इंडेक्स फंड चांगला पर्याय आहे का?

०६ मार्च २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रथमच गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड चांगले असतात. प्रोफेशनल मदती शिवाय उपलब्ध असलेल्या हजारो पर्यायांमधून योग्य म्युच्युअल फंडाची निवड करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी इंडेक्स फंड किफायतशीर आणि सोपे असतात. कमकुवत कामगिरीची चिंता करणार्‍या गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. कारण इंडेक्स फंडाचा परतावा उर्वरित उद्योगाच्या बरोबरीचा आहे.

बहुतेक गुंतवणूकदार सावध होतात आणि विभाजन करण्यास सुरवात करतात, तेव्हा त्यांचे अधिक पैसे सुरक्षित संपत्ती असते. स्मार्ट गुंतवणूकदार याच्या उलट काम करतात. प्रसारमाध्यमं २००९ मधे ग्रेट डिप्रेशनच्या परिस्थितीबद्दल बोलत होती तेव्हा बहुतेक गुंतवणूकदार बाजारपेठेच्या बाहेर राहिले. पण, दोन गुंतवणूकदार अर्थव्यवस्थेत अब्जावधी पैसे गुंतवत होते. त्यापैकी एक वॉरेन बफे आणि दुसर्‍याचं नाव हॉवर्ड मार्क्स. त्यांना असं करण्यासाठी कशाने प्रवृत्त केलं असावं?

त्याचं पहिलं कारण त्यांना अल्पमुदतीची भीती नाही. हे दोघेही दीर्घकालीन स्थिर भांडवलावर शांत बसले होते. अल्पावधीत जास्त पैसे गमावण्यास तयार होते. अल्पमुदतीची जोखीम टाळण्यामुळे बर्‍याच लोकांचे निर्णय वाईट ठरतात. दुसरा त्यांचा अनुभव. दोघेही दशकांच्या अनुभवावर अवलंबून होते. या अनुभवावरून त्यांना समजलं की, बाजारपेठा दीर्घकाळात कंपन्यांच्या आंतरिक मूल्यांचं अनुसरण करतात. त्या काळात बर्‍याच कंपन्यांची आंतरिक मूल्यं लाइफटाइम लो वर होती. ते बाजारात वेळेची जाणीव ठेवत नव्हते. ते स्वस्तात खरेदी करत होते.

हेही वाचा : मृत्यूनंतर म्युच्युअल फंडमधल्या पैशांचं काय होतं?

सोपे आणि सुलभ इंडेक्स फंड

नेट ऍसेट वॅल्यूच्या म्हणजेच एनएवीच्या तत्पर उपलब्धतेबरोबर, रियल टाइम स्टॉक प्राईस आणि गुंतवणुकीची हजारो उत्पादनं आज असल्याने बरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडना स्टॉकपेक्षा अधिक वेगाने बदलतात. तसंच, बर्‍याच गुंतवणूकदारांचा कल त्यांची कार्यक्षमता दररोज पाहण्याकडे असतो. स्टॉक मार्केटमधे १० वर्षांच्या योजनेसह प्रवेश करणार्‍यासाठी दररोज एनएवी चेक करण्यात फारसा अर्थ राहत नाही.

याउलट, प्रथमच गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड चांगले असतात. प्रथमच गुंतवणूक करणार्‍या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांकडे योग्य म्युच्युअल फंडाची निवड करण्यासाठी वेळ किंवा कौशल्य नसतं. त्यामुळे आजच्या अनिश्चित वातावरणात निवड करण्याचं काम कठीण होऊन जातं. वेळ वाचवण्यासाठी आणि सुलभतेसाठी इंडेक्स फंड त्यांच्याकरता योग्य आहेत.

प्रोफेशनल मदती शिवाय उपलब्ध असलेल्या हजारो पर्यायांमधून योग्य म्युच्युअल फंडाची निवड करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी इंडेक्स फंड किफायतशीर आणि सोपे असतात. कमकुवत कामगिरीची चिंता करणार्‍या गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. कारण इंडेक्स फंडाचा परतावा उर्वरित उद्योगाच्या बरोबरीचा आहे.

गुंतवणुकीसोबत जोखीमही हवीच

त्यासाठी किमान दृष्टिकोन ठेवला पाहिजे. किमानतेचा अर्थ आहे की कमी म्हणजे चांगले. आज बहुतेक गुंतवणूकदारांचा कल जास्त म्युच्युअल फंड घेण्याकडे आहे. दीर्घकालीन कालावधीत हा दृष्टिकोन अत्यंत कुचकामी ठरतो. नव्या गुंतवणूकदारांनी कमी फंडांमधे खूश असलं पाहिजे. ज्यामधे विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय इंडेक्स फंडासह एक व्यापक, आधारित इंडेक्स फंडचा समावेश असावा.

गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओत योग्य फंड शोधण्यासाठी बराच वेळ घालवतात. प्रत्यक्षात टक्केवारीच्या आधारे केलेले विभाजन गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. शिस्तबद्ध गुंतवणुकीसह योग्य रिस्क प्रोफाइलबरोबर संपत्तीच्या विभाजनावर लक्ष केंद्रित करायला हवं. यामुळे जास्तीत जास्त चांगला परिणाम मिळतो.

हेही वाचा : सरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक

नुकसानीची भीती नको

इंडेक्स फंड बहुतेक गुंतवणूकदारांसाठीही योग्य आहेत. अधिक प्रभावी गुंतवणूकदारांनी त्यांचे मुख्य पोर्टफोलिओ इंडेक्स फंडामधे विभाजित केले पाहिजेत. त्यांच्या पोर्टफोलिओचा हा असा भाग आहे, ज्याला दीर्घकाळासाठी हात लावू नये. गुंतवणूकदार जितका जास्त वेळ आपला इंडेक्स फंड ठेवतात, ते तितकेच अधिक प्रभावी होतात.

इक्विटीमधे दीर्घ मुदतीच्या भांडवलाचं विभाजन करण्याचा विचार करणार्‍यांसाठी हा एक उत्कृष्ट काळ आहे. पुढची भविष्यवाणी करणं अशक्य आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी अल्पमुदतीच्या नुकसानीची भीती बाळगू नये. जास्तीत जास्त पोर्टफोलिओ वाढीसाठी तेजी आणि मंदी या दोन्ही चक्रांमधे गुंतवणूक करावी. सध्याच्या बाजार परिस्थितीत इंडेक्स फंड सुलभतेच्या हेतूसाठी उपयुक्त ठरू शकतात.

हेही वाचा : 

नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!

तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट

(लेखक मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट कंपनीचे हेड ऑफ पॅसिव्ह फंड बिझनेस असून हा लेख दैनिक पुढारीतून घेण्यात आला आहे.)