पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तामिळनाडूच्या महाबलिपूरम इथे आहेत. दोन्ही देशांत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वाटाघाटीबाबत इथे चर्चा होणार आहे. पण चिनी राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करतानाच ट्विटरवर मोदींविरोधात गोबॅकमोदीचा ट्रेंड सुरू झालाय. गेल्या वर्षभरापासून मोदी तामिळनाडू दौऱ्यावर निघाले की त्यांच्याविरोधात हा ट्रेंड चालतोय.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी चेन्नईच्या महाबलिपुरम इथे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. पण मोदींच्या दौऱ्याच्या सुरवातीलाच ट्विटरवर #Gobackmodi हा ट्रेंड सुरू झाला. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी समर्थकांनी #TNWelcomesModi हा हॅशटॅग ट्रेंडमधे आणला. पण मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले की दरवेळी सोशल मीडियावर त्यांना या विरोधाला सामोरं जावं लागतंय.
देशाच्या कुठल्या भागात पंतप्रधान गेल्यावर तिथे त्यांच्याविरोधात परत जा, परत जाचे नारे लागणं ही खरचं खूप शरमेची गोष्ट आहे. शुक्रवारीही असंच झालं. पंतप्रधान मोदी तामिळनाडू दौऱ्यावर जात नाहीत तोच ट्विटरवर #Gobackmodi हा हॅशटॅग ट्रेंडमधे आला.
२०१८ मधे चीनच्या वुहान इथे झालेल्या भेटीगाठीचा पुढचा टप्पा म्हणून दोघांच्या या भेटीकडे बघितलं जातंय. दोन दिवसांच्या या अनौपचारिक भेटीला शुक्रवारी सुरवात झाली. शुक्रवारी सकाळी ८.२० मिनिटाला #gobackmodi हा ट्रेंड भारतात टॉपला होता. तब्बल ४० हजार ट्विट हा ट्रेंड वापरून पोस्ट करण्यात आलं होतं. त्यासोबतच चिनी भाषेमधे हा हॅशटॅग वापरून २४ हजार ट्विट्स पोस्ट करण्यात आले.
आरुषी चैतन्य नावाच्या ट्विटर युजरने #Gobackmodi हा हॅशटॅग वापरून लिहिलंय, 'मोदीजी तुम्ही इथे येऊ नका. तुमचे ट्रोलर्स इथे अपयशी ठरलेत.'
सेल्वा गणेश नावाच्या युजरने नोटाबंदीच्या काळातला एक फोटो शेअर करत लिहिलंय, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणं बंद करा.
हेही वाचाः आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या बाबतीत तामिळनाडूच्या लोकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार होणं ही खरंच खंत करण्याजोगी गोष्ट आहे. कारण पंतप्रधान कुठली पार्टी, राज्य, भाषा, धर्म यांच्यापुरते मर्यादित नसतात. ते अख्ख्या देशाचे असतात. आतापर्यंतच्या कुठल्याही पंतप्रधानांशी तुलना केल्यास मोदींच्या बाबतीत तामिळनाडूच्या लोकांमधे खूप रोष दिसतो. गो बॅक मोदी म्हणणाऱ्यांमधे विरोधी पक्षांपेक्षा सर्वसामान्य तामिळींचा मोठा सहभाग असतो.
बीबीसी हिंदीच्या एका स्टोरीनुसार, तामिळ लोकांच्या या रागरागामागे वेगवेगळी कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे, नोव्हेंबर २०१८ मधे तामिळनाडूला गाजा नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळाने खूप मोठं नुकसान झालं. तब्बल तीन लाख लोकांना बेघर व्हावं लागलं. तब्बल ११ लाख झाडं उन्मळून पडली. पण या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आले नाहीत.
दुसरं म्हणजे, तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत मोठं आंदोलन केलं. पण या आंदोलकांना मोदी भेटायला गेले नाहीत, म्हणूनही तामिळनाडूमधे नाराजी आहे. तिसरं म्हणजे, मेडिकल कॉलेजमधे अॅडमिशनसाठी नीट परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिल कम एन्ट्रन्स टेस्ट लागू करण्यात आली. याला तामिळनाडूमधे खूप विरोध झाला. विद्यार्थ्यांनी आत्महत्यांचं पाऊल उचललं. यामुळे राज्यात मोदींविरोधात वातावरण निर्माण झालं.
मे २०१८ मधे तामिळनाडूच्या तुतुकोरीन स्टरलाईट कंपनीच्या विरोधात स्थानिक लोकांनी खूप मोठं आंदोलन केलं. या आंदोलनामधे पोलिसांच्या गोळीबारात १३ लोकांचा जीव गेला. यावर मोदींनी मौन बाळगल्याचा इथल्या लोकांचा आरोप आहे. तसंच कावेरी पाणी वाटपात केंद्र सरकारच्या भूमिकेवर तामिळनाडूच्या लोकांमधे मोदींविरुद्ध खूप मोठा रोष आहे.
