देशपांड्यांची मृण्मयी बोलली गोड, तरी नेटकऱ्यांनी मोडली खोड

२० मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला मन फकीरा नावाचा सिनेमा आला आणि गेलाही. पण त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मृण्मयी यांनी केलेला फेसबूक वीडियो सोशल मीडियावर अजूनही चालतोय. तो चालतोय आणि गाजतोय तो वीडियोसाठी नाही, तर त्याच्यावरच्या धमाल कमेंटसाठी. या कमेंटमधून मराठी फिल्म इंडस्ट्रीलाही खूप शिकता येईल.

तर झालंय असं, की मृण्मयी देशपांडे ही अभिनेत्री फेसबूकवर ट्रोल झालीय. कशात बरं पाहिलंय हिला, असा अनेकदा प्रश्न आपल्याला पडतो खरा. म्हणजे मराठीतली अगदी कुणीही नटनटी असली तरीही, हा प्रश्न पडतोच.

आपल्याला जरा सोप्प जावं म्हणून सांगतो, अहो ती नाही का, झी मराठीवरच्या ‘कुंकू’मधे होती. सुजय डहाकेच्या अभ्यासानुसार दोन अभिजन हिरोहिरोईन असलेल्या मालिकेत. ती आणि तैमुरपेक्षा एका वर्षाने लहान आणि अधिक क्यूट असलेला बर्व्यांचा सुनील मुख्य भूमिकेत होते. तर तीच देशपांड्यांची मृण्मयी ट्रोल झालीय.

आता तिने काय केलंय, ते ऐका. म्हणजे खरंतर ही पाहण्याची गोष्ट आहे. पण तुम्ही जरा ते इमॅजिन करा. आणि मज्जा घ्या.

खाली दिलेला उतारा वॅलेंटाईन डेच्या आदल्या रात्री मस्का मारणाऱ्या प्रेयसीच्या आवाजात आणि नखऱ्यात वाचावा. हे मृण्मयीच्या त्या एका मिनिटाच्या वीडियोचं शब्दांकन आहे.

हेही वाचाः जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

मृण्मयी म्हणालीय तरी काय?

`मंडळी उद्या आमचा मन फकीरा हा सिनेमा फायनली रिलीज होतोय आणि मला तुम्हाला सांगायचंय की प्लीज हा सिनेमा, पहिल्या तीन दिवसांमधेच म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवारमधेच जाऊन मॅक्झिमम लोकांनी तिकडे जाऊन सिनेमा बघा.`

(दीर्घ श्वास) कारण, पुन्हा तेच. मराठी सिनेमा आहे. तीन दिवसांमधे भवितव्य ठरतं.

अं आणि तुम्ही जर का या दिवसात नाही बघितला, तर मग, पुढे शो कसे मिळणार? आणि आपला सिनेमा होल्ड कसा करू शकणार?  त्यामुळे ज्यांना खरंच मनापासून बघण्याची इच्छा आहे, (आता खूपच लाडात) जी सगळ्यांनी असली पाहिजे, तर त्या सगळ्यांनी पहिल्या तीन दिवसांमधे तुमची तिकिटं बूक करा.`

`आणि प्लीज सिनेमाबद्दल भरभरून बोला आणि तुमचे सगळ्यांची जी काही म्हणणी असतील, ती मला डीएम (इथे डीएम म्हणजे धनंजय मुंडे नाही. डायरेक्ट मेसेज) करा. इन्स्टाग्राम फार सुंदर माध्यम आहे, एकमेकांपर्यंत पोचण्याचं आणि आम्ही तुम्हा सगळ्यांची, थिएटरमधे वाट बघतोय. पुन्हा एकदा पहिल्या तीन दिवसांमधे. (मस्त स्माईल) आणि भेटूया तर मग.`

तिकीट द्या ना काढून

आता काय झालं, इतकं लाडाचं आमंत्रण येताच सख्त लौंडे चेकाळलेच. आणि  राहत इंदोरी साहेबांनी सांगितलेला मोलाचा सल्ला त्यांनी फारच मनावर घेतला, `बुलाती है, मगर जाने का नय!`

फेसबूकवरच प्रसाद देठे बोलला - मन फकीरा सिनेमा आणि फकीरासारखी भीक मागावी लागतेय बघायला या म्हणून. किती नामुष्की ओढवलीय. टुकार सिनेमांवर.

यावर स्वप्नील म्हणला. जोशांचा नाही. देशमुखांचा - तिकीट द्या ना काढून.

मग संजय सोळंके नावाचा एका पंटर आला. तो बोल्ला - तुमचे सिनेमे येतात कधी आणि जातात कधी हेच कळत नाही. बाई स्वतःला उगाच हिरोईन नका समजू. कोण ओळखत नाही तुम्हाला.

