. म्हणून गुंतवणुकीत पुढे असणारे नागरिक गुंतवणूक काढताना खूप विचार करतात. हा विचार कधी कधी नुकसानकारकही ठरू शकतो.

गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडमधे गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढलीय. म्युच्युअल फंडबाबत सर्वत्र चर्चा होत असल्याने नागरिक यात गुंतवणूक करताना अधिक सजग राहतात. अन्य योजनांच्या तुलनेत परतावा अधिक मिळत असल्याने नागरिक म्युच्युअल फंडबाबत सकारात्मक दिसतात. मात्र या फंडची वाजवीपेक्षा अधिक माहिती बाळगणारी मंडळी अन्य गुंतवणूकदारापेक्षा अधिक गोंधळात पडलेले असतात. 

कारण ते अधिक सक्रिय असल्याने कोणती ना कोणती गोष्ट सतत करण्याची सुप्त इच्छा ते बाळगून असतात. शेवटी ही मंडळी फंडचे अधिक विश्लेषण करतात, सक्रिय राहतात, वाचन करतात आणि त्या आधारावर निर्णय घेतात. अशा मंडळींचे ९० टक्के निर्णय अचूक ठरतात. यानुसार ते सतत सक्रिय असल्याने ते चांगले गुंतवणूकदार म्हणूनही ओळखले जातात. मात्र अधिक सक्रिय राहिल्याने ते काही वेळा आपली संपूर्ण गुंतवणूकदेखील विकण्यासाठी तयार असतात.

हेही वाचाः घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया

फंड विकण्याची सर्वसाधारण कारणं

फंड विकण्याची सांगण्यात येणारी कारणं ही योग्य असतातच असं नाही. यास काही अपवाद असतात. मात्र शेवटी आर्थिक स्थितीशी निगडित निर्णय घेतले जातात. फंड विकण्याची चुकीची कारणंही तेवढीच जबाबदार असतात. अतिसक्रिय गुंतवणूकदार हे फंड विकताना तीन कारणं गृहीत धरतात. त्यांना फायदा होतोय, दुसरा म्हणजे नुकसान होतंय आणि तिसरं म्हणजे मूल्य वाढलं असंल तर नफेखोरी का करू नये.

अर्थात अलीकडेच हा फंड नकारात्मक परतावा देतोय, तर आताच बाहेर पडणं योग्य नाही. या फंडमधून नुकसान आणि फायदा काहीच होत नसेल, तर त्याला विकावं का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. जी गुंतवणूकदार मंडळी सतत सक्रिय असतात त्यांच्या मनात असेच प्रश्न येत राहतात. या आधारावर खरेदी किंवा विक्री करत असतात.

हेही वाचाः 

नफेखोरीचा विचार योग्य का?

अर्थात वरीलपैकी कोणतंही कारण योग्य नाही. पहिलं दिलेलं कारण हे सल्लागाराने सांगितलेल्या नफेखोरीच्या संकल्पनेवर आधारित आहे. शेअर बाजारात नफेखोरी ही बाजाराचा मूड पाहून केली जाते. मात्र फंड्सबाबत ही मात्रा लागू पडतेच असं नाही. अर्थात ही सवयदेखील गुंतवणूकदाराला नुकसानकारक आहे. या सवयीमुळे गुंतवणूकदार चांगले शेअर विकतो आणि खराब शेअर बाळगतो.

म्युच्युअल फंडमधे संपूर्ण नीती ही फंड मॅनेजरच्या माध्यमातून राबवली जाते. कोणता शेअर खरेदी करावा आणि कोणता विकावा, यावर फंड मॅनेजर विचार करत असतो आणि त्याप्रमाणे कृती करत असतो. जर फंड मॅनेजर चांगलं काम करत असेल तर आपल्याला निश्चितच चांगला परतावा मिळेल.

हेही वाचाः म्युच्युअल फंडमधली एसआयपी गुंतवणूक थांबवण्याची वेळ आलीय का?

दीर्घकाळाची कामगिरी पाहा

फंड विकण्याचं दुसरं कारण पाहू. खराब कामगिरी करणार्‍या फंडपासून दूर राहणं योग्य आहे. मात्र त्याची दीर्घकाळाची कामगिरी पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जो फंड चांगली कामगिरी करतोय, त्याची विक्री करण्याबाबत गुंतवणूकदार उत्सुक असतात. जर एखादा फंड सतत दोन किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून नकारात्मक परतावा देत असेल, तर त्याचवेळी बाहेर पडणं गरजेचं आहे, असा एक मतप्रवाह आपल्याला दिसतो.

वास्तविक आपलं आर्थिक ध्येय लक्षात घेऊनच गुंतवणूकदाराने निर्णय घ्यायला हवा. जर पैशाची गरज असेल तर फंड विकण्यास हरकत नाही. मात्र आपण पाच किंवा दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक सुरू ठेवली किंवा एसआयपी सुरू ठेवली, तर आपल्या गरजेनुसार पैसा तयार होतो. आपल्याला घरासाठी डाऊनपेमेंट करायचं असेल, मुलांची फी भरायची असेल किंवा अन्य मोठे काम करायचे असेल, तर ही गरज या गुंतवणुकीतून भागेल.

जर हेच लक्ष्य जवळ आलं असेल तर बाजारात कशीही स्थिती असली तरी फंड विकण्याचा निर्णय घ्यावा. जर लक्ष्य टाळलं जात नसेल, तर आपण ठरवलेल्या कालावधीच्या एक दोन वर्षाअगोदरच अ‍ॅक्शन सुरू करायला हवी.

हेही वाचाः 

एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय

अचूक गुंतवणुकीतून महागाईवर मात कशी करायची?

आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?

(साभारः दैनिक पुढारी)