हेही वाचाः जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाडीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ
द वायरसाठी कविता मुरलीधरन यांनी केलेल्या स्टोरीनुसार, एप्रिल २०१८ मधे गोबॅकमोदी हा हॅशटॅग पहिल्यांदा ट्रेंडमधे आला. त्यावेळी डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनासाठी मोदी तामिळनाडूला येत होते. विशेष म्हणजे त्यावेळी तामिळनाडूत वेगवेगळ्या ठिकाणीही गोबॅकमोदी असे नारे देत काळे झेंडे घेऊन मोदींविरोधात आंदोलन करण्यात आलं. कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाची निर्मिती करण्यात केंद्र सरकारमुळे उशीर होत असल्याचा आरोप या आंदोलकांचा होता.
यंदाच्या २७ जानेवारीवारीला मोदी मदुराई इथे एम्सच्या भूमिपुजनासाठी गेले होते. तेव्हाही गोबॅगमोदी हॅशटॅग ट्रेंडमधे आला. गेल्या ३० सप्टेंबरलाही पंतप्रधान मोदी तामिळनाडू दौऱ्यावर होते. आयआयटी मद्रासच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ते चेन्नईला गेले होते. तेव्हा गोबॅकमोदीचा ट्रेंड आला होता.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधानांनी अमेरिकेतल्या हाऊडी मोदी इवेंटमधे तामिळ कवी कानियान पुनगुन्दरानार यांच्या कवितेचा उल्लेख केला होता. तसंच भाषिक वैविधता हा आपल्यासाठी अभिमानाचा मुद्दा असल्याचं सांगत दक्षिण भारतावर हिंदी थोपवणार नसल्याचं अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलं. यानंतर तामिळनाडूतला मोदीविरोध कमी होईल, असं वाटलं होतं. पण तसं काही होताना दिसत नाही. मोदी हे पदवी प्रदान कार्यक्रमाला गेल्यावर ट्विटरवर #gobackmodi हा हॅशटॅग वापरून जवळपास ७६ हजार ३०० ट्विट टाकण्यात आल्याचं ट्विवरच्या आकडेवारीवरून दिसतं.
हेही वाचाः मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?
मोदींच्या समर्थनात होणाऱ्या ट्रोलिंगमधे परदेशातल्या ट्रोल्सचा मोठा सहभाग असतो, असे आरोप विरोधी पक्षांकडून वेळोवेळी होतात. आता गोबॅकमोदी ट्रेंडवेळीही मोदी समर्थकांकडून हा आरोप केला जातोय. काहीजण यावेळच्या ट्रेंडमागे पाकिस्तानचा हात असल्याचाही दावा करताहेत.
#GoBackModi
— Asad Munir (@AsadAsadmunir3w) October 11, 2019
Hitler Modi Stop Killing in Kashmir. pic.twitter.com/v6v5VQZnjw
विशेष म्हणजे, यावेळी हा हॅशटॅग वापरणाऱ्यांमधे चायनीज भाषेत ट्विटर हँडल असणाऱ्यांचाही सहभाग आहे. चिनी पंतप्रधानांचं स्वागत करतानाच ट्विटर युजर्स पंतप्रधानांचं स्वागत करताना मात्र हात आखडता घेतला जातोय.
இந்திய-சீன நாடுகளின் பேச்சுவார்த்தைக்காக தமிழ்நாட்டிற்கு வருகை புரியவுள்ள மேதகு சீன நாட்டின் குடியரசுத் தலைவர் அவர்களுக்கும் மாண்புமிகு பாரதப் பிரதமர் அவர்களுக்கும் சிறப்பான வரவேற்பு அளிப்பது குறித்த மாண்புமிகு தமிழக முதல்வர் திரு.எடப்பாடி கே.பழனிசாமி அவர்களின் அன்பு வேண்டுகோள். pic.twitter.com/SYUxWuNrKn
— Edappadi K Palaniswami (@CMOTamilNadu) October 9, 2019
I heartily welcome President of China Xi Jinping to Mamallapuram.
— M.K.Stalin (@mkstalin) October 8, 2019
Wishing a fruitful India - China Summit that brings together our economies and people. #TNwelcomesXiJinping pic.twitter.com/cMalmmKD0E
तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं स्वागत करणारं ट्विट केलं. हे स्वागत करण्यासाठी त्यांनी कुठलाच हॅशटॅग वापरला नाही. दुसरीकडे विरोधी पक्ष एम. के. स्टॅलिन यांनी निव्वळ चिनी राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करत #TNwelcomesXiJinping हा हॅशटॅग वापरला.
हेही वाचाः
मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?
आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद
पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार
पाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच
भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!