हो म्हणूनच मी सुरवातीला अगदी कुंकूपासून ओळख करुन दिली. बाय द वे. ही त्या छाना पाटेकरांच्या नटसम्राटमधेपण होती. तर पुढे,

हेही वाचाः शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

एका लायनीतल्या दुःखाला ३३ लाईक

हाच संजय सोळंके पुढे लिहितो - तुमच्या या अशा सिनेमांमुळे महाराष्ट्रात कोणी मराठी सिनेमा पाहत नाही. आणि तुमच्या स्टोरी एवढ्या भंगार असतात की तुम्हाला थेटर्ससुद्धा मिळत नाहीत. दुर्दैव महाराष्ट्राचं, असली मराठी इंडस्ट्री भेटली. भिकारी साले.

मराठी इंडस्ट्रीला भिकारी वगैरे म्हणण्याला आक्षेप असायलाच हवा. पण काय आहे ना, मराठीतले शाहरुख खान यांनी तोंड रंगवून भिकारी नावाचाच सिनेमा केल्यामुळे, हे त्या अर्थाने घ्यायला आता हरकत नाहीए.

पुढे प्रदीप घेघाडे बोल्लाय  - महाच्युत्या स्टोरी आहे. आपटला पाहिजे असला फडतूस सिनेमा.

म्हणजे हा गोडगुलाबी बोलण्याला बळी पडलेला दिसतोय. असो. पण त्याच्या या एका वाक्यातल्या दुःखाला ३३ लाईक आहेत.

गावठी शारूख उर्फ थालिपीठिया कोण?

यावर सविता वायकर लिहितात - हा विषय कोणाच्याच जिव्हाळ्याचा नाही, कोणी दैनंदिन जीवनात अशा समस्यांना सामोरं जात नाही. आणि वास्तवाशी याचा संबंध नाही. मग आम्ही का सिनेमा पाहायचा?

सविताताई बहुधा झी मराठीवरच्या वास्तववादी सिरयल्स पाहत असाव्यात.

त्याच्या खाली अमोल उदनशिवेची कमेंट आहे. तो म्हणतो -  तुमच्यापेक्षा भिकारी बरा. तो परिस्थितीमुळे भीक मागतो. आणि तुम्ही श्रीमंतीसाठी भीक मागता.

वाह… दादा वाह. हे भिकारी फेम स्वप्नील जोशीच्या अंदाजात वाचायला हवं. कारण पुढे एकाने स्वप्नीलचीच आठवण काढलेय. तो म्हणलाय - आमचा लाकडा गावठी शारुख उर्फ स्वप्नील जोशी यांचा समावेश नसल्यामुळे या सिनेमावर बहिष्कार करावा.

त्याच्या खाली कुणीतरी स्वप्नीलला ‘थालिपीठिया’सुद्धा म्हटलंय. हे नवंकोरं आहे. नया हैं यह. य़ात शिवी आहे की प्रेम, हे कळत नाही.

हे कोरोना स्पेशलही वाचाः

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

मगर जाने का नय

पुढे विपीन पांडुरंग इंगळे म्हणतो - मराठी मूवी बघणार तर फक्त नागराज मंजुळे आणि सुजय डहाके आणि जाधवांचे. पण तू खूप आवडतेस आणि गोड दिसतेस.

डसण्याची कला इंगळेंनाचा जमायची. घाव पण केला. आणि मलम पण लावलं भावानं.

आनंदराव देशमुख नावाचे गृहस्थ लिहितात - का ग भिकार्डे, भीक मागून खायची लायकी तुमच्या सगळ्या ***ची, आता अशी पण प्रथा चालू केली का? भीक मागून चित्रपट बघायला या.

शिव शिव शिव. हा जातीद्वेष कशाला. हे मला सैन नाही होत आता. पण मला एक कमेंट यातली खूप आपडलीए.

ती आहे, अजीत पाटीलची. पाटलाने थेट लिहिलंय - मी इथे फक्त कमेंट वाचायला आलोय.

तर आहे हे असं आहे. या सगळ्यातून एक गोष्ट पक्की आहे की लोकांना आता फेक आणि नेक यातला फरक कळू लागलाय. चांगला सिनेमा लाडीगोडीतल्या प्लीज, प्लीज, प्लीज शिवायही चालतो. आणि वाईट सिनेमा अशा मधाळ आमंत्रणांनतरही आपटतो. कारण अंतिम सत्य एकच आहे, बुलाती है, मगर जाने का नय.

हेही वाचाः 

लग्न पहावं 'अंबानींसारखं' करुन

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

महागुरू सचिन पिळगावकरांना लोक शिव्या का घालतायंत?

बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?